कसा झाला डोंबिवलीतला 'तो' भयंकर स्फोट? अखेर झालं उघड...

कसा झाला डोंबिवलीतला 'तो' भयंकर स्फोट? अखेर झालं उघड...

२६ मे रोजी डोंबिवलीकरांना हादरवून टाकणाऱ्या स्फोटामागचं नेमकं कारण काय होतं? यामागचं खरं कारण आता समोर आलंय.  

कल्याण डोंबिवलीत नवीन बांधकामांवर पुन्हा बंदी? कल्याण डोंबिवलीत नवीन बांधकामांवर पुन्हा बंदी?

कल्याण-डोंबिवली महापालिकेनं घनकचरा व्यवस्थापनाबाबत योग्य त्या उपाययोजना केल्या नसल्यामुळे हायकोर्टानं मनपाला फटकारलं आहे. 

डोंबिवली ब्लास्टमधील जखमींवर आणखी एक संकट डोंबिवली ब्लास्टमधील जखमींवर आणखी एक संकट

डोंबिवली एमआयडीसी येथे प्रोबेस कंपनीत झालेल्या स्फोटात जखमींकडून पैसे घ्या असं सरकारी अधिकाऱ्यांनीच हॉस्पिटल प्रशासनाला सांगितल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. हॉस्पिटल प्रशासनाने वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला होता. पण सरकारी अधिकाऱ्यांनी जखमींकडून पैसे घ्या असे थेट अलिखीत आदेशच दिलेत. त्यामुळे सर्व हॉस्पिटल्सनी जखमींना पैसे भरण्यास सांगितल्याचं सुत्रांनी सांगितलंय. त्यामुळे सर्वच जखमींच्या नातेवाईकांना पैशांसाठी धावपळ करावी लागत आहे. 

चमत्कार! डोंबिवली स्फोटात २ चिमुरड्यांचे प्राण वाचले. चमत्कार! डोंबिवली स्फोटात २ चिमुरड्यांचे प्राण वाचले.

देव तारी त्याला कोण मारी असं म्हणतात, याचा प्रत्यत डोंबिवलीतील पाटील कुटुंबियांना आला.

डोंबिवली स्फोटातील मृतांचा आकडा अकरावर डोंबिवली स्फोटातील मृतांचा आकडा अकरावर

डोंबिवली एमआयडीसीत झालेल्या स्फोटात प्रोबेट कंपनीचे मालक अविनाश वाकटकरांच्या कुटुंबातल्या तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

LIVE UPDATE : डोंबिवलीत केमिकल कंपनीतील स्फोटात ३ ठार, ३७ जखमी LIVE UPDATE : डोंबिवलीत केमिकल कंपनीतील स्फोटात ३ ठार, ३७ जखमी

डोंबिवलीत केमिकल कंपनीतील स्फोटात ३ ठार, ३७ जखमी

डोंबिवलीत वादातून भोईर कुटुंबांवर प्राणघातक हल्ला डोंबिवलीत वादातून भोईर कुटुंबांवर प्राणघातक हल्ला

जमिनीच्या वादातून डोंबिवलीतल्या घेसर गावातल्या भोईर कुटुंबांवर प्राणघातक हल्ला केला गेला. 

ठाणेसह कल्याण-डोंबिवलीला भातसा धरणातून पाणी ठाणेसह कल्याण-डोंबिवलीला भातसा धरणातून पाणी

ठाणे जिल्ह्यातील पाच शहरांना भातसा धरणातून पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. एकूण ५० एमएलडी पाणी पाच शहरांना देण्यात येणार आहे.  

कल्याण-डोंबिवलीकरांवर पाणीसंकट कल्याण-डोंबिवलीकरांवर पाणीसंकट

कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेने आता तीन दिवस पाणी कपात करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता कल्याण-डोंबिवलीकरांवर पाणीकपातीचं संकट ओढावलं आहे.

डोंबिवलीत अतिरिक्त २५ टक्के पाणी कपात डोंबिवलीत अतिरिक्त २५ टक्के पाणी कपात

 डोंबिवलीत अतिरिक्त पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आलाय. 

डोंबिवलीत कवी दत्तात्रय धामणकर यांना बाईकस्वारानं उडवलं डोंबिवलीत कवी दत्तात्रय धामणकर यांना बाईकस्वारानं उडवलं

शहरात धूम स्टाईलनं बाईक चालवणाऱ्यांनी उच्छाद घातलाय. अनेकदा हे तरुण मद्य प्राशन करुन बाईक चालवतात. डोंबिवलीतील ज्येष्ठ नागरीक आणि कवी दत्तात्रय धामणकर यांना अशाच एका भरधाव बाईकस्वारानं उडवलंय.

व्हिडिओ : डोंबिवलीत भरदिवसा मोबाईलच्या दुकानात चोरी व्हिडिओ : डोंबिवलीत भरदिवसा मोबाईलच्या दुकानात चोरी

डोंबिवलीत मोबाईलच्या दुकानात चोरी.

