manikrao thakare

राष्ट्रवादीला माणिकराव ठाकरेंचे उत्तर

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केलेल्या टीकेला आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी तशाच शब्दांत उत्तर दिले.

Jul 30, 2012, 08:41 PM IST

राज ठाकरेंच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा

काँग्रेसने मनसेच्या आंदोलनाचे समर्थन करून राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. रस्त्यांच्या कामांचा खर्च वसुल होऊनही टोल नाके सुरू असले तर ते चुकीचे असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी झी 24 तासशी बोलताना स्पष्ट केलंय.

Jun 12, 2012, 11:14 PM IST

काँग्रेसला राष्ट्रवादीने गृहीत धरू नये- माणिकराव

राष्ट्रवादीच्या धमकीला काँग्रेसनं प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादीनं काँग्रेस गृहीत धरू नये असा टोला माणिकराव ठाकरेंनी लगावला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची राज्यात जरी आघाडी असली तरी स्थानिक नेतृत्वात अजिबात सुसंवाद नाहीये.

Apr 20, 2012, 01:41 PM IST

आघाडीत बिघाडी?

पवारांच्या वक्तव्याला काँग्रेसनं उत्तर दिलं आहे. पुढच्या निवडणूकीत आघाडी ठेवायची की नाही याचा विचार करु, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिलाय.

Mar 24, 2012, 10:08 PM IST

अमरावतीतील रोकड हा पक्षनिधी- ठाकरे

अमरावतीत नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी जप्त केलेल एक कोटी रूपये हा पक्षनिधी असल्याचा खुलासा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला आहे. उमेदवारांना हा पैसा देण्यात येणार असल्याचं माणिकरावांनी सांगितलय. काल अमरावती पोलिसांनी एका गाडीतून एक कोटींची रक्कम जप्त केली होती. फोर्ड गाडीतून हे पैसै आणण्यात आले होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पैसा मतदारांना वाटण्यासाठी आणण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र हा पैसा पक्षनिधी असल्याचं माणिकरावांनी स्पष्ट केलं.

Feb 13, 2012, 02:46 PM IST

माणिकराव ठाकरेंच्या गाडीवर दगडफेक

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंच्या गाडीवर यवतमाळ जिल्हयात दगडफेक झाली. नेर जवळ ही घटना घडली.

Feb 7, 2012, 12:32 PM IST

'माणिकराव ठाकरे, विजय दर्डा पक्षाला कलंक'

ज्येष्ठ विदर्भवादी नेते आणि माजी खासदार जांबुतराव धोटे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि खासदार विजय दर्डा यांच्यावर आरोप केलेत. हे दोन्ही नेते पक्षाला कलंक असून पक्षाच्या नावाचा गैरवापर करुन अब्जावधींची संपत्ती जमवल्याचा घणाघाती आरोप धोटे यांनी केला. यवतमाळमध्ये बोलताना जांबुतराव धोटे यांनी हा आरोप केला.

Feb 4, 2012, 12:11 PM IST

प्रिय दत्तची समजूत काढू - माणिकराव

खासदार प्रिया दत्त नाराज असल्यास त्यांची समजूत काढू असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटल आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष कृपाशंकरसिंह यांच्यावर प्रिया दत्त यांनी मनमानीचा आरोप केला होता.

Feb 2, 2012, 02:00 PM IST

काँग्रेसची अजित सावंतांना कारणे दाखवा नोटीस

मुंबई प्रदेश सरचिटणीस अजित सावंत यांच्यावर हकालपट्टीची कारवाई होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी अजित सावंत यांना पक्षविरोधी वक्तव्य केल्याने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Feb 1, 2012, 11:10 AM IST

काँग्रेसला आंबेडकर 'आठवले'

काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकरांशी संपर्क साधण्यात आला आहे अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी यांनी दिली. रामदार आठवले यांनी शिवसेना आणि भाजपसोबत महायुती केली असल्याने त्यांना शह देण्यासाठी काँग्रेसने ही खेळी खेळली आहे.

Jan 11, 2012, 05:01 PM IST

आघाडीचा निर्णय लांबणीवर

संध्याकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वर्षा बंगल्यावर काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत जिल्हानिहाय पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुनच सोमवारी आघाडीचा निर्णय घेण्यावर एकमत झालं आहे.

Jan 8, 2012, 12:13 AM IST

माणिकरावांना दादांचा ' दे धक्का'

माणिकराव ठाकरे यांना 'दे धक्का'. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना राष्ट्रवादीनं त्यांच्याच यवतमाळ जिल्ह्यात दे धक्का दिला. यवतमाळमध्ये आज काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

Nov 14, 2011, 11:22 AM IST

यवतमाळात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये घमासान

यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसचे अनेक नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा हा जिल्हा असल्यानं यात कुरघोडीचे राजकारण आहे. त्यामुळं संतापलेल्या माणिकरावांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे.

Nov 13, 2011, 03:16 PM IST