अण्णा म्हणाले, 'टीम अण्णा संपली'

टीम अण्णांची कोअर कमिटी बरखास्त करण्यात आली आहे. कोअर कमिटीचा कार्यकाळ संपल्याची घोषणा अण्णांनी आपल्या ब्लॉगवर केली आहे. आपण राजकीय पक्षाची स्थापना करणार नसल्याचंही अण्णांनी आपल्या ब्लॉगवर स्पष्ट केलं आहे.

अण्णा दिल्लीकडे रवाना

भ्रष्टाचाराच्या मुद्यावर टीम अण्णा पुन्हा आक्रमक झालीय. उद्यापासून टीम अण्णांचं जंतरमंतरवरच्या नियोजित आंदोलनाला सुरूवात होणार आहे. यासाठी आज सकाळीच अण्णा दिल्लीकडे रवाना झालेत.

अण्णा हजारेंचा एल्गार, सरकार मूकबधीर आहे

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सक्षम लोकपाल बिलासाठी पुन्हा एल्गार पुकारला आहे. केंद्रातलं सरकार हे मूकबधिर आणि संवेदनाहीन असल्याचा घणाघात अण्णांनी केला आहे. जंतरमंतरवर जाण्याआधी अण्णांनी राजघाटवर महात्मा गांधींच्या समाधीचं दर्शन घेतलं.

जंतरमंतरवर अण्णा धरणार धरणं

हिवाळी अधिवेशनात जनलोकपाल बिल पास न झाल्यास पुन्हा एकदा आंदोलन करण्याची तयारी अण्णा हजारे यांनी सुरू केली, पण त्याआधी जनलोकपाल संमत करण्याआधी आपणा भारतीयांची एकजूट किती आहे हे दाखविण्यासाठी अण्णा पुन्हा एकदा जंतरमंतरवर एक दिवसाचं धरणं आंदोलन करणार आहेत.