जुन्या नोटा बदलण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर...

जुन्या नोटा बदलण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर...

नोटबंदीच्या पार्श्वभूमीवर आता जुन्या नोटा बदलण्यासाठी विद्यार्थ्यांच्या बॅंक अकाऊंटचा वापर करण्यात येत असल्याची चर्चा आहे.

कोंढव्यात रिक्षा अपघातात तीन जणांचा मृत्यू

कोंढव्यात रिक्षा अपघातात तीन जणांचा मृत्यू

कोंढवा येथे ऑटो रिक्षा घरावर जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीये. रात्री साडेबाराच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात ऑटो रिक्षा चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

'पुण्याचं पाणी बंद करण्यामागे राजकारण'

'पुण्याचं पाणी बंद करण्यामागे राजकारण'

पुणेकरांचं पाणी अचानक बंद करण्याच्या निर्णयामागे राजकारणच आहे असं सांगत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर जोरदार टीका केली.

'पीएमपीएल'ची प्रवाशांसाठी 'फुकटातली' ऑफर!

'पीएमपीएल'ची प्रवाशांसाठी 'फुकटातली' ऑफर!

पुणेकरांना आता महिन्यातून एक दिवस पीएमपीएलने मोफत प्रवास करता येणार आहे. पुणे महापालिकेनं ही योजना आणली आहे. नागरिकांना पीएमपीएलनं प्रवास करण्याची सवय लागावी. हा योजनेमागचा मुख्य उद्देश आहे. पीएमपीएलच्या प्रवाशांची संख्या वाढल्यास, रस्त्यावरील खाजगी वाहनांची संख्या देखील कमी होईल, असा विश्वास महापालिकेला वाटतोय. 

यामुळे पुण्यात पाणी पुरवठा झाला बंद...

यामुळे पुण्यात पाणी पुरवठा झाला बंद...

पुणे महापालिकेचा पाणी पुरवठा जलसंपदा विभागाने थांबवला आहे. मंगळवारी रात्री आठपासून पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. 

राजकीय सुडापोटी पुण्याचा पाणी पुरवठा ठप्प?

राजकीय सुडापोटी पुण्याचा पाणी पुरवठा ठप्प?

जलसंपदा विभागानं पुणे महापालिकेचा पाणी पुरवठा थांबवलाय. कोणतीही सूचना न देता जलसंपदा विभागानं पाणी पुरवठा बंद केलाय. 

जलसंपदा विभागानं पुणे मनपाचा पाणी पुरवठा केला बंद

जलसंपदा विभागानं पुणे मनपाचा पाणी पुरवठा केला बंद

 जलसंपदा विभागानं पुणे महापालिकेचा पाणी पुरवठा थांबवला आहे. कोणतीही सूचना न देता जलसंपदा विभागानं पाणी पुरवठा बंद केला आहे.

पुण्यात पोलिसांशी चकमकीत दोघेही गुंड ठार

पुण्यात पोलिसांशी चकमकीत दोघेही गुंड ठार

ग्रामीण पोलिस आणि कुख्यात गुन्हेगार शाम दाभाडे आणि धनंजय शिंदे  यांच्या झालेल्या चकमतीत दोघेही गुंड ठार झाले आहेत. चाकणच्या वरसाई पपवनचक्कीच्या डोंगरात लपल्याची पोलिसांना मिळाली होती. 

एनडीएच्या विद्यार्थ्यांचं दीक्षांत संचलन

एनडीएच्या विद्यार्थ्यांचं दीक्षांत संचलन

देशसेवा अन देशभक्तीचं प्रतीक म्हणजे भारतीय सशस्त्र सेना. एनडीएतील १३१ व्या तुकडीचे छात्र आज हा गौरव प्राप्त करण्यासाठी सज्ज झाले आहेत.  उगवत्या सूर्याच्या साक्षीनं ते लष्करात अधिकारी म्हणून रुजू झाले आहेत. यानिमित्तानं एनडीएतील खेतपाल मैदानावर छात्रांचं शिस्तबद्द असं दीक्षांत संचलन झालं. 

राज्यात महिलांवरील अत्याचार गुन्ह्यात 16.57 टक्के वाढ

राज्यात महिलांवरील अत्याचार गुन्ह्यात 16.57 टक्के वाढ

राज्यात 2015 मध्ये दाखल झालेल्या एकूण गुन्ह्यांमध्ये 2014 च्या तुलनेत 9.97टक्के वाढ झाली आहे.  

