हा क्रिकेटपटू झाला मंत्री

हा क्रिकेटपटू झाला मंत्री

पश्चिम बंगालचा माजी क्रिकेटपटू लक्ष्मी रतन शुक्लानं पश्चिम बंगालच्या मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. 

इडन गार्डनची खेळपट्टी खोदून टाकू इडन गार्डनची खेळपट्टी खोदून टाकू

टी 20 वर्ल्ड कपमधली भारत आणि पाकिस्तानमधल्या मॅचसमोरची संकटं कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत.

ममतांच्या 'त्या' ट्विटची जोरदार चर्चा ममतांच्या 'त्या' ट्विटची जोरदार चर्चा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विटरवर घोळ घातला आहे.

भाजपमध्ये शिरून 'दादा' देणार 'दिदींना' टक्कर? भाजपमध्ये शिरून 'दादा' देणार 'दिदींना' टक्कर?

पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींना रोखण्यासाठी भाजप दादाचा सहारा घेणार असल्याचं दिसतंय.

अश्लील डान्स करणा-या कार्यकर्त्याविरोधात कारवाई

तृणमूल काँग्रेसच्या स्थापना दिवस कार्यक्रमात अश्लील डान्स करत गोंधळ घालणा-या कार्यकर्त्याविरोधात कारवाई करण्यात आलीय. या कार्यकर्त्याला तृणमूल पक्षातून निलंबित करण्यात आलंय.

अखेर तृणमूलचा यूपीएशी काडीमोड

तृणमूल काँग्रेसच्या सहा मंत्र्यांनी अखेर पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केलाय. दुपारी साडेचारच्या सुमारास तृणमूलचे मंत्री पंतप्रधानांच्या निवासस्थानी ७ रेसकोर्सला पोहचले.

आज दिल्लीत रंगणार महाभारत...

ममता बनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचे सहा मंत्री आज आपल्या मंत्रिपदांचा राजीनामा देणार आहेत.

मनमोहनवर नाही ‘ममता’... सपाचा दिलासा

गुरुवारी एफडीआयचा अध्यादेश जारी करून एफडीआयच्या निर्णयावर सरकार मागे हटणार नाही असा स्पष्ट संदेश केंद्र सरकारनं घटक पक्षांना दिलाय. ममता बॅनर्जी यांच्या पाठींब्याची पर्वा करता यूपीए सरकारनं हे पाऊल उचललंय.

ममतांना कल्पना दिली होती - पंतप्रधान

तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी युपीए सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी मध्यस्ती करण्याची शक्यता असताना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ममताना आर्थिक सुधारणांचे मोठे निर्णय घेण्यापूर्वी कल्पना दिली होती, असे स्पष्टीकरण दिले आहे.

ममता युपीएला देणार `दे धक्का`

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या केंद्रीय मंत्र्यांना राजीनामा देण्यास सांगून युपीएला बाहेरून पाठिंबा देण्याची शक्यता असल्याचे आज स्पष्ट झाले.

कलामांसाठी 'दीदी' फेसबूकवर...

भारतीयांचं मत तेच माझं मत, असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतीपदासाठी डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्यासाठी फेसबूकवर धाव घेतलीय. 'राष्ट्रपती कसा असावा, हे जाणणाऱ्या लोकांना मी हाक देतेय' असं म्हणत त्यांनी सरळसरळ भारतीयांनाच आवाहन केलंय.

पेट्रोलची किंमत कमी होईल - प्रणव

पेट्रोलचे दर कमी होण्याची शक्यता, केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर उतरल्याने होणार पेट्रोलचे दर कमी होण्याचे संकेत प्रणव मुखर्जी यांनी दिले आहेत.

'युपीए'वर नाराज, तरी पाठिंबा तसाच

पेट्रोल भाववाढीच्या तापलेल्या तव्यावर अनेक पक्ष आपली पोळी भाजून घेण्यासाठी तयार झालेत. त्यातच युपीएकडं तुटपूंजे संख्याबळ आहे. त्यामुळं युपीएच्या घटक पक्षांची वाढती नाराजी पाहता पुढील काळ सरकारची सत्वपरीक्षा घेणारा असू शकतो.

यूपीएच्या डिनरला ममता बॅनर्जींची दांडी

एकीकडे युपीए टू सरकार तिसरी वर्षपूर्ती करत असताना घटक पक्षांमधली धुसफूसही चालूच असल्याचे संकेत मिळत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या डिनरला जाणार नसल्याचं स्पष्ट झालंय.

ममता बॅनर्जींची पसंती मीरा कुमारांना

राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत आघाडीवर नाव असलेल्या प्रणव मुखर्जींना त्यांच्या राज्यातूनच मोठा विरोध होतोय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुखर्जींच्या ऐवजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांना पसंती दिली आहे.

ममता बॅनर्जी काय बरळल्या?

आता एक अशी बातमी जी ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. वेळोवेळी आपल्या हटवादी आणि विक्षिप्त वागण्यामुळं नेहमीच चर्चैत असणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

ममता बॅनर्जींचा पंतप्रधानांना निर्वाणीचा इशारा

तृणमुल काँग्रेसच्या सुप्रिमो ममता बॅनर्जींनी रविवारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यासाठी २४ तासांची अंतिम मुदत दिल आहे.

दिनेश त्रिवेदींचा राजीनामा नाही

रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदींच्या राजीनाम्यावरून तृणमूल आणि दिनेश त्रिवेदींमध्ये वाद पेटू लागला आहे. त्रिवेदींनी रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसल्याची माहिती समोर आली आहे तर त्रिवेदींनी आता पक्षातच राहू नये, अशी तिखट प्रतिक्रिया सुदीप बंदोपाध्याय यांनी दिली आहे.

दिनेश त्रिवेदींच्या राजीनाम्यावर सस्पेन्स

रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदींनी पंतप्रधानांकडे आपला राजीनामा सोपवला आहे. त्यांचा हा राजीनामा पंतप्रधान मनमोहन स्विकारतील का, याचीच उत्सुकता लागली असताना हा राजीनामा ३१मार्चला स्वीकारण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात आले आहे.

काय आले महाराष्ट्राच्या वाट्याला

केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात यंदा महाराष्ट्राच्या वाट्याला फार काहिसं आलं नसल्याचे समोर आलं आहे. महाराष्ट्रात १९ नव्या एक्स्प्रेस गाड्या आणि मुंबईत ७५ नव्या लोकल गाड्या देण्याची घोषणा रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी केली आहे.

रेल्वे बजेटमधील नव्या ७५ गाड्या

केंद्रीय रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी आज आपले पहिले रेल्वे बजेट सादर केले. या बजेटमध्ये त्यांनी ७५ नव्या गाड्यांची घोषणा केली. या मध्ये महाराष्ट्रासाठी सुमारे १९ गाड्या सुरू केल्या आहेत.