'एमसीए' निवडणुकीचा राजकीय आखाडा, अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस 'एमसीए' निवडणुकीचा राजकीय आखाडा, अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस

‘एमसीए’च्या द्वैवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. विजय पाटील यांच्या क्रिकेट फर्स्ट पॅनलचा शरद पवारांच्या बाळ महाडदळकर पॅनलशी मुकाबला या निवडणुकीत रंगणार आहे. पाटील यांच्या पॅनलला शिवसेनेनं पाठिंबा जाहीर केल्यामुळे या निवडणुकीतली चुरस वाढलीय. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार महाडदळकर पॅनलचे समर्थक मानले जातात. या गटाकडून शेलार यांनी अर्ज भरल्यास शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी-भाजप अशी ही लढत होईल. तर रिपाइंचे रामदास आठवलेही उपाध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. यामुळे ‘एमसीए'ची निवडणूक हा राजकीय आखाडा बनल्याचं चित्र आहे.