वर्षभरापूर्वी मंत्रालयाला आग, शासनालाही अजूनही नाही जाग!

मंत्रालयाला लागलेल्या आगीला आज एक वर्ष पूर्ण होतंय. मात्र एक वर्षानंतरही मंत्रालयाचा कारभार अजूनही विस्कळीतच आहे. मंत्रालयातील घडी पूर्णपणे बसवण्यात एका वर्षानंतरही शासनाला यश आलेलं नाही.

उद्धव ठाकरेंना सुनील तटकरेंचा टोला

अजित पवारांच्या राजीनाम्याच्या धाडसामागे मंत्रालयाला लागलेली आग कारणीभूत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता. त्याला राज्याचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी उत्तर दिलंय.

मोरे कुटुंबियांचे मुख्यमंत्र्यांकडून सांत्वन

मंत्रालयात लागलेल्या आगीत मुख्यमंत्र्यांचे जमादार मोहन मोरे आणि तुकाराम मोरे यांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोघांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केलं.

सीबीआयला सुगावा लागणार?

मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीचा तपास करायला क्राईम ब्रान्चनं सुरूवात केली आहे. मुंबई क्राइम ब्रान्चनं हा तपास चार भागांत विभागलेला आहे.