टीईटी परीक्षा : ठाणे, धुळ्यानंतर रत्नागिरीतही परीक्षा केंद्रावर गोंधळ

टीईटी परीक्षा : ठाणे, धुळ्यानंतर रत्नागिरीतही परीक्षा केंद्रावर गोंधळ

रत्नागिरीत रा.भा. शिर्के  प्रशाला टीईटी परीक्षा (TET)केंद्रामध्ये केवळ दहा विद्यार्थीनीना परीक्षा प्रवेश पत्रावरील नाव वेगळे असल्याने परीक्षा समन्वयकांनी परीक्षार्थीना रोखले. त्यामुळे या केंद्रावर काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. 

पूरपरिस्थितीमुळे कोल्हापूर - रत्नागिरी वाहतूक बंद

पूरपरिस्थितीमुळे कोल्हापूर - रत्नागिरी वाहतूक बंद

जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असून जांभळी आणि कासारी नदीला देखील पूर आलाय. इतकंच नव्हे तर या पुराचं पाणी बाजारभोगाव इथल्या  बाजारपेठेत शिरले आहे. दरम्यान, कोल्हापूर - रत्नागिरी मार्ग पूर्णत: वहातुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय. शिवाजी पुलावरील वहातूक प्रशासनान थांबवली आहे.

रत्नागिरीत भोंदूबाबाकडून कुटुंबाची फसवणूक

रत्नागिरीत भोंदूबाबाकडून कुटुंबाची फसवणूक

तालुक्यातील भावेआडम गावातील गरिब कुटुंब अंधश्रदेचा बळी ठरलंय. अशिक्षितपणा आणि गरिबीचा फायदा घेत भोंदूबाबाकडून एका कुटुंबाची फसवणूक केलीय.  

चिपळुणात वाशिष्ठी नदीला पूर, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद

चिपळुणात वाशिष्ठी नदीला पूर, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद

रत्नागिरीला पावसाने झोडपून काढलंय. चिपळूणमध्ये पावसाने कहर केलाय. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे चिपळूणच्या वाशिष्ठी नदीला पूर आलाय. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक बंद केलीय. 

रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले, संगमेश्वर-चिपळुणात पूर परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले, संगमेश्वर-चिपळुणात पूर परिस्थिती

सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपले. मध्यरात्री थोडीशी उसंत घेतलेल्या पावसानं सकाळपासून पुन्हा धुवॉधार बॅटिंग सुरु केलीय. रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड तालुक्यात पावसाची संततधार सुरु आहे. 

कोकणात जोरदार पाऊस, नद्या दुथडी

कोकणात जोरदार पाऊस, नद्या दुथडी

कोकणात तिन्ही जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे, नद्या दुथडी वाहत आहेत.

अडरे धरणात ३० वर्षीय युवकाचा मृतदेह

अडरे धरणात ३० वर्षीय युवकाचा मृतदेह

चिपळूण तालुक्यातील अडरेमधील धरणात गणेश चाळके या ३०  वर्षीय युवकाचा मृतदेह सापडला. 

फिरत्या प्रदर्शनाची 'सायन्स एक्सप्रेस' रत्नागिरीत!

फिरत्या प्रदर्शनाची 'सायन्स एक्सप्रेस' रत्नागिरीत!

रत्नागिरीच्या स्थानकात सायन्स एक्प्रेस दाखल झालीय. या एक्स्प्रेसला पाहण्यासाठी शाळेतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसतायत. 

कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प, पावसाने रुळावर माती

कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प, पावसाने रुळावर माती

आठवड्याच्या विश्रांतीनंतर कोकणात पावसाला सुरुवात झाली. या पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. कोकण रेल्वेची वाहतूक सव्वा तासापासून ठप्प आहे. कसाल-कणकवली दरम्यान रुळावर माती आल्याने वाहतूक विस्कळीत झालेय. 

झी २४ तास इफेक्ट : सुकोंडी-वाघिवणे धरणाची गळतीची अधिकाऱ्यांकडून दखल

झी २४ तास इफेक्ट : सुकोंडी-वाघिवणे धरणाची गळतीची अधिकाऱ्यांकडून दखल

झी २४ तासने दापोली तालुक्यातील सुकोंडी-वाघिवणे धरणाची बातमी दाखवल्यानंतर या धरणाची गळती थांबवण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न केले जातील, अशी माहिती जल सिंचन जलसंधारण उपविभागाच्या अधिका-यांनी दिली.

रत्नागिरीकरांसाठी आनंदाची बातमी, लवकरच विमानसेवा

रत्नागिरीकरांसाठी आनंदाची बातमी, लवकरच विमानसेवा

येथील विमानतळावरून लवकरच विमानसेवा सुरु होणार आहे. रत्नागिरी विमानतळाचं काम सध्या प्रगतीपथावर असून 2018 मध्ये या विमानतळाची सेवा सुरू होईल, अशी माहिती तटरक्षक दलाच्या अधिका-यांनी दिलीय.

