भारतातील ही महिला नेता ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत

भारतातील ही महिला नेता ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत

भारतात तसं राजकारणात अजूनही पुरुषांनाच मोठं स्थान दिलं जातं. पण वेळेनुसार आता राजकारणात महिलांचा वर्चस्व सुद्धा वाढतांना दिसत आहे. भारतासह जगभरात महिलांनी आपल्या राजकीय इच्छाशक्तीने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अनेक महिला नेत्या तर त्यांच्या हॉट लूकमुळे चर्चेत आले आहेत. मॉडलिंग किंवा बॉलिवूडमध्ये अशा अनेक सुंदर महिला तुम्ही पाहिल्या असतील पण राजकारणात देखील काही महिला आपल्या लूकमुळे चर्चेत येतात. 

आमदार नितेश राणे यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

आमदार नितेश राणे यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

काँग्रेस आमदार नितेश राणे आणि अन्य दोघांविरोधात सांताक्रुझ पोलीस ठाण्यात खंडणी, धमकी आणि घुसखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मोईन शेख आणि मोहम्मद अंसारी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

भाजप आणि काँग्रेसकडून आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत

भाजप आणि काँग्रेसकडून आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत

भाजपा आणि काँग्रेसनं आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. पाकिस्तानचा पर्दाफाश करणारा हा निर्णय असल्याचं भाजपा प्रवक्ते नलीन कोहली यांनी म्हटलं आहे. तर काँग्रेस प्रवक्ता मनिष तिवारी यांनी केवळ स्थगितीवर समाधान न मानता कुलभूषण जाधवांना परत आणण्यासाठी सरकारनं प्रयत्न केले पाहिजेत, असं म्हटलं आहे.

कोकणात विरोधकांची संघर्षयात्रा, राणे सहभागी होणार का?

कोकणात विरोधकांची संघर्षयात्रा, राणे सहभागी होणार का?

रायगडमध्ये आज विरोधकांची संघर्षयात्रा आहे. या संघर्षयात्रेचा मुक्काम रत्नागिरीत असणार आहे. दरम्यान,  ज्येष्ठ नेते नारायण राणे सहभागी होणार का, याची उत्सुकता आहे.

काँग्रेसच्या तरूण खासदारांकडून मोदी सरकारवर टीकास्त्र

काँग्रेसच्या तरूण खासदारांकडून मोदी सरकारवर टीकास्त्र

काँग्रेसच्या दिल्ली मुख्यालयातल्या पत्रकार परिषदेत तीन वर्षांत केंद्र सरकारनं केलेल्या 30 चूकांचा पाढा वाचण्यात आला.

सीबीआय छाप्यांवर काँग्रेस-भाजपमध्ये जुंपली

सीबीआय छाप्यांवर काँग्रेस-भाजपमध्ये जुंपली

 माजी अर्थमंत्री चिदंबरम यांच्या मालमत्तांवरील छापेमारीनंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये जुंपली आहे. 

राहुल आणि सोनिया गांधींना दिल्ली हायकोर्टाचा दणका

राहुल आणि सोनिया गांधींना दिल्ली हायकोर्टाचा दणका

 नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हायकोर्टाने झटका दिला आहे. दिल्ली हाईकोर्टाने या प्रकरणाची चौकशी करण्याची परवानगी आयकर विभागाला दिली आहे. नॅशनल हेराल्डमध्ये यंग इंडिया, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भागीदारी आहे.

ईव्हीएम वादावर निवडणूक आयोगाची सर्वपक्षीय बैठक

ईव्हीएम वादावर निवडणूक आयोगाची सर्वपक्षीय बैठक

ईव्हीएममध्ये टॅम्परिंगबाबत सुरु असलेल्या वादावर निवडणूक आयोगाने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत सर्व राजकीय पक्ष ईव्हीएमच्या मुद्द्यावर आपलं मत मांडणार आहेत.

पाणी प्रश्नावर काँग्रेस - स्वाभिमानी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी

पाणी प्रश्नावर काँग्रेस - स्वाभिमानी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी

पलूसमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी झाली आहे. पाणी प्रश्नावर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीतल्या वादानंतर आज काँग्रेस आणि स्वाभिमानी विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. 

'शिवसेनेचे 17 आमदार भाजपसोबत सत्तेत राहतील'

'शिवसेनेचे 17 आमदार भाजपसोबत सत्तेत राहतील'

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला आहे. कोकणातील संघर्षयात्रेशी आपला काहीही संबंध नसल्याचे राणे म्हणालेत. त्याचवेळी शिवसेनेवर टीका करण्याची संधी सोडली नाही. सत्तेत राहून बाहेर पडण्याची ते भाषा करत आहेत. मात्र, सेनेचे 17 आमदार भाजपसोबत सत्तेत राहतील, असा गौप्यस्फोट केला.

