`हिट अँड रन` प्रकरणात सलमानला दिलासा

Last Updated: Tuesday, January 28, 2014, 13:55

`हिट अँड रन` प्रकरणात सलमान खानला राज्य सरकारकडून दिलासा मिळालाय. या प्रकरणाची फेरसुनावणी करण्याचा निर्णय सत्र न्यायालयानं दिला होता. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यास राज्य सरकारनं नकार दिलाय.

‘हीट अँड रन’ सलमानला दिलासा, नव्यानं होणार सुनावणी

Last Updated: Thursday, December 05, 2013, 15:28

हीट अँड रन प्रकरणात यापुढं सलमान खानवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याअंतर्गत नव्यानं खटला चालवला जाणार आहे. या संदर्भातला अर्ज सलमान खाननं सत्र न्यायालयात दाखल केला होता. न्यायालयानं हा अर्ज मंजूर करून घेतलाय. त्यानुसार २३ डिसेंबरपासून नव्यानं खटल्याची सुनावणी होणार आहे.

अभिनेता सलमानचा मुंबईत चक्क सायकवरून प्रवास

Last Updated: Wednesday, November 13, 2013, 11:41

११ वर्षांपूर्वीच्या हिट एंड रन प्रकरणी सलमान खानने चांगलाच धडा घेतलेला दिसून येत आहे. सलमान मुंबईत सध्या रात्रीचा फिरताना गाडीचा वापर न करता आता सायकलचा वापर करीत आहे. नरिमन पॉईंटवर त्याने चक्क सायकवरून प्रवास केला.

कोर्टाने उतरवला सलमान खानचा तोरा !

Last Updated: Saturday, July 20, 2013, 11:43

न्यायालयात दबंगगिरी करीत पब्लिकमध्ये गप्पा मारत बसलेल्या सलमानला न्यायाधीशांनी थेट आरोपीच्या पिंजर्‍यात पाठवून त्याला त्याची जागा दाखविली. पब्लिकसाठी असलेल्या जागेवरून ऊठ आणि आरोपीच्या पिंजर्‍यात जाऊन बस’,असे न्यायाधीशांनी सुनावताच सलमानची दबंगगिरी एका क्षणात उतरली.

सलमान खानची २४ जुलैला सुनावणी

Last Updated: Friday, July 19, 2013, 14:04

अभिनेता सलमान खानच्या हीट अँण्ड रनप्रकरणी मुंबई सेशन कोर्टानं आजची सुनावणी पुढे ढकलली आहे. आता २४ जुलैला सुनावणी होणार आहे.

सलमानला होऊ शकतो १० वर्षांचा तुरुंगवास!

Last Updated: Monday, June 24, 2013, 16:42

११ वर्षांपूर्वीच्या हिट एंड रन प्रकरणी आज सत्र न्यायालयाने सलमान खानचं अपील फेटाळून लावलं आहे. त्यामुळे सलमान खानला १० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

सलमानवर सदोष मनुष्यवधाचा खटला

Last Updated: Monday, March 25, 2013, 10:10

बॉलीवुडचा दबंग सलमान खानसाठी महत्वाचा आजचा दिवस आहे.२००२ साली झालेल्या हिट एंड रन प्रकरणी सलमानच्या याचिकेवर सेशन कोर्टात सुनावणी होणार आहे. वांद्रे कोर्टाने याप्रकरणी सलमानच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा खटला चालवण्याचा आदेश दिला.

कार अपघात : अंधेरीतून ड्रायव्हला अटक

Last Updated: Monday, February 18, 2013, 13:37

मुंबईतील अंधेरीत हिट एन्ड रनचं प्रकरणी फरार झालेल्या ड्रायव्हरला वर्सोवा पोलिसांनी अटक केलीये. त्याच्याकडून मर्सिडिझ कारही जप्त करण्यात आलीये.

‘अपघाताबाबत सलमानला होती पूर्वकल्पना’

Last Updated: Friday, February 08, 2013, 11:05

अभिनेता सलमान खान याला अपघाताबाबत ‘पूर्वकल्पना’ असतानाही त्यानं बेदरकारपणे ड्रायव्हिंग केल्यानं झालेल्या अपघातात एकाला आपला जीव गमवावा लागला, अशा शब्दांत न्यायालयानं त्याच्यावर ताशेरे ओढलेत.

सलमान १० वर्षांसाठी जाऊ शकतो तुरुंगात...

Last Updated: Friday, February 01, 2013, 08:08

सिने अभिनेता सलमान खान याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा खटला चालणार आहे. २००२ साली झालेल्या ‘हिट अॅन्ड रन’ प्रकरणी त्याच्याविरोधात हा खटला चालणार आहे. या खटल्यात सलमान १० वर्षांसाठी तुरुंगातही जाऊ शकतो

मुंबईत पुन्हा एकदा `हिट अॅन्ड रन`

Last Updated: Wednesday, January 23, 2013, 09:57

मुंबईत पुन्हा एकदा हिट अॅन्ड रनचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय. पवईमध्ये झालेल्या या भीषण अपघातात एका भावाला आणि बहिणीला आपला जीव गमवावा लागला.

सलमानला पाठिशी घालतायेत पोलीस

Last Updated: Saturday, November 03, 2012, 16:01

निवृत्त सनदी अधिकारी वाय. पी. सिंग यांनी अभिनेता सलमान खान याच्यावर टीका केली आहे. सलमानच्या हिट रन प्रकरणी अनेक निष्पाप लोकांना प्राण गमवावे लागले होते.

झी २४ तासचा दणका; जेलर जेलबाहेर

Last Updated: Wednesday, June 06, 2012, 16:08

‘झी 24 तास’च्या दणक्यानंतर अखेर एलिस्टर परेराची बडदास्त ठेवणाऱ्या नाशिक प्रभारी तुरुंग अधिकाऱ्याकडून पदभार काढून घेण्यात आलाय. यानंतर तब्बल ८ महिन्यानंतर नाशिकच्या जेलला पूर्णवेळ जेलर मिळू शकणार आहेत.

नाशिक कारागृहात आरोपीची शाही बडदास्त

Last Updated: Saturday, June 02, 2012, 03:02

मुंबईच्या हीट एन्ड रन प्रकरणातील आरोपी एलिस्टर परेराला नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शाही बडदास्त मिळतंय. जेलमध्येही त्याला रपेट मारण्यासाठी मर्सिडीज पुरवली जाते. या शाही वागणुकीचा झी 24 तासनं पर्दाफाश केल्यानंतर, गृहराज्यमंत्र्यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

जॉनचा १५ दिवस तुरुंगवास कायम!

Last Updated: Friday, March 09, 2012, 09:42

२००६ मध्ये घडलेल्या हिट अँन्ड रन केसमध्ये जॉन अब्राहमची याचिका सेशन कोर्टांनं फेटाळलीय. या प्रकरणात बांद्र्याच्या कोर्टानं जॉनला 15 दिवसांची कारावासाची शिक्षा सुनावली होती. सध्या जॉन पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्या याचिकेवर पावणेतीन वाजता सुनावणी होणार आहे.

परेराला कळलं की कानून के हाथ लंबे होते है

Last Updated: Monday, January 16, 2012, 11:25

एलिस्टर परेरानं अखेर कोर्टात शरणागती पत्करली आहे. सुप्रीम कोर्टानं एलिस्टर परेराला हिट एण्ड रनच्या गुन्ह्यात जामीन फेटाळत तीन वर्षाची शिक्षा कायम ठेवली होती.