पाकिमध्ये कसाबसाठी नमाज पठण

Last Updated: Sunday, November 25, 2012, 12:52

पाकिस्तानमध्ये लष्कर ए तोयबाचा संस्थापक हफिज सईद याने, फासावर लटकवलेला दहशतवादी अजमल कसाबसाठी नमाज ए जनाजा अदा केली. यावेळी हजारो लोक उपस्थित होते, असं वृत्त पाकिस्तानातल्या वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केलंय.

`भारताचा दावा खोटा... पाकिस्तानला मिळालं पत्र`

Last Updated: Wednesday, November 21, 2012, 17:55

‘भारतानं अजमल कसाबच्या फाशीसंदर्भातील निर्णयाचं पत्र पाठवलं होतं आणि आम्ही त्याचा स्वीकारही केला’ असं म्हणत पाकिस्ताननं भारतानं केलेला दावा फेटाळून लावलाय.

कसाब... आमचा हिरो!

Last Updated: Wednesday, November 21, 2012, 16:37

क्रूरकर्मा कसाबला फासावर चढवल्याची बातमी समजल्यानंतर ‘लष्कर – ए – तोयबा’ या दहशतवादी संघटनेनं आगपाखड केलीय.

`जल्लादालाही माहित नव्हतं की तो कुणाला फाशी देणार आहे`

Last Updated: Wednesday, November 21, 2012, 15:22

अजमल कसाबला फासावर लटकवणार हे निश्चित झालं होतं. पण ही फाशी कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता गुप्त पद्धतीनं देण्यात आली. साहजिकच, या गुप्ततेचा भंग होऊ नये, यासाठी सुरक्षा यंत्रणांना कमालीची काळजी घ्यावी लागली.

कसाबचा मृतदेह पाकने मागितलाच नाही- शिंदे

Last Updated: Wednesday, November 21, 2012, 11:12

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दोषी पाकिस्तानचा क्रुरकर्मा अजमल कसाब याला आज बुधवारी सकाळी साडेसात वाजता पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आल्याची माहिती नवी दिल्ली केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी दिली आहे.

दहशतवाद्यांना कठोर संदेश - उज्ज्वल निकम

Last Updated: Wednesday, November 21, 2012, 10:59

कसालाला फाशी देऊन दहशतवाद्यांना कडक संदेश दिला गेल्याचं उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय. सरकारच्या वतीनं निकम यांनी २६/११चा खटला कसाबच्या विरुद्ध लढला होता.

कसाबची शेवटीची इच्छा काहीच नाही

Last Updated: Wednesday, November 21, 2012, 13:07

कसाबला आज सकाळी फार गुप्ततेत फाशी देण्यात आली, असली तरी काही बातम्या आता समोर येत आहे. कसाबला फाशी देताना विचारण्यात आले की, अंतीम इच्छा काय आहे. त्यावर त्याने आपली अंतीम इच्छा काहीच नाही, किंवा आपण काय करू इच्छितो असे त्याने काहीच सांगितले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबईकरांनी व्यक्त केले समाधान

Last Updated: Wednesday, November 21, 2012, 11:19

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दोषी पाकिस्तानचा क्रुरकर्मा अजमल कसाब याला आज बुधवारी सकाळी साडेसात वाजता पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आल्याचे कळताच मुंबईतील विविध क्षेत्रातील व्यक्तींनी या फाशीचे स्वागत केले आहे.