आज चंद्र दिसणार सूर्यासारखा लाल!

आज चंद्र दिसणार सूर्यासारखा लाल!

नवी दिल्लीः आज चंद्रग्रहणामुळं आकाशात एक सुंदर दृश्य पाहयला मिळणार आहे. तेजस्वी प्रकाशासाठी ओळखला जाणार चंद्र हा संध्याकाळी पूर्णपणे सूर्यासारखा लाल रंग परिधान करणार आहे. सर्वसामान्यांसाठी खास करून शास्त्रज्ञांसाठी हे दृश्य मनोरंजक असून आज पूर्ण चंद्र ग्रहण दिसणार आहे.   

वर्षातलं पहिलं ग्रहण आज दिसणार

आज भारतीय खगोल प्रेमींना या वर्षातील पहिले ग्रहण पाहता येणार आहे. गुरूवारी मध्यरात्री १ वाजून २४ मिनिटांनी हे ग्रहण देशाच्या सर्व भागातून पाहायला मिळणार आहे.