ऑनलाईन शॉपिंगवर मिळणारा जबरदस्त डिस्काऊंट बंद होणार

ऑनलाईन शॉपिंगवर मिळणारा जबरदस्त डिस्काऊंट बंद होणार

सध्या तुम्ही स्वस्त ऑनलाईन शॉपिंगचा भरपूर आनंद घेत असाल... पण, लवकरच तुमचा हा आनंद संपुष्टात येऊ शकतो. 

एफडीआयच्या मर्यादेत वाढ; मोदी सरकारचा निर्णय

एफडीआयच्या मर्यादेत वाढ; मोदी सरकारचा निर्णय

आज नरेंद्र मोदी सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केलाय. मोदी सरकारनं थेट परकीय गुंतवणुकीच्या (एफडीआय) मर्यादेत वाढ केलीय. 

'रेल्वेत एफडीआयला कडाडून विरोध करणार' - संघटना

'रेल्वेत एफडीआयला कडाडून विरोध करणार' - संघटना

रेल्वेत परकीय गुंतवणूक करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे, या प्रस्तावाला आपण कडाडून विरोध करणार असल्याचं भारतीय रेल्वे राष्ट्रीय संघटनेनं म्हटलं आहे. रेल्वेत परकीय गुंतवणूक झाल्यास सर्व कर्मचारी संपावर जातील, असा इशारा देखिल दिला आहेत.

विकासासाठी थेट परकीय गुंतवणूक आवश्यक - अर्थमंत्री

विकासासाठी थेट परकीय गुंतवणूक आवश्यक - अर्थमंत्री

देशाच्या संरक्षण क्षेत्रात थेट परकी गुंतवणुकीला (एफडीआय) वाव दिल्यानंतर विकासासाठी उत्पादन क्षेत्रात एफडीआय आणण्याची गरज आहे, असे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले.

पाकिस्तानी बँकांच्या शाखा उघडणार भारतात!

पाकिस्तानातील राष्ट्रीय बँकांपैकी दोन बँकांना भारतात आपल्या शाखा उघडण्याची परवानगी मिळाली आहे. पाकिस्तानला भारतात गुंतवणूक करण्याची परवानगी मिळाल्यानंतर या बँकांना परवानगी मिळाली आहे.

लालू म्हणतात, आपसे बडा गुंडा मै हूँ...!

आज दिवसभर ‘एफडीआय’च्या मुद्द्यावर संसदेत जोरदार चर्चा सुरू आहे. एका क्षणी ही चर्चा लालुंच्या भडकण्यामुळे जास्तच गरम झालेली दिसली.

संसदेत सलग चार दिवस कामकाज ठप्प

एफडीआयच्या मुद्दयावर संसदेत पुन्हा गदारोळ झाला. एफडीआयच्या मतदानाच्या मागणीवर भाजप ठाम आहे. या गदारोळात राज्यसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलंय. हिवाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे. संसदेचे सलग चार दिवस कोणतेही कामकाज होवू शकलेले नाही.

... आणि ममतांची झाली फजिती!

हिवाळी अधिवेशन सुरू होताच पहिला दिवस गोंधळामुळेच गाजला. ममतांची अविश्वास प्रस्तावाची तयारी पुरती फसली.

संसदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

संसदेचे हिवाळी अधिवेशनाला सुरूवात गोंधळानेच झाली. वादग्रस्त `एफडीआय`च्या मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या खासदारांनी राज्यसभेत गोंधळ घातल्याने राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. तर तृणमुल काँग्रेसने लोकसभाध्यक्षा मीरा कुमार यांच्याकडे अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली आहे.

युपीएविरोधात ममतादीदी आक्रमक

एफडीआयच्या मुद्यावरून केंद्र सरकार अडचणीत आलं आहे. सरकारविरोधात अविश्वासाचा ठराव आणण्याची घोषणा तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी केलीय.

मोदींचा सोनिया गांधीवर घणाघाती आरोप

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींवर घणाघाती आरोप केलाय. देशातल्या कोळसा घोटाळ्याचे तार सोनिया गांधींपर्यंत पोचत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.

अखेर तृणमूलचा यूपीएशी काडीमोड

तृणमूल काँग्रेसच्या सहा मंत्र्यांनी अखेर पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केलाय. दुपारी साडेचारच्या सुमारास तृणमूलचे मंत्री पंतप्रधानांच्या निवासस्थानी ७ रेसकोर्सला पोहचले.

आज दिल्लीत रंगणार महाभारत...

ममता बनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचे सहा मंत्री आज आपल्या मंत्रिपदांचा राजीनामा देणार आहेत.

मनमोहनवर नाही ‘ममता’... सपाचा दिलासा

गुरुवारी एफडीआयचा अध्यादेश जारी करून एफडीआयच्या निर्णयावर सरकार मागे हटणार नाही असा स्पष्ट संदेश केंद्र सरकारनं घटक पक्षांना दिलाय. ममता बॅनर्जी यांच्या पाठींब्याची पर्वा करता यूपीए सरकारनं हे पाऊल उचललंय.

ममतांना कल्पना दिली होती - पंतप्रधान

तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी युपीए सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी मध्यस्ती करण्याची शक्यता असताना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ममताना आर्थिक सुधारणांचे मोठे निर्णय घेण्यापूर्वी कल्पना दिली होती, असे स्पष्टीकरण दिले आहे.

FDI ला राज ठाकरेंचा पाठिंबा

ज्या चांगल्या गोष्टी असतील त्या तुम्हाला मान्य कराव्याच लागतील, मग तो निर्णय कोणत्या पक्षाचा का असेना! एफडीआय भारतात यायलाच हवं, यासाठी मनसे सरकारला, परदेशी कंपन्यांना पत्र पाठवणार - राज

...तर, भारत सेल्समनचा देश बनेल- जेटली

किरकोळ व्यापार क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीच्या निर्णयावर सध्या पूर्ण देशभरात चर्चा सुरू आहे. विदेशी गुंतवणुकीत ५१ टक्के वाढ केल्याने सामान्य जनतेत आणि राजकीय पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे. भाजपा नेते अरूण जेटली यांनी विदेशी गुंतवणुकीसंदर्भात बोलताना निवेदन केलं, की विदेशी गुंतवणुकीला परवानगी मिळाल्यास भारत ‘सेल्सबॉइज’ किंवा ‘सेल्सगर्ल्स’चा देश बनेल.

डिझेल,एफडीआय विरोधात सेनेचा मोर्चा

डिझेल दरवाढ आणि एफडीआयला विरोध करत शिवसेनेनं शिवाजी पार्क ते प्रभादेवी असा मोर्चा काढलाय. शिवसेना नेता मनोहर जोशी यांच्यासह अनेक नेते आणि शिवसैनिक मोर्चात सहभागी झालेत.

`एम फॅक्टर`मुळे सरकार अडचणीत...

यूपीए सरकारसमोर चार ‘एम’ संकट म्हणून उभे ठाकलेत. मायावती, ममता, मुलायम आणि एम. करूणानिधींनी डिझेलची दरवाढ आणि एफडीआयला विरोध केलाय.

पंतप्रधान काय करत आहेत? - मोदी

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद मोदी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर चांगलच तोंडसुख घेतलं आहे.

विदेशी दुकानदारीला ५१ टक्के सरकारची मान्यता

सरकारने आणखी एक कडक निर्णय घेऊन खळबळ निर्माण केली आहे. कालच डिझेलच्या दरात वाढ आणि गॅसच्या सबसिडी नाकरण्याचा निर्णय केंद्राकडून घेण्यात आले.