farmer

जागते रहो! टोमॅटो चोरीची भीती, शेतकऱ्याने लढवली अनोखी शक्कल

टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. शेतकऱ्यांना टोमॅटोने मोठा फायदा मिळवून दिला. पण टोमॅटोचे दर भडकल्याने चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रभर शेतात खडा पहारा द्यावा लागत आहे. नाशिक मधल्या एका शेतकऱ्याने टोमॅटो पिकाची राखणदारी करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. 

Aug 4, 2023, 07:52 PM IST

ओडिशामध्ये शेतकऱ्याने पिकवला जगातील सर्वात महागडा आंबा, एका किलोचा भाव तब्बल 3 लाख रुपये

Worlds Most Expensive Mango: ओडिशात (Odisha) एका शेतकऱ्याने जगातील सर्वात महागडा आंबा पिकवला आहे. मियाझाकी असं या आंब्याचं नाव असून, आंतरराष्ट्रीय बाजारात याचा भाव तब्बल 2.5 ते 3 लाख रुपये किलो इतका आहे. वेगळी चव आणि मूल्यामुळे त्याला इतकी किंमत आहे. 

 

Jul 27, 2023, 06:36 PM IST

Maharastra News: दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; दुधाला किमान 34 रुपये लिटर दर जाहीर!

Radhakrishna Vikhe Patil Announcement:  दुधाचा किमान 40 रुपये भाव (Milk Price Rate) मिळावा, अशी मागणी केली जात होती. त्यानंतर आता दुग्ध आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे.

Jul 14, 2023, 07:14 PM IST

...म्हणून मला हेलिकॉप्टर घेऊन द्या; जालना येथील शेतकऱ्याची तहसीलदारांकडे अजब मागणी

शेतकऱ्याने तहसीलदाराकडे केलेली अजब मागणी चर्चेत आली. आजूबाजूचे शेतकरी मला त्यांच्या शेतातून जाऊ देत नाहीत यामुळे  मला हेलिकॉप्टर घेऊन द्या अशी मागणी शेतकऱ्याने केलीय. 

Jul 5, 2023, 07:17 PM IST

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; आता 6 हजारांऐवजी 12000 रुपये मिळणार? सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

PM Kisan Samman Nidhi Yojana: केंद्र सरकार आणखी काही 12 योजना शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर पंतप्रधान मोदी किसान सन्मान योजनेच्या निधीची रक्कम सहा हजारांपासून 12 रुपये करण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.  

Jun 29, 2023, 09:32 AM IST