loksabha

LokSabha: 'मला पवार साहेबांचे आभार मानायचे आहेत,' फडणवीसांनी जाहीर सभेत केलं विधान

LokSabha: भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ध्यातील सभेत बोलताना शरद पवारांचे आभार मानले आहेत. जे आम्हाला इतकी वर्षं जमलं नाही, ते शरद पवारांनी करुन दाखवलं असं म्हणत त्यंनी शरद पवारांचे आभार मानले. भाजपाने वर्ध्यात रामदास तडस यांना उमेदवारी दिली आहे. 

 

Apr 3, 2024, 11:57 AM IST

'साडे सतरा रुपयांची साडी देऊन लाज काढली', म्हणणाऱ्या बच्चू कडूंना रवी राणांचं प्रत्युत्तर, 'आंतरराष्ट्रीय नेते, प्रवक्ते...'

LokSabha Election 2024: अमरावतीमधून भाजपाने नवनीत राणा यांना तिकीट देत मित्रपक्षांचा रोष ओढावून घेतला आहे. बच्चू कडू यांनी जाहीरपणे नवनीत राणा यांना विरोध केला असून, काही करुन त्यांना पाडणार असा निर्धार व्यक्त केला आहे. 

 

Apr 2, 2024, 05:17 PM IST

ठाण्यावरुन महायुतीत जुंपणार? प्रताप सरनाईक म्हणाले 'ठाणे मतदारसंघ शिवसेनेचाच, आम्ही ठाम आहोत'

LokSabha Election: शिंदे गट आणि भाजपामध्ये ठाणे आणि कल्याण मतदारसंघावरुन अद्यापही वाद सुरु असल्याची माहिती आहे. भाजपाने ठाणे किंवा कल्याणपैकी एका मतदारसंघाची मागणी केली असताना, शिंदे गट मात्र दोन्ही जागा सोडण्यास इच्छुक नाही. 

 

Apr 2, 2024, 02:57 PM IST

'रत्नागिरी-सिंधुदूर्ग जागा आमचीच', शिंदे गटाने थोपटले दंड, म्हणाले 'जर राणेंनी स्वत:चा प्रचार केला...'

LokSabha Election: महायुतीत शिंदे-गट आणि भाजपामध्ये अद्यापही काही जागांवरुन वाद सुरु असून, चर्चेचं घोडं अडलं आहे. भाजपाने रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ शिंदे गटासाठी सोडण्याची तयारी दर्शवली आहे. पण नारायण राणे समर्थकांनी जागा सोडण्यास नकार दिला आहे.

 

 

Apr 2, 2024, 12:53 PM IST

LokSabha: बारामतीत नणंद-भावजय लढत पक्की; अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर

LokSabha: बारामतीतमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार लढत होणार यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. अजित पवार गटाने सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा आहे. सुनील तटकरे यांनी अधिकृतपणे नाव जाहीर केलं आहे. 

 

Mar 30, 2024, 06:41 PM IST

LokSabha: शरद पवार गटाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर; कोल्हे, सुप्रिया सुळेंसह निलेश लंकेंच्या नावाची घोषणा

LokSabha: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये बारामती आणि शिरुरसारख्या महत्त्वाच्या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे

Mar 30, 2024, 05:21 PM IST

LokSabha: महायुतीचं घोडं नेमकं अडलंय? देवेंद्र फडणवीस म्हणाले 'एक अडलं की तिन्ही पक्ष...'

LokSabha Election: महायुतीमध्ये अद्यापही काही मतदारसंघांवरुन धुसफूस सुरु आहे. यामुळे सर्व जागांवरील उमेदवारांची घोषण झालेली नाही. दरम्यान महायुतीत 4 ते 5 जागांवरुन चर्चा सुरु असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 

 

Mar 30, 2024, 01:18 PM IST

'आम्ही जेव्हा ऑपरेशन करतो ना, तेव्हा...', अंबादास दानवेंचा उल्लेख करत फडणवीसांनी सांगितली भाजपाची रणनीती

LokSabha: उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांना ऊत आला असताना देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. अंबादास दानवे आपल्या संपर्कात नसल्याचं सांगत त्यांनी चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 

 

Mar 30, 2024, 12:31 PM IST

वसंत मोरे वंचितकडून लढणार? प्रकाश आंबेडकरांनी केलं स्पष्ट, म्हणाले 'नव्या राजकारणाची सुरुवात...'

Vasant More meets Prakash Ambedkar: मनसेला सोडचिठ्ठी देऊन पक्षातून बाहेर पडलेले वसंत मोरे वंचितकडून पुणे लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यांनी आज वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. 

 

Mar 29, 2024, 12:49 PM IST

LokSabha: मराठा समाजाच्या बैठकीत जोरदार हाणामारी, कार्यकर्ते आपापसात भिडले

LokSabha: मराठा समाजाच्या बैठकीत जोरदार हाणामारी झाली आहे. मराठा समाजाचा उमेदवार ठरवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कार्यकर्ते आपापसात भिडले. 

 

Mar 29, 2024, 12:02 PM IST

LokSabha: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून पहिली यादी जाहीर, 8 उमेदवारांची घोषणा, वाचा पूर्ण यादी

LokSabha: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत 8 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.

 

Mar 28, 2024, 07:09 PM IST

LokSabha: एक, दोन नव्हे तर तब्बल 238 वेळा निवडणुकीत पराभूत झाला आहे 'हा' उमेदवार

LokSabha: लोकसभा निवडणुकीत के पद्मराजन पुन्हा एकदा आपलं नशीब आजमवणार आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत 238 वेळा वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. 

 

Mar 28, 2024, 04:25 PM IST