राष्ट्रपती निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समिकरणे बदलाच्या उंबरठ्यावर...

राष्ट्रपती निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समिकरणे बदलाच्या उंबरठ्यावर...

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाने राज्यात त्यांच्या आणि मित्रपक्षांच्या संख्येपेक्षा जास्त मतदान मिळवलं आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मतं फुटलीच, शिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर विरोधात असलेल्या इतर लहान पक्षांनीही भाजपाच्या उमेदवाराच्या पारड्यात मतं टाकली. विरोधकांची मते फोडल्यामुळे एकीकडे मुख्यमंत्र्यांचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, तर विरोधकांची मतं फुटल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. त्याचबरोबर या निवडणुकीत जादा मते घेऊन भाजपाने शिवसेनेलाही सूचक इशारा दिला आहे.

नरेंद्र दाभोलकर हत्या : तपास शून्य, अंनिसचे  'जवाब दो' आंदोलन

नरेंद्र दाभोलकर हत्या : तपास शून्य, अंनिसचे 'जवाब दो' आंदोलन

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला येत्या २० ऑगस्ट रोजी ४ वर्षे पूर्ण होत असून मारेकऱ्यांना अटक करण्यात पोलिसांना अद्यापही यश आले नाही. याचाच जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आजपासून  २० जुलै ते २० ऑगस्ट दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात 'जवाब दो' आंदोलनाची घोषणा केली आहे. 

शेतकरी कर्जमाफी : सरकारची जाहिरातीवर लाखो रूपयांची उधळपट्टी

शेतकरी कर्जमाफी : सरकारची जाहिरातीवर लाखो रूपयांची उधळपट्टी

 सरकारने गाजावाजा करून कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीचा शेतक-यांना प्रत्यक्षात अजूनही लाभ मिळालेला नसला तरी सरकारनं या घोषणेची जोरदार जाहिरातबाजी केली. या जाहिरातबाजीपोटी सरकारनं तब्बल ३६ लाख ३१ हजार रूपयांची उधळपट्टी केली. 

राष्ट्रपती निवडणूक : राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीची मते फुटली

राष्ट्रपती निवडणूक : राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीची मते फुटली

 राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मते फुटली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय. 

उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे 'गझनी': नीतेश राणे

उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे 'गझनी': नीतेश राणे

नीतेश यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तुलना 'गझनी' चित्रपटातील आमीर खानच्या भूमिकेशी केली आहे. उद्धव हे 'महाराष्ट्राचे गझनी' आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.

हे सुंदर दृश्य आहे महाराष्ट्रातलं

हे सुंदर दृश्य आहे महाराष्ट्रातलं

ममदापूर वनसंवर्धन राखीव क्षेत्राच्या माळरानावर, हे नयनरम्य दृश्य पाहायला मिळालं. सुरुवातीला पडलेला काहीसा पाऊस आणि त्या पावसानं हिरवगार झालेलं माळरान.  

राज्यातील काँग्रेसमध्ये होणार फेरबदल..

राज्यातील काँग्रेसमध्ये होणार फेरबदल..

 काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात  राज्य काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती मिळत आहे. 

कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी भाजपाला घेरण्याची तयारी

कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी भाजपाला घेरण्याची तयारी

शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर झालेली असली तरी अंमलबजावणीवरून शिवसेनेनं भाजपला घेरण्याची तयारी सुरू केलीय. 

१५ जुलैनंतर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मान्सून पुन्हा सक्रीय

१५ जुलैनंतर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मान्सून पुन्हा सक्रीय

 येत्या 15 जुलैनंतर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे. मुंबईच्या कुलाबा वेध शाळेच्या अंदाजानुसार आगामी चार दिवसात राज्यात पावसाची शक्यता नाही. मात्र १५ जुलैनंतर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मान्सून सक्रीय होणार आहे. राज्यात पावसासाठी पोषक वातावरण नसल्यामुळे सध्या पावसाने खंड दिला आहे.

...या व्हॉटसअप मॅसेजमुळे स्वाती साठे गोत्यात!

...या व्हॉटसअप मॅसेजमुळे स्वाती साठे गोत्यात!

 मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणात कारागृह उपपोलीस महानिरीक्षक स्वाती साठे या अडचणीत येण्याची शक्यता आहे. मंजूला शेट्ये मारहाण आणि हत्या प्रकरणाची कारागृह प्रशासनातर्फे स्वाती साठे चौकशी करतायत. कारागृह प्रशासनाच्या व्हॉट्सप ग्रुपवर केलेल्या एका मेसेजमुळे स्वाती साठे चांगल्याच अडचणीत येऊ शकतात. 

शाळेत मारहाण करणाऱ्या गृह राज्यमंत्र्यांच्या वडिलांवर कारवाई का नाही?

शाळेत मारहाण करणाऱ्या गृह राज्यमंत्र्यांच्या वडिलांवर कारवाई का नाही?

राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या वडिलांनी एका शाळेत जाऊन तिथल्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर दिसतोय. याप्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय. पण पाच दिवस उलटले तरी पोलिसांनी काहीच कारवाई केलेली नाही.

गेल्या वर्षीच्या गोंधळानंतरही राज्यात तूरीची अमाप लागवड

गेल्या वर्षीच्या गोंधळानंतरही राज्यात तूरीची अमाप लागवड

तूर खरेदीवरुन गेल्यावर्षी अभूतपूर्व असा गोंधळ उडाला. या गोंधळामुळे शेतकरी तुरीकडे वळणार नाही, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार मराठवाड्यात तुरीची बंपर पेरणी झालीय. 

मुंबई, ठाणे शहरात स्वाईन फ्लूचे थैमान, २५ जणांचा बळी

मुंबई, ठाणे शहरात स्वाईन फ्लूचे थैमान, २५ जणांचा बळी

मुंबई शहर आणि ठाण्यात स्वाईन फ्लूने थैमान घातले आहे. गेल्या दोन महिन्यात मुंबईत १६ तर ठाण्यात नऊ जणांचा स्वाईन फ्लूमुळं बळी गेलाय. तर ठाण्यात गेल्या दोन महिन्यान ९ जणांचा मृत्यू झालाय. 

शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जारी, या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही

शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जारी, या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय जारी करण्यात आला आहे. कर्जमाफीचा जीआर सरकारनं काढला आहे.

पूँछमधल्या चकमकीत महाराष्ट्राच्या दोन जवानांना वीरमरण

पूँछमधल्या चकमकीत महाराष्ट्राच्या दोन जवानांना वीरमरण

जम्मू काश्मीरमधल्या पूँछमध्ये झालेल्या चकमकीत, महाराष्ट्रातल्या दोन जवानांना वीरमरण आलं आहे.

 कोण होईल महाराष्ट्राचा पहिला "संगीत सम्राट “?

कोण होईल महाराष्ट्राचा पहिला "संगीत सम्राट “?

संगीत अर्थात सूर, लय आणि ताल यांचा सुरेख संगम. संगीताची ही किमया महाराष्ट्राच्या संस्कृतीचा गाभा आहे. महाराष्ट्राला संगीत परंपरेचा मोठा वारसा लाभला आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात संगीत व्यापून राहिले आहे. किंबहुना माणसाच्या आयुष्यातील प्रत्येक भावना तो संगीताच्या सोबतीने अनुभवतो...जगतो. 

पाऊस दाखल, मात्र शेतकऱ्यांचा 'तेरावा' महिना सुरूच!

पाऊस दाखल, मात्र शेतकऱ्यांचा 'तेरावा' महिना सुरूच!

राज्यात खरीप हंगामातील पेरण्याची लगबग सुरु झाली आहे. मात्र नंदुरबार जिल्ह्यात पेरणीसाठी लागणाऱ्या भांडवलासाठी पिक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेचा फेऱ्या माराव्या लागत आहेत. दुष्काळात तेरावा महिना अशी इथल्या शेतकऱ्यांची गत झाली आहे.

...ही आहे महाराष्ट्राची पहिली आंतरराष्ट्रीय दर्जाची तिरंदाज

...ही आहे महाराष्ट्राची पहिली आंतरराष्ट्रीय दर्जाची तिरंदाज

तिरंदाजी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ते दीपिका कुमारी...मात्र महाराष्ट्रातही आंतरराष्ट्रीय दर्जाची तिरंदाज खेळाडू आहे ती म्हणजे मेघा अगरवाल...मेघा आता चीन इथं होणा-या तिरंदाजी आशियाई कपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. 

सरसकट, तत्वतः, निकष यांची व्याख्या स्पष्ट करावी - पवार

सरसकट, तत्वतः, निकष यांची व्याख्या स्पष्ट करावी - पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकार आणि सुकाणू समितीचं अभिनंदन केलं. औरंगाबादमधील पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.

सरसकट कर्जमाफी : निकषासह तत्वत: मान्य

सरसकट कर्जमाफी : निकषासह तत्वत: मान्य

कर्जमाफीची मागणी करण्याची गरज पडायला नको, म्हणून स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याची विनंती केंद्र सरकारला करण्याचं राज्य सरकारने मान्य केलं आहे.

'सुकाणू' आणि शेतकरी आंदोलनाचं पुढे काय होणार?

'सुकाणू' आणि शेतकरी आंदोलनाचं पुढे काय होणार?

शेतक-यांच्या हितासाठी स्थापन करण्यात आलेल्या सुकाणू समितीमध्ये उभी फूट पडलीय. त्यामुळे 1 जूनपासून सुरु झालेल्या शेतकरी आंदोलनाचं पुढं काय होणार असा सवाल उपस्थित होतोय.