दहीहंडीला मुंबईत राडा होण्याची शक्यता

दहीहंडीला मुंबईत राडा होण्याची शक्यता

उद्याच्या दहीहंडीला मुंबईत राडा होण्याची शक्यता आहे. एकीकडे सरावात जेवढे थर लावले, तेवढे थर लावणारच, असा गोविंदा पथकांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे कोर्टाच्या नियमांचं काटेकोर पालन करण्यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केलीय. 

दिग्विजय सिहांना 'व्हेलेन्टाईन डे'साठी हवंय कर्ज!

दिग्विजय सिहांना 'व्हेलेन्टाईन डे'साठी हवंय कर्ज!

१४ फ्रेब्रुवारी... व्हॅलेन्टाईन डे... प्रेम व्यक्त करण्याचा दिवस... हा दिवस आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर साजरा करण्याचे प्रत्येकाचे फंडे वेगवेगळे असतात.

'जयपूर फेस्ट'मध्ये डॉ. सुभाष चंद्रा यांची प्रकट मुलाखत

'जयपूर फेस्ट'मध्ये डॉ. सुभाष चंद्रा यांची प्रकट मुलाखत

जयपूरमध्ये आजपासून साहित्यिकांचा महाकुंभ भरलाय. यामध्ये एस्सेल ग्रुपचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा यांच्या आत्मकथेचं प्रकाशन इथे होतंय. 

महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायम, हायकोर्टाने याचिका फेटाळली

महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायम, हायकोर्टाने याचिका फेटाळली

बकरी ईद करता २५, २६ आणि २७ सप्टेंबर या तीन दिवशी गोवंश हत्या आणि विक्रीकरता परवानगी द्यावी अशा मागणीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळलीये. 

'बकरी ईद'च्या निमित्तानं बकऱ्यांचीही ऑनलाईन खरेदी!

'बकरी ईद'च्या निमित्तानं बकऱ्यांचीही ऑनलाईन खरेदी!

बकरी ईदच्या मुहूर्तावर कुर्बानी देण्यासाठी बकरा खरेदी करण्यासाठी आता खरेदीदारांना बाजारात जाण्याची आवश्यकता भासणार नाही. कारण घरबसल्या केवळ एका क्लिकवर आता ऑनलाईन बकऱ्यांचीही खरेदी करता येणार आहे.

मुंबईत आज 'गोविंदा रे गोपाळा'

मुंबईत आज 'गोविंदा रे गोपाळा'

सर्व बालगोपाळा ज्या दिवसाची आतुरतेनं वाट पाहत असतात तो दिवस आलाय. मुंबई ठाण्यासह सर्वत्र गोविंदा पथकं दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झालेत.

ऐश्वर्या राय-बच्चनची कान फेस्टिवलमध्ये गोची

ऐश्वर्या राय-बच्चनला हॉलिवूडमध्ये एन्ट्री मिळाल्यापासून, तिची कान फेस्टिवलमधील रेड कार्पेटवरील पोज नेहमीच लोकांना भावून गेली. यातच `लॉरिअल` ब्रँडची ऐश्वर्या ब्रॅन्ड अॅम्बेसेडर झाल्यापासून, तिनं गेले काही वर्ष `लॉरिअल`चे प्रीतिनिधित्व कान फेस्टिवलमध्ये केलं.

ट्वीटरवर कल्पनारम्य महोत्सव

सोशल मीडियामधील ट्वीटरप्रेमींना १२ मार्चपासून स्वता:चे किस्से किंवा कथा सांगण्याची एक अद्वितीय संधी मिळणार आहे.

`आंगणेवाडी जत्रा...` चैतन्यानुभवाचा सोहळा

‘व्हॉटस अप’वर एक इमेज रिसीव्ह झाली. ‘येतंस मा आंगणेवाडीक जत्रेक...’ मन गलबलून आलं. ज्याचा शोध माझं मन घेत होत. त्या प्रश्नाचा उत्तर मला माझ्या मोबाईलनं दिलं होतं. होय आंगणेवाडी जत्रा. वर्षानुवर्ष सुरु असलेला माझ्या कोकणचा महाकुंभ..

गुड न्यूज : रेशनिंगवर साखर १३ रूपये ५० पैसे किलोने

दिवाळीच्या तोंडावर सरकारनं सामान्य नागरिकांसाठी खरोखरच गुड न्यूज दिली आहे. रेशनिंगवर साखर उपलब्ध करून देण्यासाठी खुल्या बाजारातून साखर खरेदी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, स्वस्त कांदा देण्याचा निर्णय घेतलाय.

दिवाळीच्या मुहूर्तावर प्रवाशांची लूट!

दिवाळीच्या सणांमुळे खाजगी टूर-ट्रॅव्हल्स कंपन्या प्रवाश्यांची लूट करताना दिसत आहेत. नाशिकमधून गुजरातला जाण्यासाठी ट्रेन नसल्याने ट्रव्हल्स कंपन्या दुप्पट ते तिप्पट भाड्याची आकारणी करण्यात येतेय.

लाडाची गौराई आली घरा!

बुधवारी संपूर्ण महाराष्ट्रात गौरींचं मोठ्या थाटामाटात आगमन झालंय. गणेश भक्तांनी गौराईला मोठ्या मानानं गणपतीच्या बाजूला स्थान दिलं.

‘पोळा’ सणावर महागाईचं सावट!

पोळा.. बळीराजासाठी सगळ्यात महत्वाचा सण... यंदा मात्र महागाई आणि अतिवृष्टीमुळं हा सण कसा साजरा करावा असा प्रश्न बळीराजाला पडलाय. शेतकऱ्यांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा, पारंपारिक आणि लोकसंस्कृतीचा वारसा असलेल्या पोळा सणावर यंदा महागाई आणि ओल्या दुष्काळाचं सावट आहे.

सण आयलाय गो...नारळी पूनवेचा!

सण आयलाय गो नारळी पूनवेचा... असं म्हणत कोकणात सध्या नारळी पौर्णिमेची लगबग सुरु आहे. नारळी पौर्णिमेला नारळ समुद्राला अर्पण केल्यानंतर मासेमारीला सुरुवात होते.

उत्सवांवर दहशतवादाचं सावट, मुंबईत 'हाय अलर्ट'!

मुंबईत १५ ऑगस्ट आणि सणांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई पोलिसांनी सतर्कतेचा इशारा दिलाय..सणानिमित्त लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येतात..दहशतवाद्यांकडून त्याचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता नाकारताय येत नाही...

रांगोळीच्या रंगांची शिकवण...

घराची, दाराची सजावट करण्यासाठी म्हणून रांगोळी रेखाटली जात नाही... तर घरापासून नकारात्मक गोष्टींना दूर ठेवण्यासाठी ही रांगोळी काढली जाते. वातावरणात सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही ऊर्जा असतात. त्यातून सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये समावून घेऊन त्याच पद्धतीनं विचार करण्याची शिकवण रांगोळीच्या माध्यमातून दिली जाते. आशावादी राहण्यातून घराची भरभराट होते असा समज आहे.

'डोलची'शिवाय नाही धुळ्यातली धुळवड

धुळ्याच्या भांडी बाजारात होळीनिमित्त डोलची बनवण्याची धावपळ सुरू आहे. खानदेशात डोलचीशिवाय होळीच्या रंगांची उधळणच केली जात नाही.