cabinet meet

पंतप्रधानांनी बोलावली मंत्रिमंडळाची तातडीची बैठक

पंतप्रधानांनी बोलावली मंत्रिमंडळाची तातडीची बैठक

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रात्री आठ वाजता मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलावली असून यात काय चर्चा होणार याबाबत अद्याप कोणालाही माहिती नाही. 

Nov 24, 2016, 06:15 PM IST

मोदी सरकारचं संसदेचं पहिलं अधिवेशन 4 जूनपासून

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचं संसदेतील पहिलं विशेष अधिवेशन हे येत्या ४ जूनपासून सुरू होणार आहे. हे अधिवेशन ११ जूनपर्यंत चालेल. ४ आणि ५ जूनला खासदरांचा शपथविधी होईल. तर जूनला लोकसभा अध्यक्षांची निवड केली जाईल अशी माहिती, संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिली.

May 29, 2014, 02:27 PM IST

...अखेर आज सादर होतेय सिंचनावर श्वेतपत्रिका

अखेर ‘झी २४ तास’च्या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय. आजच्या कॅबनिटच्या बैठकीत सिंचनाची श्वेतपत्रिका सादर करण्यात येणार आहे.

Nov 29, 2012, 07:55 AM IST

आवाज कुणाचा... दादांचा!

मंत्रिमंडळाबाहेर राहून सरकार आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर अंकुश ठेवण्याचा आणि सत्तेबाहेर राहून सत्ता राबवण्याचा हा प्रयत्न

Oct 4, 2012, 09:36 AM IST

मुख्यमंत्री बदलाचा प्रश्नच नाही – पवार

मंत्रालयातील आगीपासून आता सामान्य स्थिती आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. यात मुख्यमंत्री बदलाचा मुद्दा काढणे चुकीचे आहे. असा मुद्दा काढून स्थिती सामान्य व्हायला दिरंगाई होईल, त्यामुळे असा मुद्दा काढू नये, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिपदेत सांगितले.

Jun 22, 2012, 04:57 PM IST

मंत्रालयात स्प्रिंकलर यंत्रणाच नाही

राज्यातील इमारतींमध्ये आगीपासून बचाव होण्यासाठी कोणती यंत्रणा हवी, याचे नियम ठरवणारे मंत्रालय. मात्र, काल लागलेल्या आगीमुळे या मंत्रालयातील इमारतीत आग लागल्यानंतर आवश्यक असलेली यंत्रणा नसल्याने अनेकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे

Jun 22, 2012, 04:27 PM IST

मंत्रालयाची पाडा इमारत, बांधा नवीन- पवार

मुंबई ही राज्याची राजधानी आहे. राजधानीच्या ठिकाणी असलेले मंत्रालय हे प्रशासकीय कार्याचं मुख्यालय आहे. आगीचा प्रकार पाहता या ठिकाणी कायम स्वरुपाची प्रशासनासाठी एक उत्तम स्वरूपाची इमारत हवी, आणि या इमारतीचे काम सरकारने केले पाहिजे, अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ही इमारत पाडा आणि त्याची पुनर्बांधणी करण्याचा सल्लाच पवारांनी यावेळी दिला आहे.

Jun 22, 2012, 04:17 PM IST

मुख्यमंत्र्यांनी केलं सहकार्याचं आवाहन

ज्या मंत्रालयातून संबंध राज्यातल्या जनतेची कामं हाताळली जाताता ते मंत्रालयचं सुरक्षित नाही, याची प्रचिती गुरुवारच्या आगीमुळे सगळ्यांनाच आली. त्यानंतर आज सकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तातडीनं कॅबिनेटची बैठक बोलावली होती. मंत्रालयाचं स्ट्रक्चरल ऑडिट होईपर्यंत मंत्रालय बंद राहील, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कॅबिनेट बैठकीनंतर स्पष्ट केलय.

Jun 22, 2012, 02:36 PM IST