रेल्वेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू

रेल्वेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू

लोकलचा धक्का लागून महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना दिवा रेल्वे स्थानकाजवळ रविवारी सकाळी घडली, ही महिला रेल्वे रुळ ओलांडत होती अशी प्राथमिक माहिती आहे.

लोकलच्या डब्यातच महिलेची प्रसुती लोकलच्या डब्यातच महिलेची प्रसुती

भांडूप स्थानकाजवळ लोकलच्या डब्यातच एका महिलेची प्रसुती झाल्याची घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली, त्यावेळी  ही घटना घडली.

रेल्वे प्रवाशांकरिता खूशखबर रेल्वे प्रवाशांकरिता खूशखबर

प्रवाशांच्या अनेक तक्रारीनंतर भारतीय रेल्वे नियमांमध्ये काही बदल करणार आहे. हे बदल १ जुलैपासून लागू होतील. आता रेल्वे बूकिंगसारख तुम्ही ट्रेनही बूक करू शकता.

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या 142 विशेष गाड्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या 142 विशेष गाड्या

मान्सून सुरू झाला असतानाच मुंबईकरांना गणेशोत्सवासाठी गावी जाण्याच्या रिझर्वेशनचे वेध लागतात. यासाठी कोकणात रेल्वेने 142 विशेष फे-या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 

आता फेसबुकवरही रेल्वे प्रवाशांना तक्रार करता येणार आता फेसबुकवरही रेल्वे प्रवाशांना तक्रार करता येणार

यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी एकत्रित सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचं लॉचिंग केलं आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्यास मदत होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

जगातील सर्वात मोठ्या लांबीचा रेल्वे बोगदा खुला जगातील सर्वात मोठ्या लांबीचा रेल्वे बोगदा खुला

जगातील सर्वात लांबीचा तसेच खोली असलेला रेल्वे बोगदा तयार झाला आहे. स्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतरांगातून हा बोगदा जातो. ५७.१ किमी लांबीचा हा बोगदा आहे. 

मनपा आणि रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही - शेलार मनपा आणि रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही - शेलार

महापालिका आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांचा समन्वय नसल्याने दरवर्षी पाणी साचून रेल्वेचा खोळंबा होतो. त्यामुळे या दोन यंत्रणात अधिक समन्वयाची गरज असल्याचं मत मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केलंय. रेल्वेच्या नाल्यांची पाहणी केल्यानंतर पालिका आणि रेल्वे अधिकाऱ्यांना त्यांनी सूचनाही केल्या.

चीनच्या ड्रॅगनची भारतात घूसखोरी सुरुच चीनच्या ड्रॅगनची भारतात घूसखोरी सुरुच

चीनने तिबेटला रोड आणि रेल्वेच्या माध्यामातून नेपाळशी जोडल्यानंतर आता चीन आपले जाळे बिहारपर्यंत पसरविण्याचा विचार करत आहे.

गरीबरथमध्ये प्रवाशांना पॅन्ट्रीकार कर्मचाऱ्यांकडून मारहाण गरीबरथमध्ये प्रवाशांना पॅन्ट्रीकार कर्मचाऱ्यांकडून मारहाण

 'नीर'ची पाण्याची बाटली मागणाऱ्या प्रवाशांना पॅन्ट्रीकार कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. हजरत निजामुद्दीन-वांद्रे गरीब रथ एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली. या वरून सर्रास पाण्यासाठी अतिरिक्त पैशांची मागणी करणाऱ्या पॅन्ट्रीकार कर्मचाऱ्यांची दादागिरी वाढल्याचं समोर येतंय.  

रेल्वेचे हे १० नियम जुलैपासून बदलणार रेल्वेचे हे १० नियम जुलैपासून बदलणार

 रेल्वे आपल्या तिकीट प्रणातील बदल करीत आहे. हा बदल १ जुलै २०१६ पासून लागू होतोय.

रेल्वेची जबरदस्त कॅशबॅक ऑफर रेल्वेची जबरदस्त कॅशबॅक ऑफर

आयआरसीटीसी म्हणजेच इंडियन रेल्वे कॅटरिंग ऍण्ड टूरिजम कॉरपोरेशननं  प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी नवी ऑफर दिली आहे.

