गुजरातच्या पूर्णा नदीत कोसळली भरलेली बस, २० जणांचा मृत्यू

गुजरातच्या पूर्णा नदीत कोसळली भरलेली बस, २० जणांचा मृत्यू

दक्षिण गुजरातच्या नवसारी जिल्ह्यात राज्य परिवहनची एक बस पूर्णा नदीत कोसळलीय. 

ठार मारून त्याला जाळलं आणि राख नदीत सोडली, पुण्यातील धक्कादायक प्रकार ठार मारून त्याला जाळलं आणि राख नदीत सोडली, पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुण्यामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पुण्यातील भोर तालुक्यात एका १९ वर्षीय तरुणाचं अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली. एवढंच नव्हे तर आरोपींनी त्याला मारून मृतदेह सारोळा गावच्या नदीपात्राजवळ जाळला आणि राख नदीमध्ये सोडली.

दुष्काळाच्या झळा ; कोरड्या नदीतून मगर शेतात दुष्काळाच्या झळा ; कोरड्या नदीतून मगर शेतात

जिल्ह्यातील काणेगाव शिवारात एक सहा ते सात फूट लांबीची मगर सापडली आहे, ही मगर नदीत किंवा एखाद्या तलावात नाही, तर चक्क शेतात सापडली आहे. दुष्काळामुळे माणसांचेही जीवन कठीण झालं आहे, मात्र मूके जलचरही नदी कोरडी पडल्याने, भक्ष्याच्या शोधात जमिनीवर येत आहेत.

नदीच्या पाण्यात मिळाले कोकेन नदीच्या पाण्यात मिळाले कोकेन

जसे पृथ्वीच्या पोटातून ज्वालामुखी बाहेर येतो, अगदी तसेच आता पृथ्वीच्या पोटातून कोकेनसारखे अमली पदार्थ बाहेर प़डण्यास सुरूवात झाली आहे. 

रायगडात चक्क  नदीत डॉल्फ़िन रायगडात चक्क नदीत डॉल्फ़िन

रायगड जिल्ह्यात महाकाय व्हेल माशाच्या मृत्यूनंतर डाल्फीनला वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते. जिल्ह्यात नागोठण्याजवळ अंबा नदीत चक्क डॉल्फ़िन मासा दिसला. डॉल्फ़िन आणि त्याच्या कसरती पाहण्यासाठी तिथं लोकांनी एकच गर्दी केली.

पुण्यात नदीपात्रात जॉगिंग ट्रॅक, नवा वाद उद्भवला पुण्यात नदीपात्रात जॉगिंग ट्रॅक, नवा वाद उद्भवला

पुण्यामध्ये कुठलंही काम वादाशिवाय पूर्ण होत नाही असं म्हणतात. शहरातल्या मुठा नदी पात्रात बांधण्यात येत असलेल्या जॉगिंग ट्रॅकमुळे, पुन्हा एकदा हा समज पक्का झालाय.

गुप्त सरस्वती नदीचा लागला शोध... गुप्त सरस्वती नदीचा लागला शोध...

सरस्वती नदी गुप्त स्वरुपात असल्याची आख्यायिका तुम्हीही ऐकली असेल. पण, हीच नदी आता सर्वांसमोर आलीय. सरस्वती नदीच्या शोधात एक मोठा विजय हाती लागलाय, असं म्हणायला हरकत नाही. 

दरभंगा जिल्ह्यात पावसामुळे नदीचं रौद्ररुप दरभंगा जिल्ह्यात पावसामुळे नदीचं रौद्ररुप

दरभंगा जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसानं नदीनं रौद्ररुप घेतलंय. या पुरामध्ये अडकलेल्या एका युवकाची दृश्य आपण पाहू शकताय. हा युवक सुरुवातीला पाण्यात वाहून गेला. मात्र नंतर त्याचवेळी त्यानं प्रसांगवधान राखत झाडाला पकडलं.

दुथडी वाहणारी नदी गर्भवतीने पोहत पार केली दुथडी वाहणारी नदी गर्भवतीने पोहत पार केली

आई आपल्या बाळासाठी काय करत नाही, त्याचा आणखी एक थरारक अनुभव नुकताच उत्तर कर्नाटकातल्या यादगीर जिल्ह्यात आला आहे. 

रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

रायगड जिल्ह्याला सलग दोन दिवस मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलंय. रविवारपासून जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस पडतोय. पाली, पेण, खालापूर, कर्जत, नागोठणे अलिबाग या भागात पावसाची संततधार सुरूच आहे. 

व्हिडिओ: पुराच्या पाण्यासोबत खेळ पडला महागात! व्हिडिओ: पुराच्या पाण्यासोबत खेळ पडला महागात!

