हायअलर्ट! भारतातील दोन ठिकाणं दहशतवाद्यांच्या निशान्यावर

हायअलर्ट! भारतातील दोन ठिकाणं दहशतवाद्यांच्या निशान्यावर

भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव वाढत आहे. समुद्रमार्गे दहशतवादी भारतात घुसखोरीचा प्रयत्न करु शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानातील दहशतवादी सोमनाथ आणि द्वारका येथे हल्ल्याचा कट रचत आहे. हाय अलर्ट नंतर सीमाभागावर सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे.

जैसलमेरमध्ये दिसलं संशयित ड्रोन, परिसरात खळबळ

जैसलमेरमध्ये दिसलं संशयित ड्रोन, परिसरात खळबळ

राजस्थानमधील जैसलमेरमध्ये सोनार दुर्गवर ड्रोनने फोटो काढले गेल्याची माहिती येत आहे. पोलीस अधिक्षकांना याबाबत माहिती दिल्याचं समोर येतंय. जैसलमेरमध्ये ड्रोनवर बंदी आहे. ड्रोनने फोटो काढले देल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

तर हल्ल्याचं व्हिडिओ शूटिंग सार्वजनिक करणार

तर हल्ल्याचं व्हिडिओ शूटिंग सार्वजनिक करणार

पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्करानं हल्ला करून दहशतवाद्यांचे 7 तळ उद्धवस्त केले.

POK हल्ल्यानंतर घडामोडींना वेग

POK हल्ल्यानंतर घडामोडींना वेग

भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी तळांवर हल्ले केले.

POK हल्ल्याबाबत अभिनंदन, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांना फोन

POK हल्ल्याबाबत अभिनंदन, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांना फोन

 भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला 

भारतीय सेनेनं केवळ ४ तासांत ४० दहशतवाद्यांना पाजलं पाणी

भारतीय सेनेनं केवळ ४ तासांत ४० दहशतवाद्यांना पाजलं पाणी

आत्तापर्यंत शांततेच्या मार्गानं दहशतवादाचा प्रश्न हाताळणाऱ्या भारतानं आता मात्र पूँछ आणि उरी भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांना जशास तसं प्रत्यूत्तर देण्याचा निर्णय घेतलाय. 

'सामना'च्या प्रिंटींग प्रेसवर दगडफेक

'सामना'च्या प्रिंटींग प्रेसवर दगडफेक

शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या प्रिंटींग प्रेसवर आज दोन अज्ञात बाईकस्वारांनी दगडफेक केली. गेल्या आठवड्यात सामनामधून मराठा क्रांती मोर्चाबद्दल व्यंगचित्र छापण्यात आलं. त्या व्यंगचित्रानंतर मराठा समाजात तीव्र संताप व्यक्त होतोय. अनेक ठिकाणी सामनाची होळी करण्यात आली. 

अजगरासोबत सेल्फी काढणं पडलं महाग

अजगरासोबत सेल्फी काढणं पडलं महाग

राजस्थानच्या माऊंट अबूमध्ये एका तरुणाला अजगरासोबत सेल्फी काढणं चांगलंच महागात पडलं आहे.

दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर 'ए दिल है मुश्किल'च्या अडचणी वाढल्या

दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर 'ए दिल है मुश्किल'च्या अडचणी वाढल्या

करण जोहर दिग्दर्शित 'ए दिल है मुश्किल' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. परंतु, उरी हल्ल्यानंतर दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर या सिनेमाच्या अडचणींत वाढ होणार असं दिसतंय. 

उरी हल्ल्यासंबंधित NIA नं दाखल केला गुन्हा

उरी हल्ल्यासंबंधित NIA नं दाखल केला गुन्हा

 उरी दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एनआयएने गुन्हा दाखल केलाय. 

उरी हल्ल्यातील शहिदांवर आज होणार अंत्यसंस्कार

उरी हल्ल्यातील शहिदांवर आज होणार अंत्यसंस्कार

महाराष्ट्राचे सुपूत्र संदीप ठोक यांच्या पार्थिवावर सोमवारी नाशिकमधल्या त्यांच्या खडांगळी या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. तर इतर तीन शहीद जवानांवर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.