विजय कुमार गावित यांच्या अडचणी वाढल्या

विजय कुमार गावित यांच्या अडचणी वाढल्या

माजी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या मंत्रीपदाच्या स्वप्नांना मोठा झटका बसला आहे. २००४ ते २००९ या काळात गावित मंत्रीपदी असतना आदिवासी विकास विभागात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा ठपका गावितांवर ठेवण्यात आला आहे.

नारायण राणे यांना दिल्लीचे बोलावणे!

नारायण राणे यांना दिल्लीचे बोलावणे!

नाराज ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या मनधरणीचे काँग्रेसकडून पुन्हा प्रयत्न सुरु झाले आहेत. राणे दिल्लीला रवाना झाले आहेत.

'राणे भाजपनंतर कोणत्या पक्षात जाणार?'

'राणे भाजपनंतर कोणत्या पक्षात जाणार?'

काँग्रेस नेते नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. 

पवारांच्या घड्याळाचे काटे यावेळी योग्य दिशेला फिरणार?

पवारांच्या घड्याळाचे काटे यावेळी योग्य दिशेला फिरणार?

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमुळं दिल्लीतलं राजकीय वातावरण तापू लागलंय.

काँग्रेस सरकारच्या षडयंत्रातून अर्धमुक्त - साध्वी प्रज्ञा

काँग्रेस सरकारच्या षडयंत्रातून अर्धमुक्त - साध्वी प्रज्ञा

काँग्रेस सरकारच्या षडयंत्रातून अर्धमुक्त झाले, नऊ वर्ष मी अन्याय सहन केलाय. मुंबई एटीएसकडून माझा छळ करण्यात आला आहे, असा थेट आरोप 8 वर्षानंतर जेल बाहेर आल्यानंतर पत्रकार परिषदेत साध्वी प्रज्ञा सिंग यांनी केलाय.

दिल्लीत पालिका निवडणुकीत  भाजपची बाजी; आप, काँग्रेसचा धुव्वा

दिल्लीत पालिका निवडणुकीत भाजपची बाजी; आप, काँग्रेसचा धुव्वा

येथील महानगरपालिका निवडणुकांच्या बुधवारी जाहीर झालेल्या निकालांमध्ये पुन्हा भाजपने आपली सत्ता काबीज केली आहे. याआधी भाजपची सत्ता होती. ही सत्ता भाजपने पुन्हा राखली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत आम आदमीने भाजपला सुपडा साप केला होता. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक महत्वाची होती. तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. मात्र, केजरीवाल यांना मोठा धक्का बसलाय. 

संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा, सरकारवर जोरदार टीकास्त्र

संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा, सरकारवर जोरदार टीकास्त्र

राज्यातल्या विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा सुरु झाला. कोल्हापूरमधून या संघर्ष यात्रेला सुरुवात झाली. 

'भाजप सरकार घालवायला आघाडी सरकार एवढाही वेळ लागणार नाही'

'भाजप सरकार घालवायला आघाडी सरकार एवढाही वेळ लागणार नाही'

राज्य सरकारला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेनेसह सर्वच पक्ष आक्रमक झालेत.

तीन महापालिका निवडणुकीत कोणी काय कमावलं? काय गमावलं?

तीन महापालिका निवडणुकीत कोणी काय कमावलं? काय गमावलं?

लोकसभा निवडणुकीनंतर भाजपनं सुरू केलेली विजयाची घौडदौड याही निवडणुकीत पहायला मिळाली.

जाणून घ्या, बंद खोल्यांमध्ये काँग्रेसी का करताहेत मोदीची प्रशंसा

जाणून घ्या, बंद खोल्यांमध्ये काँग्रेसी का करताहेत मोदीची प्रशंसा

 दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीवर अजय माकन यांची नियुक्ती झाल्यावर दिल्लीतील काँग्रेसमधील अनेक वरिष्ठ नेत्यांनी स्वतःला दूर करत महापालिका निवडणुकांपूर्वी पक्षातून बाहेरचा रस्ता पकडला आहे. 

प्यायल्या पाण्याला लातूरकर जागले!

प्यायल्या पाण्याला लातूरकर जागले!

काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून लातूरकडे पाहिले जात होते. मात्र, या बालेकिल्ल्याला भाजपने मोठा सुरुंग लावला आहे.