दिल्लीत एनडीएच्या घटकपक्षांची बैठक

दिल्लीत एनडीएच्या घटकपक्षांची बैठक

राजधानी दिल्लीत थोड्याच वेळात एनडीएच्या घटकपक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत.

शिवसेना मंत्री अनंत गिंतेंची भाजप मंत्र्यांना दमबाजी, जुतों से मारूंगा!

शिवसेना मंत्री अनंत गिंतेंची भाजप मंत्र्यांना दमबाजी, जुतों से मारूंगा!

शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांना विमान कंपन्यांनी प्रवासाची बंदी घातल्याने लोकसभेत जोरदार हंगामा झाला. शिवसेनेचे गटनेते अनंत  गिते हे विमान बंदी प्रश्नावर अधिक आक्रमक झालेत. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू यांच्यावर शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गिते चक्क धावून गेल्याने लोकसभेत एकच गोंधळ झाला. शिवसेनेसे पंगा मत लेना असे म्हणत मंत्री अनंत गिंते यांनी भाजप मंत्र्यांना दमबाजी भरली, जुतों से मारूंगा!

मोदींच्या स्नेहभोजनाला उद्धव ठाकरेंचा नकार ?

मोदींच्या स्नेहभोजनाला उद्धव ठाकरेंचा नकार ?

 नवी दिल्ली उद्या होणाऱ्या एनडीएच्या घटक पक्षांच्या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाणार नसल्याचे समजते आहे.  मोदींनी बोलावल्या स्नेहभोजनालाही उद्धव ठाकरे जाणार नसल्याचे त्यांनी आपल्या कृतीतून सांगितले आहे. 

शिवसेना खासदार रवींद्र गायकवाडांच्या अडचणी वाढणार?

शिवसेना खासदार रवींद्र गायकवाडांच्या अडचणी वाढणार?

एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्याविरोधात गंभीर कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. ज्यामुळे गायकवाड यांना शिक्षा देखील होऊ शकते. 

गोवा-मणिपूरमध्ये भाजपचा सत्ता स्थापनेचा मुद्दा संसदेत गाजणार

गोवा-मणिपूरमध्ये भाजपचा सत्ता स्थापनेचा मुद्दा संसदेत गाजणार

संसदेच्या अधिवेशनातही गोवा आणि मणिपूर सरकार स्थापनेचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. काँग्रेसने या प्रकरणी आक्रमक आणि कठोर भूमिका घेतली आहे.

सोने तीन आठवड्याच्या नीचांकावर

सोने तीन आठवड्याच्या नीचांकावर

सोन्याच्या दरात आज मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली. राजधानी दिल्लीमध्ये सोन्याचे दर प्रति तोळा तब्बल ४०० रुपयांनी घसरुन २९,५०० रुपयांवर बंद झाले. गेल्या तीन आठवड्यांतील सोन्याने गाठलेला हा नीचांक आहे. 

'आंघोळीसाठी महिलांना नग्न अवस्थेत रांगेत उभं केलं जातं'

'आंघोळीसाठी महिलांना नग्न अवस्थेत रांगेत उभं केलं जातं'

दिल्ली महिला आयोग अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी दिल्लीतील महिला सुधार गृह 'आशा किरण'बद्दल एक धक्कादायक दावा केलाय. 

लाल किल्ल्यात स्फोटकं सापडल्यानं खळबळ

लाल किल्ल्यात स्फोटकं सापडल्यानं खळबळ

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात मोठ्या प्रमाणात स्फोटकं सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

दिल्लीत मराठी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज

दिल्लीत मराठी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज

 रेल्वेअॅप्रेंटीस च्या मुलांना रेल्वेत समावून घेण्यासाठी आंदोलन करणा-या मराठी मुला- मुलींवर दिल्लीतील रेल्वे मंत्रालयासमोर लाठीचार्ज झाला. यात महाराष्ट्रातील अनेक मुले जखमी झाली आहेत. मराठी मंत्री म्हणून सुरेश प्रभू यांच्याकडे हे विद्यार्थी आले असता त्यांना काठ्या खाव्या लागल्या आहेत. महाराष्ट्रातील दीड हजार मुलानी आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यानंतर या सर्व मुला मुलींना संसद मार्ग पोलिस ठाण्यात डांबण्यात आले. 