कुख्यात गुंड श्याम दाभाडेचा पोलीस एन्काऊंटर

कुख्यात गुंड श्याम दाभाडेचा पोलीस एन्काऊंटर

पुणे - ग्रामीण पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत कुख्यात गुंड श्याम दाभाडे हा ठार झाला आहे. या कारवाईत त्याचा एक साथीदार धनंजय शिंदे देखील ठार झाला आहे. तळेगाव दाभाडे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्या प्रकरणात तो मुख्य आरोपी होता. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या हत्या प्रकरणातही त्याच्यावर गुन्हा दाखल होता.

'झोंबी'कार आनंद यादव यांचं निधन

'झोंबी'कार आनंद यादव यांचं निधन

ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांचं पुण्यात निधन झालं आहे. पुण्यातल्या धनकवडीतील कलानगरमधल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 89 वर्षांचे होते. सोमवारी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

पुण्यानंतर आता पिंपरी-चिंचवडमध्येही 'माणुसकीची भिंत'

पुण्यानंतर आता पिंपरी-चिंचवडमध्येही 'माणुसकीची भिंत'

पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये माणुसकीची भिंत उभारण्यात आली आहे.

पुण्यात तरूणाने घेतली वाघाच्या पिंजऱ्यात उडी आणि....

पुण्यात तरूणाने घेतली वाघाच्या पिंजऱ्यात उडी आणि....

पुण्यात कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात शुद्धोधन वानखेडे या तरुणानं थेट  कैफ नावाच्या वाघाच्या पिंजऱ्यात उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पुण्यात पाण्याच्या टाकीवर चढून युवकाची वीरुगिरी

पुण्यात पाण्याच्या टाकीवर चढून युवकाची वीरुगिरी

जिल्ह्यातील खडकी येथे एका युवकांने वीरुगिरी केली. खडकी बाजार येथे पाण्याच्या टाकीवर उडी मारण्याचा प्रयत्न या युवकाने केला. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला जीवदान दिले.

पुण्याला काळिमा फासणारी घटना पुन्हा उघड...

पुण्याला काळिमा फासणारी घटना पुन्हा उघड...

पुण्यातील वडगाव शेरी परिसरात सेक्स रॅकेट चालवणाऱ्या दोन महिलांसह तिघांचा पर्दाफाश करून गुन्हे शाखेतील मोठे सेक्स रॅकेट उद्धवस्त केले आहे.  

दिलीप पाडगावकर यांचे आज पुण्यात निधन

दिलीप पाडगावकर यांचे आज पुण्यात निधन

ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांचे आज पुण्यात निधन झाले. गेला आठवडाभर त्याच्यावर पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. ते किडनीच्या आजाराने आजारी होते. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 72 वर्षांचे होते. 

पुण्यात 1.12 कोटींची रोकड जप्त, एकाला अटक

पुण्यात 1.12 कोटींची रोकड जप्त, एकाला अटक

शहरात 1 कोटी 12 लाख 50 हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या सगळ्या नोटा जुन्या चलनातील 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा होत्या.

OLXने आला चोर घरी

OLXने आला चोर घरी

तुम्हाला जर स्वतःची गाडी विकायची असेल आणि त्यासाठी तुम्ही OLX वर जाहिरात करणार असाल तर जरा सावधान. कारण अशा जाहिरातीच्या माध्यमातून एखादा चोर तुमच्याशी संपर्क साधू शकतो आणि नंतर टेस्ट राईडचा बनाव करून तुमची गाडी घेऊन पसार होऊ शकतो. 

पुण्यात नोकरीच्या नावाने अनेकांना गंडा

पुण्यात नोकरीच्या नावाने अनेकांना गंडा

परदेशात नोकरी देण्याचं आश्वासन देऊन अनेक तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याच प्रकार पुण्यामध्ये पुढे आलायं.. पैशासोबतच व्हिजा काढण्यासाठी घेतलेले पासपोर्ट देखील या तरुणांना परत मिळालले नाहीत..

पुण्यात सापडली एक कोटीची रोकड...

पुण्यात सापडली एक कोटीची रोकड...

पुणे पोलीसांनी एक कोटी रुपयांची रोकड पकडली आहे. चलनातून बाद झालेल्या हजार आणि पाचशेच्या नोटांच्या स्वरुपात ही रक्कम आहे. अंकेश अग्रवाल या युवकाकडून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. एक कोटी अकरा लाख शेहचाळीस हजार एवढी ही रक्कम आहे. पुणे पोलीसांच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली आहे.