पोषक आहार आणि पचन

पोषक आहार आणि पचन

'आहार शास्त्र' ही योग्य आहार घेण्याची कला आहे. विविध गटातील, वेगवेगळ्या परीस्थितील लोकांची आरोग्याची परिस्थिती आणि त्यांच्या आहाराच्या आणि पोषकतेच्या तत्वांचा यामध्ये अभ्यास केला जातो. पोषण हे समतोल आहाराचे शास्त्र आहे. त्यामुळे शरीरप्रकृती चांगली रहाते, रोगांपासूनही संरक्षण होते.

दूध आणि दही ने हाडे होतात मजबुत

नव्याने केलेल्या अभ्यासानुसार दूध आणि दहीमुळे हाडे मजबुत होतात हे स्पष्ट झालेय. कमी फॅक्टचे दूध आणि दही या पदार्थामुळे प्रोटीन, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी वाढण्यास मदत होते.

शेंगदाण्यांमध्ये असतो आरोग्याचा खजिना

भुईमुगाच्या शेंगा म्हणजे आरोग्यासाठी वरदान असल्याचं म्हटलं जातं. विशेषतः हिवाळ्यात बदामाइतकंच प्रभावी मानलं जातं. बदाम थंडीच्या काळात जितकं फायदेशीर असतं, तेवढाच भूईमुग फायद्याचा वाटतो.

मानवच सर्वाधिक बुद्धिमान का?

शास्त्रज्ञांना मानवाच्या बुद्धिमान होण्याचं कारण आता लक्षात आलं आहे. कोलोरॅडो युनिव्हर्सिटीच्या अभ्यासकांना प्रोटिन्समध्ये असलेल्या डीयूएफ 1220 या कणांचा शोध लागला आहे. मानवी शरीरातील प्रोटिन्समध्ये या कणांचा असणारा साठा मानवाला बुद्धिमान बनवतो.