नागरिकांनो, आणखीन एक नोट येतेय चलनात

नागरिकांनो, आणखीन एक नोट येतेय चलनात

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच २० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणणार आहे. 

कोहली-कुंबळे वादावर बोलले अनुराग ठाकुर

कोहली-कुंबळे वादावर बोलले अनुराग ठाकुर

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि माजी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबले यांच्यातील वादावर भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआयचा माजी 'बॉस' अनुराग ठाकुरने वक्तव्य केलं आहे. अनुराग ठाकुर म्हणतात की, टीम ही कर्णधारची असते म्हणून खऱ्या अर्थाने हा संघाचा बॉस तोच असला पाहिजे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून शरद पवार मोदींच्या भेटीला

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून शरद पवार मोदींच्या भेटीला

राज्यात सुरू असलेल्या शेतकरी संपाच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींची भेट घेतली आहे. 

भरमसाठ फी घेणारे मेडिकल कॉलेज अडचणीत

भरमसाठ फी घेणारे मेडिकल कॉलेज अडचणीत

खासगी वैद्यकीय शिक्षण संस्थांनी सरकारला जुमानले नाही तर मान्यता रद्द करण्याचा सज्जड इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी 'झी २४ तास'च्या रोखठोक कार्यक्रमात दिलाय. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी अव्वाच्या सव्वा फी आकारली आणि नीटचे नियम डावलून प्रवेश दिले तर इमारत ताब्यात घेऊन मान्यता रद्द करणार असल्याचं महाजनांनी सांगितलंय. यामुळं आडमुठं धोरण राबवणा-या शिक्षणसम्राटांचं धाबं दणाणलं आहे.

गरज आहे  तिथे शिवसेना हात उचलणार - संजय राऊत

गरज आहे तिथे शिवसेना हात उचलणार - संजय राऊत

 एअर इंडियाने आमच्या खासदाराला फ्लाईटवर बॅन करण्याचे निर्देश देण्यात आले त्याच तातडीने एअर इंडियाने त्यांच्या सर्व्हिस सुधारण्याचे निर्देश दिले असते तर बरं झाले असतं, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एअर इंडियाला धारेवर धरले आहे. 

ठाणे महापालिकेत तिजोरीच्या चाव्यासाठी सेनेची कसरत...

ठाणे महापालिकेत तिजोरीच्या चाव्यासाठी सेनेची कसरत...

ठाणे पालिकेवर शिवसेनेची बहुमताने सत्ता आली असली तरीही पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या हातात ठेवण्यासाठी बहुमत असल्यानंतर ही शिवसेनेला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. 

नाशिकमध्ये शिवसेना दाखवणार भाजपला 'पारदर्शकता'

नाशिकमध्ये शिवसेना दाखवणार भाजपला 'पारदर्शकता'

भाजपचं बहुमत असलेल्या नाशिक महापालिकेत आता पारदर्शकता काय असते ते दाखविण्यासाठी शिवसेना सज्ज झाली आहे. गटनेता निवडत असतांना शिवसेना नेत्यांनी आपली भूमिका महापलिकेत परखड विरोधकांची असल्याचं स्पष्ट केलं आहे.

नाशिकमधील अतिक्रमण मोहिम थांबवण्याचा प्रयत्न होतोय का?

नाशिकमधील अतिक्रमण मोहिम थांबवण्याचा प्रयत्न होतोय का?

डी.एस.अहिरे यांच्या लेटर हेडवर निवडणूक आयोगाकडे नाशिकच्या भंगार बाजाराचे अतिक्रमण आचारसंहितेत काढू नये अशी मागणी करण्यात आली होती. 

राहुल गांधींनी घेतली पंतप्रधानांची भेट

राहुल गांधींनी घेतली पंतप्रधानांची भेट

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.

नोटबंदीनंतर सरकारचा १०० च्या नोटेसंदर्भात मोठा निर्णय

नोटबंदीनंतर सरकारचा १०० च्या नोटेसंदर्भात मोठा निर्णय

 रिझर्व बँक ऑफ इंडिया लवकरच १०० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणणार आहेत. या नोटा इनसेट लेटर शिवाय आणि मोठ्या ओळख चिन्हांच्या असणार आहेत. रिझर्व बँक लवकरच महात्मा गांधीच्या श्रृंखलाच्या २००५ च्या नोटा चलनात आणणार आहेत. 

