india against corruption

भ्रष्टाचार विरोधात नवीन हत्यार 'शून्य रुपया नोट्स'

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी तसेच याविरोधात एक चांगले हत्यार असावे म्हणून 5th Pillar volunteers संस्थेचे एक नवे पाऊल 'शून्य रुपया नोट्स' असणार आहे.

Mar 18, 2016, 03:04 PM IST

मुकेश अंबानींच्या घरात घुसण्याचा प्रयत्न

उद्योगपती मुकेश अंबानी यांचा काळा पैसा स्वीस बॅंकेत ठेवण्यात आला आहे, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केल्यानंतर अंबानी यांचा काळापैसा त्वरीत भारतात आणावा आणि सरकारकडे सोपवावा, अशी मागणी इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यांकडून केली. यावेळी काही कार्यकर्ते अंबानींच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला.

Nov 11, 2012, 04:49 PM IST

असीम त्रिवेदी यांची जेलमधून सुटका

व्यंगचित्रकार असीम त्रिवेदी यांची अखेर तिस-या दिवशी आर्थर रोड जेलमधून सुटका झालीय. मुंबई हाटकोर्टानं जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची आज सुटका करण्यात आली.

Sep 12, 2012, 01:48 PM IST

‘कार्टुनिस्ट त्रिवेदी देशद्रोही नाहीत तर देशप्रेमी’

वादग्रस्त कार्टूनप्रकरणी अटकेत असलेल्या व्यंगचित्रकार असीम त्रिवेदींना २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय.

Sep 11, 2012, 08:54 AM IST

व्यंगचित्रकार असीम त्रिवेदींना अटक

मुंबईत व्यंगचित्रकार असीम त्रिवेदी यांना अटक करण्यात आलीय. भारतीय राजमुद्रेसंदर्भात आक्षेपार्ह व्यंगचित्र काढल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यासंदर्भात बीकेसी पोलिसांनी असीम त्रिवेदीला अटक केलीय.

Sep 9, 2012, 09:18 PM IST

केजरीवाल यांच्यावर गुन्हा दाखल

टीम अण्णांच्या काही सदस्यांनी दिल्लीमध्ये केलेल्या आंदोलनाबद्दल दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया, प्रशांत भूषण, नीरज कुमार आणि गोपाळ राय या टीम अण्णामधील सदस्यांवर दंगल भडकवण्याचा गुन्हा नोंदवला गेला आहे.

Aug 28, 2012, 08:15 AM IST

आंदोलनाचा हेतू साध्य – केजरीवाल

संसद, पंतप्रधान कार्यालय, सोनिया गांधींचे निवासस्थान, भाजप कार्यालय या सर्वच ठिकाणी केजरीवाल समर्थकांनी घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी बॅरिकेट्स तोडण्यात आले, तसच सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Aug 26, 2012, 05:30 PM IST

टीम अण्णा सदस्यांना पोलिसांनी रोखलं...

कोळासा खाण घोटाळ्याप्रकरणी पंतप्रधानांच्या निवासस्थाबाहेर घेराव घालण्यापूर्वीच माजी टीम अण्णांच्या सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

Aug 26, 2012, 07:47 AM IST

आत्महत्या नाही तर बलिदान - केजरीवाल

गेल्या आठवड्यापासून म्हणजेच 26 जुलैपासून टीम अण्णा सदस्य उपोषणाला बसले आहेत. अण्णा हजारे हजारे या उपोषणात पाचव्या दिवसापासून सहभागी झाले असले तरी टीम अण्णा सदस्यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. या आंदोलनाची धुरा सांभाळणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना अशक्तपणा जाणवू लागलाय.

Aug 1, 2012, 04:39 PM IST

अण्णांनी मागितली माफी, 'आंदोलन इथेच थांबवेन'

टीम अण्णांच्या वतीने अण्णा हजारे यांनी माफी मागितली आहे. अण्णा हजारे यांनी पत्रकारांची माफी मागितली, आणि दु:खही व्यक्त केलं. अण्णांच्या समर्थकांनी मीडियाशी हुल्लडबाजी केल्याने अण्णांनी स्वत: माफी मागितली आहे.

Jul 31, 2012, 04:08 PM IST

'जंतर-मंतर'वरून गर्दी 'छू मंतर'!

अण्णा हजारे आणि त्यांच्या टीमने पुकारलेल्या आंदोलनाला थंड प्रतिसाद मिळतोय. गेल्या वर्षी याच जंतरमंतरवर अण्णांनी लोकपालची लढाई सुरु केली होती. त्यांच्या यावेळच्या आंदोलनाला मात्र तुलनेने अत्यंत कमी प्रतिसाद मिळतोय.

Jul 26, 2012, 08:47 PM IST

'फेसबूक'वरून 'टीम अण्णा'मध्ये वितुष्ट

भ्रष्टाचाराविरोधात लढा उभारणा-या टीम अण्णांमध्ये पुन्हा एकदा वितुष्ट निर्माण झाल्याचं समोर आलंय. टीम अण्णा सदस्य शिवेंद्र सिंह चौहान यांनी अरविंद केजरीवाल यांच्या कार्यपद्धतीवर हल्लाबोल केलाय.

May 25, 2012, 02:16 PM IST

टीम अण्णांचं आता 'द अण्णा एसएमएस कार्ड'

भ्रष्टाचार विरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेबद्दल जनसामान्यांना माहिती उपलब्ध करून देण्यासाठी टीम अण्णांनी अखिल भारतीय एसएमएस कार्ड सुरू केलं आहे. टीमने या पहिल्या चरणात २५ रुपये किमतीची १ कोटी कार्ड्स उपलब्ध केली आहेत.

Apr 7, 2012, 11:28 AM IST

अण्णागिरी नंतर आता फ्लॅश मॉब

नागपुरात एका नागरी संघटनेने अण्णा आणि त्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या लढ्याला समर्पित एका फ्लॅश मॉबचं आयोजन करण्यात आलं आहे. नागपुरातल्या तेलंगखेडी तलाव परिसरात दुपारी ३ ते सांयकाळी ५ वाजपर्यंत हा फ्लॅश मॉब आयोजीत करण्यात आला आहे

Dec 29, 2011, 07:26 PM IST