दिल्लीतील प्रसिद्ध रिगल थिएटर बंद होणार

दिल्लीतील प्रसिद्ध रिगल थिएटर बंद होणार

नेते, अभिनेते आणि सामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे दिल्लीतील रिगल चित्रपटगृह आता अखेरच्या घटका मोजत आहे. चित्रपटगृह चालवणं परवडत नसल्यानं रिगल चित्रपटगृह आता बंद पडणार आहे. दंगल हा अखेरचा चित्रपट रिगलमध्ये लावण्यात आला आहे. त्यानंतर दिल्लीतल्या सिंगल स्क्रीन युगाचा कायमचा अस्त होणार आहे.

काँग्रेसची राहुल गांधीच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत बैठक

काँग्रेसची राहुल गांधीच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत बैठक

संसदेत नोटाबंदीच्या चर्चेत पंतप्रधानांनी उत्तर देण्याची विरोधकांची मागणी अजूनही पूर्ण झालेली नाही. त्यापार्श्वभूमीवर आज काँग्रेसच्या संसदीय पक्षाची बैठक झाली. राहुल गांधी या बैठकीचे अध्यक्ष होते.

सोनिया गांधी हॉस्पीटलमध्ये दाखल

सोनिया गांधी हॉस्पीटलमध्ये दाखल

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

मुंबई, दिल्लीसह देशभरात आयकर विभागाचे छापे

मुंबई, दिल्लीसह देशभरात आयकर विभागाचे छापे

५०० आणि १००० च्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर आयकर विभागाने काळ्या पैशांवर नजर ठेवून आहे. आयकर विभागाने दिल्ली, मुंबईसह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात छापे टाकले आहेत.

प्रदुषणामुळे राजधानी दिल्लीत 1800 शाळा बंद

प्रदुषणामुळे राजधानी दिल्लीत 1800 शाळा बंद

राजधानीत गेल्या काही दिवसांत पसरलेल्या विषारी वायुमुळे आज सुमारे 1800 शाळा बंद ठेवण्यात आल्या आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

उरीच्या हल्ल्यानंतर घडामोडींना वेग, पंतप्रधानांसोबत बैठक

उरीच्या हल्ल्यानंतर घडामोडींना वेग, पंतप्रधानांसोबत बैठक

उरीच्या हल्ल्यानंतर दिल्लीत घडामोडींना वेग आलाय. सकाळी 10 वाजता केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहांनी देशातल्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीत दीड तास चर्चा झाली. यानंतर राजनाथ सिंह, मनोहर पर्रिकर, अजित दोभाल, अरूण जेटली पंतप्रधानांच्या घरी पोहचले आहेत. 

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात गणपतीची प्रतिष्ठापना

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात गणपतीची प्रतिष्ठापना

महाराष्ट्र सदनात गणपतीची प्रतिष्ठापणा करण्यात आली. महाराष्ट्र सदनातील कर्मचारी आणि अधिका-यांनी एकत्र येईन प्रतिष्ठापणा केली. महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आभा शुक्ला आणि राजशिष्टाचार आयुक्त लोकेशचंद्र यांनी गणपतीची आरती केली.

दिल्ली, हैदाराबादमध्ये पावसाने जनजीवन विस्कळीत

दिल्ली, हैदाराबादमध्ये पावसाने जनजीवन विस्कळीत

राजधानी दिल्लीला मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्याचवेळी दक्षिणेकडील हैदराबादमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळाला. पावसामुळे दोन्ही ठिकांनी जनजीवन विस्कळीत झाले आहे.

दिल्लीला पुराचा इशारा

दिल्लीला पुराचा इशारा

दिल्लीला पुराचा इशारा देण्यात आला आहे. यमुना नदीने धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. यावरून दिल्लीमध्ये पुराचा इशारा देण्यात आला आहे. 

ऑनलाईन फसवणुकीपासून सावध रहा- मोदी

ऑनलाईन फसवणुकीपासून सावध रहा- मोदी

ऑनलाईन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. 'मन की बात' या कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले, खोटी आमिषे आणि अवास्तव लाभाला बळी पडू नका. 

१०० कार चोरणारा पोलिसांच्या सापळ्यात!

१०० कार चोरणारा पोलिसांच्या सापळ्यात!

सिनेमात ज्या प्रमाणे चोरी करण्याची पद्धत अबलंबिली जाते. तोच धागा पकडत एकाने चक्क १०० कारची चोरी केली. चोरी करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी अटक केली. तो दिल्लीतील देवली परिसरात आपल्या गर्लफ्रेंडसोबत राहत असल्याचेही पोलिसांनी सांगितले. 

हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट प्रकरणी वृद्धाला अटक

हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट प्रकरणी वृद्धाला अटक

पी. एन. सान्याल ६३ वर्षाच्या वृद्धाला शहरात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पी एन सान्यालच्या घरात रशियन युवती आढळून आली आहे.