पावळेचा पाणी पाष्टाक !

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा विजय आणि काँग्रेसचा पराजय...यानंतरच बोल... कोकणात कौलारु घरे असतात. पावसाच्या दिवसात उतरणीचा भाग संपतो त्याला पावळी म्हणतात. आणि चढणीचा भाग संपतो त्याला पाशीट म्हणतात. पाणी नेहमी उतरणीला असते.ते पावळीतून गळते. पण पाण्याने उलटा प्रवाह स्विकारला तर मालवणी भाषेत याच अतर्क्याला म्हणतात, पावळेचा पाणी पाष्टाक !

आधुनिक रंगभूमीचं सोनेरी पान – गिरीश कार्नाड (लेख)

महाराष्ट्.. कलावंताची खाण आणि कलेचं माहेरघर.. इथल्या मातीचा कणन कण शोध घेत असतो दुरवरच्या त्या क्षितीजाचा.. आणि मातीचा वारसा खेळतो प्रत्येक महाराष्ट्रीयाच्या नसानसातून..

'आंगणेवाडी जत्रा...` चैतन्यानुभवाचा सोहळा...

‘येतंस मा आंगणेवाडीक जत्रेक...’ मन गलबलून आलं. ज्याचा शोध माझं मन घेत होत. त्या प्रश्नाचा उत्तर मला माझ्या मोबाईलनं दिलं होतं. होय आंगणेवाडी जत्रा. वर्षानुवर्ष सुरु असलेला माझ्या कोकणचा महाकुंभ... कुठलाही भव्य जलाशय नसतानाही देहास सचैल स्नान घालणारं आमचं शक्तीपीठ - श्री क्षेत्र आंगणेवाडी...

कोकणातलो गणेशोत्सव

गणपतीचो उत्सव.. हा हा म्हणता कधी वरष सरता कळनाचं नाय.. खर तर ह्यो उत्सव जगाचो आसलो तरी कोकणातल्या वाडीवाडीत जा काय धुमशान व्हता ना ता काय़ सांगाचा म्हाराजा..

माऊली... माऊली... माऊली...

ऋषी देसाई युगे अठ्ठावीस वीटेवर उभा असलेला पंढरपूरचा पांडुरंग हे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत आहे. आषाढी कार्तिकीची वारी हा मराठी मनाचा कुळाचार आहे. दरवर्षी कोणत्याही निमंत्रणाशिवाय आणि आनंदाच्या परमोच्च सोहळ्यात माऊलीचा ही आनंदवारी सुरु होते..

देवराई

ऋषी देसाई पावसाळा सृष्टीचा नव्या अविष्काराचा महिना. रखरखीत झालेल्या वसुंधरेवर हिरवी शाल पांघरणारा हा ऋतु. याच महिन्यात निसर्गोत्सवाला जोड मिळते ती शासकीय आणि सामाजिक वनीकरणाची. आज ग्लोबल वॉर्मिंगच्या झळा जाणवत असताना वनराईची आपल्याला प्रकर्षाने आठवण होते.

"खाली हाथ आये"

ऋषी देसाई फेसबूकवरचं फार्मव्हिलेवरच्या शेत जळतंय म्हणून लवकर ऑफीस गाठून नेट चालू करुन पाणी घालणारी आम्ही माणसे, ज्या महाराष्ट्रात राहतोय त्याच महाराष्ट्रातील निम्याहून जास्त शेत आज पाण्याअभावी सुकून गेलय, पीकं जळून गेलीयत,

करुन (कर + ऋण) दाखवलं...

ऋषी देसाई मुंबई महानगरपालिका....देशातील सर्वात श्रीमंत अशी या महानगरपालिका ख्याती आहे...या महापालिकेचं बजेट देशातील जवळपास दहा छोट्या राज्यांच्या बजेटलाही मागे टाकणारं आहे...आज मुंबई महापालिकेचा 2012-2013 साठीचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर करण्यात आला...

पेटलेला दर्या, अन् मेलंल काळीज

ऋषी देसाई साडेसातशे लांबीची किनारपट्टी आणि परशुरामभुमी असं गौरवानं म्हणणा-या माझ्या लाडक्या अरबी समुद्रात काल उतरलो, आणि मनाची कालवाकालव सुरु झाली. मस्त स्नॉरक्लीग केल.