local

मुंबई : मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई : मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांच्या दुरूस्ती आणि देखभालीसाठी मध्य रेल्वे मार्गावरील मेन लाईन आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना मात्र आनंदाची बातमी असून, या मार्गावर कोणत्याही प्रकारचा मेगाब्लॉक असणार नाही.

Oct 29, 2017, 08:29 AM IST
मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक, हार्बर, ट्रान्स हार्बर नियमित

मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक, हार्बर, ट्रान्स हार्बर नियमित

रविवारच्य सुट्टीचे प्लॉनिंग करून घराबाहेर पडणाऱ्या मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील प्रवाशांना मेगाब्लॉकचा अडथळा येणार आहे. तर, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक रद्द झाल्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.

Oct 22, 2017, 08:51 AM IST
पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल रद्द केल्याने प्रवाशांचा रेलरोको

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल रद्द केल्याने प्रवाशांचा रेलरोको

नायगाव स्थानकात संतप्त प्रवाशांनी अर्धा तास रेल रोखून धरल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. नायगाव स्थानकावर आल्यानंतर प्रवाशांना लोकल रद्द करण्यात आलेचे समजताच प्रवाशी संतप्त झालेत आणि त्यांनी रेलरोको आंदोलन केले.

Oct 7, 2017, 10:01 AM IST
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर ट्रेनचे डबे घसरले

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर ट्रेनचे डबे घसरले

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर लोकल ट्रेनचे दोन डबे घसरले आहेत.

Oct 1, 2017, 05:05 PM IST
तिसरे अपत्य असणारे जोडपे सरकारी नोकरीस अपात्र; निवडणुकीतूनही बाद

तिसरे अपत्य असणारे जोडपे सरकारी नोकरीस अपात्र; निवडणुकीतूनही बाद

'दोघात तिसरा आता सगळं विसरा' ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. पण, ही म्हण तुम्हाला आता काहीसा बदल करून 'दोघात तिसरा सरकारी नोकरी विसरा', अशी ऐकावी लागणार आहे. कारण, आसाम सरकारने तसा नावा कायदाच केला आहे.

Sep 19, 2017, 03:04 PM IST
कल्याण - अंबरनाथ लोकलमध्ये टोळक्याचा राडा

कल्याण - अंबरनाथ लोकलमध्ये टोळक्याचा राडा

लोकल ट्रेनमध्ये सीटवर बसण्याच्या वादातून राडा झालाय. कल्याणहून अंबरनाथच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये हा प्रकार घडलाय. 

Sep 8, 2017, 10:05 PM IST
कसाऱ्याहून पहिली लोकल मुंबईच्या दिशेने रवाना

कसाऱ्याहून पहिली लोकल मुंबईच्या दिशेने रवाना

कसारा-मुंबई रेल्वेलोकल सेवा पूर्ववत होण्याची चिन्हं आहेत. कसाऱ्याहून पहिली लोकल मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे. 

Sep 2, 2017, 09:40 AM IST
मध्य रेल्वे लोकल कुर्ला येथे का रखडली होती, खरं कारण!

मध्य रेल्वे लोकल कुर्ला येथे का रखडली होती, खरं कारण!

मंगळवारी अतिवृष्टीने मुंबईला झोडपून काढताना जलमय करुन टाकले. त्यामुळे मुंबईच्या वाहतुकीचे तिनतेरा वाजले आणि धावणाऱ्या मुंबईला फुल स्टॉप लावला. 

Aug 31, 2017, 01:13 PM IST
मध्य, हार्बर रेल्वे २४ तासानंतर रखडलेलीच

मध्य, हार्बर रेल्वे २४ तासानंतर रखडलेलीच

 पावसाने विश्रांती घेतली असली तरी मुंबईकरांचे हाल कमी होताना दिसत नाही. सकाळी रेल्वे सेवा धिम्यागतीने सुरु झाली. मात्र, काही तासातच ठप्प पडलेय.  

Aug 30, 2017, 01:19 PM IST
घाटकोपर येथे रिलायन्स सबस्टेशनची भिंत कोसळून १ ठार २ जखमी

घाटकोपर येथे रिलायन्स सबस्टेशनची भिंत कोसळून १ ठार २ जखमी

शहरातील पावसामुळे विस्कळीत झालेले जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दरम्यान, पावसामुळे रात्री घाटकोपर येथे रिलायन्स सबस्टेशन भिंत कोसळून १ ठार तर २ जखमी झालेत.

Aug 30, 2017, 10:35 AM IST
पाणी ओसरतेय, मुंबई हळूहळू पूर्वपदावर

पाणी ओसरतेय, मुंबई हळूहळू पूर्वपदावर

काल अतिवृष्टीमुळे ठप्प झालेले मुंबई आज पूर्वपदावर येताना दिसत आहेत. सखल भागात साचलेले पाणी ओसर आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक सुरु झालेय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन रेल्वे कल्याणकडे रवाना होत आहेत. लोकल सेवा धिम्यागतीने सुरु आहे.

Aug 30, 2017, 09:10 AM IST
मध्य रेल्वे सुरु, दोन लोकल कल्याणच्या दिशेने रवाना

मध्य रेल्वे सुरु, दोन लोकल कल्याणच्या दिशेने रवाना

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन पहिली रेल्वे कल्याणकडे रवाना झाली. दरम्यान भायकळा येथे लोकल १० मिनिटे रखडली होती. ती आता पुढे रवाना झालेय. त्यानंतर दुसरी लोकलही सोडण्यात आली. त्यामुळे मध्य रेल्वे आता हळहळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे रखडेल्या प्रवाशांना मोठा दिसाला मिळालाय.

Aug 30, 2017, 08:31 AM IST
मुंबई-कोकणवर असलेले ढगाचे अच्छादन उत्तरेला, पावसाचा जोर ओसणार !

मुंबई-कोकणवर असलेले ढगाचे अच्छादन उत्तरेला, पावसाचा जोर ओसणार !

सकाळी सकाळी मुंबई आणि परिसराला दिलासा देणारी बातमी. उपग्रहानं दिलेल्या ताज्या छायाचित्रांनुसार मुंबई आणि उत्तर कोकणावर असलेलं ढगाचं अच्छादन आणखी उत्तरेला सरकले आहे. त्यामुळे आज मुंबईतला पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.

Aug 30, 2017, 07:36 AM IST
मध्य, हार्बर रेल्वेची वाहतूक अजूनही ठप्पच

मध्य, हार्बर रेल्वेची वाहतूक अजूनही ठप्पच

गेल्या १८ तासापासून मुंबईकरांची पाऊस कोंडी अजूनही सुटलेली नाही.  रात्रभरात पावसाचा जोर ओसरला असला तरी मुंबईची लाईफलाईन मात्र अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. मध्य आणि हार्बरची वाहतूक अजूनही ठप्पच आहे. 

Aug 30, 2017, 07:21 AM IST
तब्बल ११ तासानंतर मुंबई लोकल पहाटेपासून पुन्हा सुरु

तब्बल ११ तासानंतर मुंबई लोकल पहाटेपासून पुन्हा सुरु

मंगळवारी झालेल्या धुंवाधार पावसामुळे ठप्प तब्बल ११ तास ठप्प असलेल्या मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवा आज पहाटेपासून पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत.  

Aug 30, 2017, 07:09 AM IST