पुराच्या पाण्यासोबत स्टंट करणं कसं महागात पडू शकतं, याचा एक व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवतोय.

राज्यातल्या नद्या कोरड्या, तापी दुथडी! राज्यातल्या नद्या कोरड्या, तापी दुथडी!

एकीकडे महाराष्ट्रातल्या सर्व नद्या कोरड्या पडल्या असताना तापी नदीला मात्र भरपूर पाणी आहे. ४५ लाख लोकांना दररोज एक वर्षभर पाणी पुरवठा करता येईल इतकं पाणी या नदीच्या तीन बॅरेजेसमध्ये आहे. 

जेव्हा प्रियंका चोपडा तापी नदीच्या पुलावरून उडी मारते...

तापीनदीच्या पुलावरून प्रियंका चोपडा खाली उडी मारतेय. पण हे सिनेमाचं शुटिंग आहे.

पिंपरी-चिंचवडमधील काही कंपन्यांकडून नदीत दुषित पाणी

पिंपरी चिंचवड मधल्या नद्यांच्या प्रदुषणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना काही महिन्यापूर्वी कानपिचक्या दिल्या. पण त्याचा परिणाम महापालिकेवर होताना दिसत नाही.

गोदावरीत वीजेचा करंट सोडून जीवघेणी मासेमारी

औरंगाबादच्या कायगाव टोक्यावर असलेल्या गोदावरी पात्रात धोकादायक पद्धतीने मासेमारी सुरू आहे. नदीच्या पाण्यात वीजेच्या तारा टाकून इथे मासेमारी केली जातेय. झी 24 तासच्या कॅमे-यात हा भयानक प्रकार उघड झालाय. यामुळे पर्यावरणाचं नुकसान होतंच आहे. पण नदीच्या पात्रालगत मानवी जिवितालाही धोका निर्माण झालाय.

नेपाळमधील बस अपघातात १४ ठार

पल्पा जिल्ह्यातील पर्वत भागात आज गुरुवारी सकाळी भालूकोला नदीमध्ये बस नदीत कोसळल्याने झालेल्या अपघातात १४ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात सात जण जखमी झाले आहेत.

श्रुतिका स्केटिंग मास्टर, लिम्काबुकमध्ये विक्रमाची नोंद

श्रुतिका चंदवानी ही मूळची कोल्हापूरची. श्रुतिका (२२) ही स्केटिंगमध्ये मास्टर होती. तिच्या विक्रमाची नोंद लिम्काबुकमध्ये करण्यात आली आहे.

श्रुतिकानं सांगितलं मी कोल्हापूरला येतेय, पण...

पुण्यातून पाच दिवसांपूर्वी गायब झालेल्या चौघांपैकी एक तरुण, चिंतन बूच याचा मृतदेह सापडलाय. नीरा नदीमध्ये त्याचा मृतदेह सापडलाय. पुणे पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय. मात्र अन्य दोन तरुण आणि एका तरुणीबाबत काहीही माहिती मिळालेली नाही. दरम्यान, श्रुतिकानं आदल्याच दिवशी नोकरीचा राजीनामा दिला होता. आणि दुस-या दिवशी घरी येणार, असं कोल्हापूरला घरच्यांना कळवलं होतं. पण दुस-या दिवळी श्रुतिका पोहोचलीच नाही.

‘त्या’ तरुणांपैकी चिंतन बुचचा मृतदेह नदीत सापडला

पुण्यातल्या गायब झालेल्या तरुणांपैकी चिंतन बुच या तरुणाचा निरा नदीत मृतदेह सापडलाय. चार दिवसांपूर्वी पुण्याहून निघालेले चार तरुण अचानक बेपत्ता झाले होते. त्यात एका तरुणीचाही समावेश आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. इतर तिघांचा पोलीस आता शोध घेत आहेत.

नद्यांच्या `गटारा`वर पर्यावरणप्रेमींची आंदोलनं...

चंद्रपूर जिल्ह्यातल्या बारमाही नद्यांची इथल्या उद्योगांनीच गटारे केली आहेत. पर्यावरण दिनाच्या निमित्तानं या मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी वर्धा नदी पात्रात आंदोलन केलं.

मंगळावर वाहत होती नदी!

मंगळ ग्रहावर एकेकाळी १,५00 किमी लांब आणि सात किमी रुंदीची महाकाय नदी वाहन होती, असे दर्शविणारी विस्मयकारी छायाचित्रे गेल्या शुक्रवारी ‘युरोपियन स्पेस एजन्सी’च्या (ईएसए) ‘मार्स एक्स्प्रेस’ या यानाने पाठविली आहेत. एजन्सीने पाठविलेले हे यान मंगळाच्या सतत प्रदक्षिणा करीत असते.