युती सन्मानपूर्वक होत असेल तर करावी अन्यथा...- दानवे

युती सन्मानपूर्वक होत असेल तर करावी अन्यथा...- दानवे

युती करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर आहेत, युती सन्मानपूर्वक होत असेल तर करावी, अन्यथा स्वबळावर लढावे असं आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी म्हटलंय.  

झोपडपट्यांवरील कारवाईवरुन मुंबई मनपात सेना-भाजप वाद पेटला

झोपडपट्यांवरील कारवाईवरुन मुंबई मनपात सेना-भाजप वाद पेटला

शिवसेना भाजप यांच्यात मुंबई महानगरपालिकेत चांगलाच वाद पेटला. मुंबई महानगपालिकेत माफिया राज असल्याचा आरोप केला जातो आहे. त्याबाबतचं नेमकं सत्य आयुक्तांनी मुंबईकरांसमोर ठेवावं अशा मागणीचं पत्र महापौरांनी आयुक्तांना लिहिलं आहे. तर शिवसेना खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सुनील प्रभू यांनी स्वतः महापालिकेत येऊन झोपडपट्ट्यांवरील कारवाईवरून आयुक्तांची खरडपट्टी काढली. 

युतीबाबत भाजपची आता सबुरीची भाषा

युतीबाबत भाजपची आता सबुरीची भाषा

एकीकडे शिवसेना नेते आक्रमक झाल्याची चर्चा असतानाच भाजपानं मात्र आता सबुरीची भाषा केली आहे. शिवसेना आणि भाजपाची युती व्हावी याबाबत जिल्हास्तरावर निर्णय होतो. मात्र मुंबईमध्ये युती व्हावी ही भाजपाची इच्छा असल्याचं अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय.

आगामी निवडणुकीत सेना स्वबळावर, उद्धव ठाकरेंचे संकेत

आगामी निवडणुकीत सेना स्वबळावर, उद्धव ठाकरेंचे संकेत

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपवर विश्वास ठेवणं कठीण असल्याचा सूर आज मातोश्रीवर झालेल्या शिवेसेनेचे वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत पुढे आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 

निवडणुकीच्या तोंडावर भाजप-सेनेत दुरावा...

निवडणुकीच्या तोंडावर भाजप-सेनेत दुरावा...

पालिका निवडणूकीच्या तोंडावर सेना आणि भाजपमधला दुरावा दिवसेंदिवस वाढत चाललीय. आज दादरच्या अग्निशमन केंद्राच्या नवीन वास्तूच्या लोकापर्णाच्या सोहळ्याला भाजपच्या नेत्यांनी दांडी मारलीय.

मुंबईवरच्या वर्चस्वासाठी ठाकरे बंधुंनी कसली कंबर

मुंबईवरच्या वर्चस्वासाठी ठाकरे बंधुंनी कसली कंबर

मुंबईवर असलेलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी ठाकरे बंधुनी कंबर कसली आहे.

किरीट सोमय्यांना शिवसेनेचं प्रत्त्यूत्तर

किरीट सोमय्यांना शिवसेनेचं प्रत्त्यूत्तर

खासदार किरीट सोमय्यांनी मित्रपक्ष शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. महापालिक निवडणूक स्वबळावर जिंकणार असल्याचा त्यांनी इशारा दिला आहे. मुंबई महापालिकेतली आरक्षण सोडत जाहीर होते न होते तोच शिवसेना आणि भाजपमधला सत्तासंघर्ष विकोपाला जातांना दिसतोय. महापालिकेत शिवसेनेनं तयार केलेला माफियांचा अड्डा उद्ध्वस्त करू असं स्फोटक विधान आज भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केलं आहे.

आरक्षणानंतर कोणत्या नगरसेवकांना शोधावा लागणार नवा प्रभाग

आरक्षणानंतर कोणत्या नगरसेवकांना शोधावा लागणार नवा प्रभाग

 मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीनंतर एकूणच काही नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे. यावेळी आरक्षणामुळे अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत. 

