ट्रकने उडालेला दगडाने घेतला टॅक्सीतील प्रवाशाचा जीव

Last Updated: Sunday, March 16, 2014, 08:52

मुंबई - पुणे महामार्गावर कामोठे ते तुर्भे दरम्यान रस्ता बनवण्याचे काम सुरु आहे. या दरम्यान, रस्त्यावर अनेक दगड पडलेले असून रस्त्यावरील एक दगड ट्रकने उडाल्याने चालत्या टॅक्सीवरील काचेवर आदळला. दगडाने काच तुटली आणि टॅक्सीतील प्रवाशाला लागला. या अपघातात प्रवाशी जागीच ठार झाला.

मुंबईत पुन्हा एकदा `हिट अॅन्ड रन`

Last Updated: Wednesday, January 23, 2013, 09:57

मुंबईत पुन्हा एकदा हिट अॅन्ड रनचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय. पवईमध्ये झालेल्या या भीषण अपघातात एका भावाला आणि बहिणीला आपला जीव गमवावा लागला.

नशा जीवावर... मुंबई अपघातात तरूणी ठार

Last Updated: Saturday, March 31, 2012, 07:09

मुंबईत पुन्हा एकदा नशेबाज तरूण-तरूणींचा धिंगाणा पाहायला मिळाला आहे. नशेत गाडी चालवण्याची झिंग अपघाताला कारणी भूत ठरली आहे. या अपघातात सात जण जखमी झालेत. मात्र, सुदैवाने ही नशा जीवावर उधार झाल्याने त्यांचा जीव वाचला. मात्र, यातील एका तरूणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मुंबईत दोन ठिकाणी अपघाताच्या घटना

Last Updated: Friday, March 02, 2012, 03:30

मुंबईत एकाच रात्रीच अपघाताच्या दोन घटना घडल्या आहेत. वरळी सी फेसवर दोन कारमध्ये अपघात झाला आहे. तर मुंबई विमानतळ परिसरात एक भरधाव बस उलटली आहे. वरळी सी फेसवर पहाटे साडेतीनच्या सुमाराला दोन कारमध्ये अपघात झाला आहे.

भायखळ्यात ट्रकने चार जणांना चिरडलं

Last Updated: Tuesday, November 01, 2011, 04:55

मुंबईतील भायखळ्यात एका भरधाव ट्रकनं फुटपाथवर झोपलेल्या चार जणांना चिरडलंय. रे रोडवरील फुटपाथवर हे सगळे झोपले होते. सकाळई ६.००च्या सुमारास हा अपघात घडला.