मुंबईच्या नगरसेवकांनी लाटले लॅपटॉप

मुंबई महापालिकेन नगरसेवकांना पाच वर्षाच्या मुदतीवर दिलेले लॅपटॉप नगरसेवकांनी लाटल्याचं उघड झालयं. या लेपटॉपसाठी महापालिकेने नगरसेवकांना नोटीस जारी केल्यानंतर फक्त १३८ नगरसेवकांनी लॅपटॉप परत केले. तर ३१ नगरसेवकांनी लॅपटॉप अर्ध्या किंमतीत विकत घेतले आहेत. मात्र ६३ नगरसेवकांनी लॅपटॉप दिले नसल्यामुळे महापालिकेने प्रोपर्टी टॅक्स मधून ही किंमत वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे.

'डास पळविण्यासाठी इमारती पाडा'

मुंबईतील डासांना आता धुराचा त्रास सहन करावा लागणार नाही. कारण धूर सोडण्यापेक्षा चक्क इमारतीच जमीनदोस्त करण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी दिल्या आहेत. त्यामुळे धुरात डासांचा जीव आता गुदमरणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या अजबकारभाराची चर्चा जास्त आहे. १४ जुन्या झालेल्या आणि कोसळण्याच्या स्थितीत असलेल्या इमारतीमुळे डास संपणार आहेत का, हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

मनपात आठ हजार कोटींची थकबाकी !

तब्बल २१ हजार कोटींच बजेट असलेल्या मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती बिघडलेली आहे. प्रशासकीय आणि राजकीय अनास्थेमुळे तीन वर्षांत तब्बल आठ हजार कोटी रुपयांचा प्रॉपर्टी टॅक्स वसूलच झालेला नाही.

मुख्यमंत्र्याची खैरातबाजी, आचारसंहितेच्या आधी

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तारखा आज जाहिर होणार असल्याने लगेचच आचारसंहिता लागू होणार असल्याने आचारसंहितेपूर्वी काही काळ पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांवर घोषणांची खैरात केली आहे. धारावी विकास नियंत्रण नियमावलीत बदल करण्यात आले आहेत.

मुंबईतील नदीला डेब्रिजची 'मिठी'

मुंबईतील मिठी नदीजवळ साचलेले डेब्रिज काढा, असे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले आहेत. उच्च न्यायालयाने १0 दिवसा दिवसांची मुदत दिली आहे.