उशीरा घरी आल्यामुळे वडिलांचा मुलीवर चाकूने हल्ला

उशीरा घरी आल्यामुळे वडिलांचा मुलीवर चाकूने हल्ला

नवी दिल्ली : मुलगी घरी उशीरा आल्यामुळे वडिलांनी मुलीवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना दिल्लीमध्ये घडली आहे. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

'ड्रंक ड्रायव्हर'चा पोलिसावर जीवघेणा हल्ला

'ड्रंक ड्रायव्हर'चा पोलिसावर जीवघेणा हल्ला

पोलिसांवरील हल्ल्याचं सत्र थांबता थांबत नाहीय.

कल्याणमध्ये आणखी एका पोलिसावर हल्ला

कल्याणमध्ये आणखी एका पोलिसावर हल्ला

पोलिसांवरील हल्ल्याच्या घटना अजूनही सुरूच आहेत. कल्याण आणि पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा पोलिसांवर हल्ला झाला आहे. आंबिवली जवळच्या मोहनेमध्ये पोलीस हवालदार असलेल्या उत्तम अडसुळ यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.

सौंदर्याचे नवे मापदंड... अॅसिड हल्ला पीडिता उतरली 'रॅम्प'वर

सौंदर्याचे नवे मापदंड... अॅसिड हल्ला पीडिता उतरली 'रॅम्प'वर

ज्या दिवशी प्रीती राठी ऍसिड हल्लाप्रकरणी नराधमाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, त्याचदिवशी एका अॅसिड हल्ला पीडित मुलीनं आपल्या रॅम्पवॉकनं जगाची मनं जिंकली... जणू काही तिनं अनेकांना जगण्याची नवी उमेदच दिलीय. 

नाशिकमध्ये पोलिसावर जीवघेणा हल्ला

नाशिकमध्ये पोलिसावर जीवघेणा हल्ला

गेल्या काही दिवसांपासून पोलीसांवरील हल्ल्याचे प्रमाण वाढत चाललेय. नाशिकमध्ये पुन्हा एकदा पोलिसावर हल्ला केल्याची घटना घडलीये. 

नेमके काय घडले होते, ऐका बुडविण्याचा प्रयत्न केलेल्या पोलिसाकडून

नेमके काय घडले होते, ऐका बुडविण्याचा प्रयत्न केलेल्या पोलिसाकडून

 कल्याणमध्ये गणपती विसर्जनावर पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला करून बुडविण्याचा प्रयत्न केल्याचा संतापजनक प्रकार घडला. पण नेमकं काय झालं होत त्यावेळी जाणून घ्या नितिन डगळे यांच्याकडून ...

पोलिसाला बुडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अटक, एक फरार

पोलिसाला बुडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अटक, एक फरार

कल्याणमध्ये पोलीस उपनिरीक्षकाला बुडवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आलीय. यातला एक आरोपी अजूनही फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे. 

पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी : उद्धव ठाकरे

पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी : उद्धव ठाकरे

राज्यात पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्याबाबत कठोर निर्णय घेतला पाहिजे. कायद्याची वचक बसली  पाहिजे. यासाठी हल्ले करणाऱ्यांवर कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मांडल्याची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. 

पिसाळलेल्या अस्वलाचा दोघांवर हल्ला, एक गंभीर जखमी

पिसाळलेल्या अस्वलाचा दोघांवर हल्ला, एक गंभीर जखमी

जिल्ह्यातल्या ज्ञानगंगा अभयारण्याला लागून असलेल्या कोटखेड शिवारात आज पुन्हा पिसाळलेल्या अस्वलानं दोन तरुणांवर हल्ला करून जखमी केल्याची घटना घडलीय.

व्हॉट्स अॅपवरच्या भांडणानंतर मित्राला भोसकलं

व्हॉट्स अॅपवरच्या भांडणानंतर मित्राला भोसकलं

व्हॉट्स अॅपवरच्या ग्रुपवर झालेल्या भांडणाच्या रागातून एका मित्रानं दुसऱ्याला भोसकल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे.