संभाजी भिडे गुरुजींसह १००० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

संभाजी भिडे गुरुजींसह १००० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

पालखी सोहळ्यादरम्यान बेकायदेशीर जमाव जमवून घोषणाबाजी केल्याप्रकरणी सांगलीच्या शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे गुरुजींसह त्यांच्या सुमारे १००० कार्यकर्त्यांवर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Tuesday 20, 2017, 09:32 AM IST
शिवसेना खासदार रवींद्र गायकवाडांच्या अडचणी वाढणार?

शिवसेना खासदार रवींद्र गायकवाडांच्या अडचणी वाढणार?

एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्याविरोधात गंभीर कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. ज्यामुळे गायकवाड यांना शिक्षा देखील होऊ शकते. 

शाहरुख खान विरोधात पोलिसात तक्रार दाखल

शाहरुख खान विरोधात पोलिसात तक्रार दाखल

बॉलिवूडचा किंग खानच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. शाहरुख खानविरोधात रईस सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान रेल्वे स्थानकावर झालेल्या गोंधळ आणि एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने त्याच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. राजस्थानमधील कोटाच्या GRP पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली आहे. दंगल भडकवणं आणि रेल्वेच्या संपत्तीला हानी पोहोचवल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिज विरोधात तक्रार

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिज विरोधात तक्रार

जॉन अब्राहम, वरुण धवन आणि जॅकलीन फर्नांडिजचा आगमी सिनेमा 'ढिशूम' हा कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. सिनेमामध्ये  जॅकलीनही कंबरेवर खंजीर लावलं आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील शीख गुरुद्वारा कमेटीने यामुळे शिखांच्या भावना दुखवल्याचा आरोप करत निर्मात्यांना नोटीस पाठवली होती. आता चंदिगडमधील एका नागरिकांने याविरोधात दिग्दर्शक रोहित धवन, निर्माता साजिद नाडियाडवाल आणि जॅकलीन फर्नांडिज विरोधात तक्रार नोंदवली आहे.

राजच्या अडचणींत आणखी भर...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंच्या वक्यव्याविरोधात दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.