काश्मीरच्या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक

काश्मीरच्या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक

काश्मीर मुद्यावर सर्वपक्षीय मत विचारात घेतलं जाणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

...या बाबतीत मेरी कोम ठरली सचिनपेक्षा बेहत्तर!

...या बाबतीत मेरी कोम ठरली सचिनपेक्षा बेहत्तर!

सचिन तेंडुलकरला जे करायला तीन वर्ष लागले... ते मेरी कोमनं तीन महिन्यांत करून दाखवलंय. 

अखंड महाराष्ट्राच्या मुद्यावर ठाकरेंची नवी खेळी?

अखंड महाराष्ट्राच्या मुद्यावर ठाकरेंची नवी खेळी?

विधानसभेत वेगळ्या विदर्भाच्या मागणीनंतर आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर शिवसेनेलाही आयती संधी मिळालीय. 

खडसेंवरील आरोपामुळे मोदी संतापले

खडसेंवरील आरोपामुळे मोदी संतापले

महसूलमंत्री एकनाथ खडसेंवर होत असलेल्या आरोपांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीही संतापले आहेत

काळा पैसा भारतात परत येणार ?

काळा पैसा भारतात परत येणार ?

4 जूनपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वित्झर्लंडसह पाच देशांच्या दौ-यावर जाणार आहेत.

 पनामात नाव आल्यानंतर अमिताभ यांचं पहिलं स्पष्टीकरण

पनामात नाव आल्यानंतर अमिताभ यांचं पहिलं स्पष्टीकरण

जगातील सर्वात गोपनीय पद्धतीने काम करणारी पनामा कंपनी मोसाक फोसेंकाचे कागदपत्र लिक झाले आहेत, यात १२ राष्ट्राध्यक्षांसह, ६० पेक्षा जास्त मोठ्या हस्तींच्या अकाऊंटची माहिती समोर आली आहे.

कन्हैय्याला पुण्यात न बोलावण्याच्या धमकीनंतर गुन्हा दाखल

कन्हैय्याला पुण्यात न बोलावण्याच्या धमकीनंतर गुन्हा दाखल

रानडे इन्स्टीट्यूटच्या विद्यार्थ्यांना कन्हैया कुमारला न बोलावण्याबाबत धमकावण्यात आल्याचाही गुन्हा दाखल झाला आहे. 

'अब की बार फक्त डान्स बार'

'अब की बार फक्त डान्स बार'

राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर टीका

आंध्रात आरक्षणाच्या मुद्यावरून रेल्वे पेटवली

आंध्रात आरक्षणाच्या मुद्यावरून रेल्वे पेटवली

आंध्र प्रदेशात आरक्षण मुद्यावरून रेल्वे पेटवून दिल्याची घटना घडली आहे. कापू समाजाच्या सदस्यांनी मागासवर्गीय प्रवर्गाअंतर्गत आरक्षणाची मागणी केली आहे.  आंदोलनाला रविवारी हिंसक वळण मिळाले. 

'अतुल्य' भारत 'असहिष्णु' कसा काय झाला; अनुपम खेर यांचा आमिरवर हल्लाबोल

'अतुल्य' भारत 'असहिष्णु' कसा काय झाला; अनुपम खेर यांचा आमिरवर हल्लाबोल

 'भारतात असहिष्णुता वाढतेय, त्यामुळेच माझ्या पत्नीनं भारत सोडून दुसऱ्या देशात जाण्याचा सल्ला दिला होता' असं वक्तव्य करणाऱ्या अभिनेता आमिर खानवर आता अभिनेते अनुपम खेर यांनी पलटवार केलाय. 

कोल्हापूर महापालिका निवडणुकीत भाजपचा टोलमाफी मुद्याला 'खो'

कोल्हापूर महापालिका निवडणुकीत भाजपचा टोलमाफी मुद्याला 'खो'

कोल्हापूर महापालिका निवडणुकीत भाजपाच्या जाहीरनाम्यामध्ये टोलमाफीचा मुद्दा नसल्याबद्दल शहरात आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय. भाजपने काल हा जाहीरनामा प्रकाशित केला.