मुंबईत हे नगरसेवक आपल्या पत्नीसाठी मिळवू शकतात तिकीट

मुंबईत हे नगरसेवक आपल्या पत्नीसाठी मिळवू शकतात तिकीट

 मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीनंतर एकूणच काही नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे. यावेळी आरक्षणामुळे अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत. 

मुंबई महापालिकेच्या नव्या प्रभागांची यादी(पूर्व)

मुंबई महापालिकेच्या नव्या प्रभागांची यादी(पूर्व)

मुंबई महापालिकेच्या आक्षरणाच्या सोडतीत अभूतपूर्व फेर बदल झालेत. मुंबईतल्या अनेक दिग्गज नगरसेवकांना आपले प्रभाग गमावावे लागलेत.  

मुंबई महापालिका आरक्षणाच्या सोडतीत मोठे फेरबदल

मुंबई महापालिका आरक्षणाच्या सोडतीत मोठे फेरबदल

मुंबई महापालिकेच्या आरक्षणाच्या सोडतीत अभूतपूर्व फेर बदल झालेत. मुंबईतल्या अनेक दिग्गज नगरसेवकांना आपले प्रभाग गमावावे लागलेत. 

शिवसेना- भाजप मध्ये पुन्हा जुंपली

शिवसेना- भाजप मध्ये पुन्हा जुंपली

 मुंबई महापालिका निवडणुकीआधी शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपलीय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी उद्धव ठाकरे यांनी भाजपला डिवचलं होतं. हळद लागलेल्यांना सत्ता स्थापनेची स्वप्नं पडत असली तरी पालिका आणि विधानसभेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार असा विश्वास उद्धव यांनी व्यक्त केला होता.

राहुल गांधींच्या मुंबई दौऱ्याचा आज दुसरा दिवस

राहुल गांधींच्या मुंबई दौऱ्याचा आज दुसरा दिवस

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्याद्वारे काँग्रेसने मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीचं बिगुल वाजवलंय.

मुंबई मनपा निवडणूक शिवसेना-भाजप एकत्रितच लढणार - मुख्यमंत्री

मुंबई मनपा निवडणूक शिवसेना-भाजप एकत्रितच लढणार - मुख्यमंत्री

मुंबई मनपा निवडणूक शिवसेना-भाजप एकत्रित लढणार, अशी महत्वाची माहिती मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात दिलीय. 

महापालिका निवडणुकीआधी भाजप-सेनेची फारकत?

महापालिका निवडणुकीआधी भाजप-सेनेची फारकत?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी औरंगाबादमध्ये पत्रकारपरिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना एक भाकीत त्यांनी वर्तवल. सरकारमध्ये एकत्र सहभागी असूनही, परस्परांना जागा दाखवण्याची एकही संधी न सोडणारे शिवसेना-भाजपा मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी वेगळे होतील, अस, मत  शरद पवारांनी व्यक्त केलं आहे.

मुंबई राखली, आता महाराष्ट्र जिंका !

शिवसेनेनं अखेर मुंबईत 'जिंकून दाखवलंच'. या शहरावर शिवसेनेच्या वाघाची पकड किती मजबूत आहे, हेच यातून दिसून आलं. शिवसेनाप्रमुखांची जंगी सभा आणि वॉर्डा-वॉर्डात पसरलेलं शिवसैनिकांचं जाळं या ताकदीवर मुंबई महापालिकेवरील भगव्याचा डौल पुन्हा कायम राहिला.

आघाडीसाठी दोन्ही काँग्रेसच्या ‘जोर बैठका’!

मुंबई महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी संदर्भातील आज सकाळी झालेली बैठक तोडग्या विना संपली. सायंकाळी पुन्हा दोन्ही पक्षाचे नेते एकत्र येऊन वार्ड निहाय आढावा घेणार असल्याची माहिती झी २४ तासला दोन्ही पक्षातील सूत्रांनी दिले.

कामातांचा आघाडीत खोडा

का करावी. काँग्रेस एकट्याने लढून सत्ता आणण्यास समर्थ आहे, राष्ट्रवादी मागे फरफट नको, असा विरोध मुंबई प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष गुरुदास कामत यांनी व्यक्त केला आहे.