पूरग्रस्तांना मदत करतांना रत्नागिरीचा जवान शहीद

पूरग्रस्तांना मदत करतांना रत्नागिरीचा जवान शहीद

अरुणाचल प्रदेशमधील पूरग्रस्तांना मदत करताना वायुदलाच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात रत्नागिरी जिल्ह्यातील फ्लाईट इंजीनिअर राजेंद्र गुजर बेपत्ता झाले होते. शनिवारी त्यांचा मृतदेह सापडला. राजेंद्र गुजर हे मंडणगड तालुक्यातील पालवणी-जांभुळनगर इथले रहिवासी आहेत. त्यांचं पार्थिव आज त्यांच्या गावी आणण्यात येईल. तिथे त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.

संघर्षाला हवी साथ : एका कोकणकन्येचा संघर्ष!

संघर्षाला हवी साथ : एका कोकणकन्येचा संघर्ष!

दहावीच्या परीक्षेत यंदाही कोकण अव्वल ठरलं. आज संघर्षाला हवी साथमध्ये एका कोकणकन्येचा संघर्ष... दापोलीतल्या जागृती जयेंद्र मंडपेला दहावीच्या परीक्षेत ९४ टक्के मिळवलेत... कुणाचाही खंबीर पाठिंबा नसताना जागृतीनं मिळवलेलं हे यश कौतुकास्पद आहे.

उपचारासाठी दाखल केलेल्या महिलेचा मृत्यू, रुग्णालयात नातेवाईकांचा गोंधळ

साप चावलेल्या महिलेचा रुग्णालयातच मृत्यू झाल्यामुळे मृत महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयातच गोंधळ घातल्याची घटना चिपळूण तालुक्यात घडली आहे. 

रत्नागिरीत कारने ५ गाड्यांना चिरडले

रत्नागिरीत कारने ५ गाड्यांना चिरडले

एसटी स्टँण्डसमोर अपघाताचा भयानक थरार पाहायला मिळाला. कुवारबावहून रत्नागिरीच्या दिशेने येणाऱ्या कारने पाच वाहनांना चिरडत नेले. 

रत्नागिरीतील जलयुक्त शिवार प्रकरणाची एसीबीकडून चौकशी

रत्नागिरीतील जलयुक्त शिवार प्रकरणाची एसीबीकडून चौकशी

खेड दापोली आणि मंडणगडमधील जलयुक्त शिवार प्रकरणी आता एसीबीनं चौकशी सुरु केलीय. या तीन तालुक्यातील जलयुक्त शिवार मधल्या कोट्यावधींच्या भष्ट्राचार झी 24 तासाने उघड केला होता.

सागरी महामार्गावरचा दांडे पूल खचला, लाखो रुपयांचा चुराडा

सागरी महामार्गावरचा दांडे पूल खचला, लाखो रुपयांचा चुराडा

रत्नगिरी-सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना जोडणारा सागरी महामार्गावरचा दांडे पूल खचल्यामुळे आता इथली वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागानं घेतलाय.

रत्नागिरीत मुसळधार पाऊस, समुद्र उधाणाने मोठे नुकसान

रत्नागिरीत मुसळधार पाऊस, समुद्र उधाणाने मोठे नुकसान

सलग चार दिवस समुद्राला आलेल्या उधाणाच्या भरतीने कोकण किनारपट्टीत अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे.

 मोबाईल मार्केटमध्ये छापे,  लाखो रुपयांचा माल जप्त

मोबाईल मार्केटमध्ये छापे, लाखो रुपयांचा माल जप्त

तुम्ही जर विविध आकर्षक कंपन्याच्या मोबाईलचे शौकिन असाल तर हि बातमी जरूर पहा... सध्या बाजारात मोबाईलचे बनावट साहित्य विकलं जातंय..

चिपळुणातील १५ कुटुंबियांचा पुर्नवसानाचा प्रश्न अनुत्तरीच

चिपळुणातील १५ कुटुंबियांचा पुर्नवसानाचा प्रश्न अनुत्तरीच

शहरातील गोवळकोट कदम बौद्धवाडी येथील १५ कुटुंबियांचा पुर्नवसानाचा प्रश्न अद्यापही जैसेथेच आहे गेल्यावर्षी घरांवर दरड कोसळेल या भीतीमुळे येथील 15 कुटुंबियांना स्थलांतरीत करण्यात आलं. वर्षभरात पुर्नवसन करू असं आश्वसान प्रशासनाने दिलं होतं. मात्र अद्याप पुर्नवसनाचा प्रश्न तसाच आहे. 

भेकर जातीच्या हरणाला अजगराने गिळलं

भेकर जातीच्या हरणाला अजगराने गिळलं

अंबोली जकातवाडीजवळ १५ ते २० किलो वजनाच्या भेकराला अजगराने गिळलं आहे. या भेकराला गिळल्याने अजगर निपचित पडला होता.