बहिणीची छेड़ काढणाऱ्याला जाब विचारल्याने भावाला लोखंडी रॉडने मारहाण बहिणीची छेड़ काढणाऱ्याला जाब विचारल्याने भावाला लोखंडी रॉडने मारहाण

 आपल्या सख्ख्या बहिणीची छेड़ काढणाऱ्या तिच्याच वर्गातील एका मुलाला जाब विचारायला गेलेल्या भावाला तसंच त्याच्या दोन मित्रांना मारहाण झाल्याची घटना डोंबिवलीत घडलीय.

कल्याणमध्ये फेरीवाल्यांविरोधात व्यापारी आक्रमक, रास्तारोको कल्याणमध्ये फेरीवाल्यांविरोधात व्यापारी आक्रमक, रास्तारोको

 फेरीवाल्यांनी व्यापाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केलाय. याविरोधात व्यापारी आक्रमक झाले असून त्यांनी रास्तारोको आंदोलन केले. तसेच मोर्चाचे आयोजन केलेय.

डोंबिवलीत गोळीबार, मुकेश पाटीलसह ५ जणांना अटक डोंबिवलीत गोळीबार, मुकेश पाटीलसह ५ जणांना अटक

 येथील सोनारपाडामध्ये शिवसेनेच्या नगरसेविकेच्या पतीने सांस्कृतिक कार्यक्रमात गोळीबार केला. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी मुकेश पाटीलसह ५ जणांना अटक केली. 

डोंबिवलीत डॉक्टरांकडून खंडणी उकळणाऱ्यांना अटक डोंबिवलीत डॉक्टरांकडून खंडणी उकळणाऱ्यांना अटक

नॅशनल क्राईम ब्युरोचे सदस्य असल्याची बतावणी करीत डॉक्टरांकडून खंडणी उकळणाऱ्या तिघांना डोंबिवलीतल्या मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. 

डोंबिवलीत चड्डी बनियान गँगचा धुमाकूळ cctv कैद डोंबिवलीत चड्डी बनियान गँगचा धुमाकूळ cctv कैद

सांस्कृतिक आणि सुशिक्षित असणारी डोंबिवली आता दरोड्यांची नगरी, बनू पाहातेय की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. मागील 10 दिवसांत जवळपास 15 दरोड्यांच्या घटना परिसरात घडल्यात. झी 24 तासच्या हाती आणखी एक सीसीटिव्ही फुटेज लागलंय.

कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईत पाऊस कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईत पाऊस

 नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली परिसरात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. आज दुपारी नाशिक शहरातही पाऊस बरसला, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्याच्या दिशेने या पावसाचा जोर होता, हा पाऊस आज दुपारी साडेतीनच्या सुमारास झाला. तर नवी मुंबई, नाशिक, डोंबिवलीत रात्री आठ वाजता जोरदार पाऊस झाला.

केडीएमसी महापौर निवडणूक बिनविरोध, शिवसेनेची बाजी केडीएमसी महापौर निवडणूक बिनविरोध, शिवसेनेची बाजी

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका महापौर निवडणूक अखेर बिनविरोध झाली आहे. भाजपने आपल्या उमेदवाराचा दाखल केलेला अर्ज मागे घेतला. त्यामुळे शिवसेनेचे उमेदावर राजेंद्र देवळेकर हे बिनविरोध निवडून आलेत. या निवडीनंतर सेनेच्या गोठात मोठा उत्साह दिसून येत आहे.

शिवसेना-भाजप युतीचा केडीएमसीतील सत्तेचा फॉर्म्युला निश्चित शिवसेना-भाजप युतीचा केडीएमसीतील सत्तेचा फॉर्म्युला निश्चित

आमचाच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत महापौर बसणार असा दावा भाजपने केला होता. मात्र, त्यांना दुसऱ्या टर्ममधील एक वर्षाचे महापौरपद मिळणार आहे. तर शिवसेनेचा महापौर हा आता केडीएमसीत बसणार आहे. युतीचा सत्तेचा फॉर्म्युला निश्चित झाला आणि त्याच्यावर शिक्कामोर्तबही झाले. त्यामुळे युतीचा तिढा सुटला.

केडीएमसी अपडेट : सेना-भाजपला हवी काँग्रेसच्या 'हाता'ची साथ केडीएमसी अपडेट : सेना-भाजपला हवी काँग्रेसच्या 'हाता'ची साथ

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका महापौरपदाच्या निवडणुकीत प्रत्यक्ष नसली तरी अप्रत्यक्षपणे मदत करावी म्हणून भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना हाताच्या पंजाची साथ हवी आहे. त्यासाठी भाजप-सेनेच्या नेत्यांनी काँग्रेसशी संपर्क साधला आहे.