रेल्वे स्टेशन परिसरात तात्काळ वैद्यकीय मदत, खासगी डॉक्टरांकडून उपचार शक्य रेल्वे स्टेशन परिसरात तात्काळ वैद्यकीय मदत, खासगी डॉक्टरांकडून उपचार शक्य

रेल्वे स्टेशन परिसरात जखमी प्रवाशाला तत्काळ वैद्यकीय मदत मिळणं शक्य होणार आहे. स्टेशनवर डॉक्टर उपलब्ध नसल्यास नजीकच्या खासगी डॉक्टरला मदतीसाठी बोलावता येणार आहे.

प्रभूकृपा, जलदूतचे ४ कोटीचे पाणी बिल मागे प्रभूकृपा, जलदूतचे ४ कोटीचे पाणी बिल मागे

दुष्काळग्रस्त लातूरला मोठा गाजावाजा करत रेल्वेने पाणी पाठविण्यात आले. एकदा नव्हे तर तीनवेळा पाणी पाठविण्यात आले. ६.२० कोटी लिटर पाणी रेल्वेने पाठविले. मात्र, पाणी बिलापोटी चक्क ४ कोटी पाठविले. सर्वच स्तरातून टीका होऊ लागल्याने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी हे बिल मागे घेत असल्याचे जाहीर केलेय.

रेल्वे कर्मचाऱ्यांचे यूनिफॉर्म बनवणार फॅशन डिझायनर रेल्वे कर्मचाऱ्यांचे यूनिफॉर्म बनवणार फॅशन डिझायनर

येत्या काही दिवसांमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांना खास डिझायनर यूनिफॉर्म मिळणार आहेत.

रेल्वेची प्रवाशांना खुशखबर रेल्वेची प्रवाशांना खुशखबर

रेल्वे मंत्रालयानं प्रवाशांना खुशखबर दिली आहे.

रेल्वे प्रवाशांसाठी बॅड न्यूज रेल्वे प्रवाशांसाठी बॅड न्यूज

यंदाच्या रेल्वे बजेटमध्ये कोणत्याही भाडेवाढीचा प्रस्ताव मांडण्यात आलेला नव्हता.

प्रवाशांकडून पैसे उकळणारा रेल्वे पोलीस निलंबित प्रवाशांकडून पैसे उकळणारा रेल्वे पोलीस निलंबित

 सोशल मीडियाची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने एका रेल्वे पोलिसाला निलंबित केलं आहे.

'विलासरावांमुळेच लातूरला मिळतंय रेल्वेनं पाणी' 'विलासरावांमुळेच लातूरला मिळतंय रेल्वेनं पाणी'

मिरजेहून आलेल्या पाण्यानं लातूरकरांची तहान भागेल तेव्हा भागेल... पण जलराणीमुळे स्थानिकांची राजकारणाची भूक मात्र भागलीय. कारण, पहिली गाडी येऊन विहिरीत पाणी भरायला सुरूवात होण्यापूर्वीच भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेय्यवादाची लढाई सुरू झाली.

 'रेल्वेचा प्रवास टुथपेस्टपेक्षाही स्वस्त' 'रेल्वेचा प्रवास टुथपेस्टपेक्षाही स्वस्त'

रेल्वे तिकीटाच्या दरवाढीने सध्या सर्व प्रवाशी हैराण आहेत, रेल्वे दरवाढीचा फटका फार वर्षांनी बसल्याने प्रवाशांना हे नवीन आहे. मात्र सुरेभ प्रभू सध्या तिकीटांचे दर वाढविण्याच्या विरोधात आहेत. त्यापेक्षा रेल्वेला अन्य कोणत्या मार्गाने महसूल मिळवता येईल, यावर उपाय काढण्याचे आदेश त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

कोकण रेल्वे मार्गावर सुट्टीसाठी जादा विशेष गाड्या कोकण रेल्वे मार्गावर सुट्टीसाठी जादा विशेष गाड्या

कोकण रेल्वे मार्गावर कोकण आणि गोव्यासाठी जादा विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे. या गाड्या खास सुट्टीसाठी आहेत.