काळा पैशासंदर्भात मोदी सरकारने घेतलेल्या धोरणांवर काँग्रेसची जोरदार टीका

काळा पैशासंदर्भात मोदी सरकारने घेतलेल्या धोरणांवर काँग्रेसची जोरदार टीका

काळा पैशासंदर्भात केंद्रातील पंतप्रधान मोदी सरकारने घेतलेल्या धोरणांवर तसेच राज्यातील कारभारावर काँग्रेसने सडकून टीका केली. सहकार चळवळच मोडीत काढली गेली तर त्याचा फटका शेतकऱ्यांनाच बसेल, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.

महिलेला बांधून मारहाण, गोपाळ समाजाची जातपंचायत बरखास्त

महिलेला बांधून मारहाण, गोपाळ समाजाची जातपंचायत बरखास्त

मच्छिंद्रगडमध्ये झालेल्या मारहाणप्रकरणी गोपाळ समाजाची जातपंचायत बरखास्त करण्यात आलेय. भविष्यात अनुचित प्रकार घडणार नसल्याची ग्वाही देण्यात आलेय.

आर आर पाटील यांचा गड पत्नीने राखला, विक्रमी मतांनी विजय

आर आर पाटील यांचा गड पत्नीने राखला, विक्रमी मतांनी विजय

 सांगली तासगाव येथे झालेल्या विधानसभा पोटनिवडणूकीत काँग्रेस उमेदवार सुमन पाटील यांनी विक्रमी विजयाची नोंद केली.

सुप्रिया सुळे भोवळ येऊ स्टेजवर पडल्या

सुप्रिया सुळे भोवळ येऊ स्टेजवर पडल्या

खासदार सुप्रिया सुळेना भोवळ येवून स्टेजवर पडल्या. तासगाव येथे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांची पत्नी सुमन पाटील यांच्या प्रचारसाठी त्या आल्या होत्या. 

आता राज्यात काकू-पुतण्याचं राजकारण - अजित पवार

आता राज्यात काकू-पुतण्याचं राजकारण - अजित पवार

राज्यानं आतापर्यंत काका-पुतण्याचं राजकारण पाहिलं, आता काकू-पुतण्याचं राजकारण सुरू झालंय, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्य सरकारला टोला लगावलाय. 

वाळू माफिया टोळक्याचा ग्रामस्थांवर प्राणघातक हल्ला

वाळू माफिया टोळक्याचा ग्रामस्थांवर प्राणघातक हल्ला

सांगलीत तासगाव तालुक्यातील राजापूर इथं वाळू माफियांनी ग्रामस्थांवर हल्ला केल्याची घटना घडलीय. जवळपास पन्नास जणांच्या टोळक्यानं ग्रामस्थांवर हल्ला केला.

काँग्रेसचे उमेदवाराच्या ऑफिसवर छापा, सांगलीत रोकड सापडली

काँग्रेसचे नागपूरचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांच्या ऑफिसवर छापा पडलाय. निवडणूक आयोगानं ही कारवाई केलीय. नागपूरच्या ग्रेट नाग रोड परिसरातील ही घटना आहे. तर सांगलीत लाखोंची रोकड जप्त करण्यात आली आहे.

डॉक्टर, इंजिनिअर यांनी बोगस मजूर दाखवून पैसे लाटलेत

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमध्ये सांगली जिल्ह्यात आटपाडी तालुक्यातल्या शेटफळे इथे चक्क एक डॉक्टर आणि इंजिनिअर यांना `रोहयो`चे बोगस मजूर दाखवून पैसे लाटल्याची घटना उघडकीस आलीय. दीपक भोसले नावाचा व्यक्ती शेटफळे इथे मेडिकल प्रॅक्टिस करत आहे.

आमदार मारहाणीनंतर सूर्यवंशींची मुंबईबाहेर बदली

आमदार मारहाण प्रकरणातील पोलीस अधिकारी सचिन सूर्यवंशी यांची मुंबईबाहेर बदली करण्यात आली आहे. वरळी वाहतूक पोलीस शाखेतून सांगलीच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात त्यांची बदली झाली.

राज्यात पावसाचं धुमशान, पुराचा तडाखा

राज्यात पावसाचं धुमशान सुरू आहे. कोकणातील महाडमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. नाशिकमधील गोदावरी नदीला पूर आला असून चंद्रपूर जलमय झाले आहे. तर जळगावात पुरामुळं शेतीचं नुकसान झाले आहे. ८ दिवसांनंतर सुरू झालेला माळशेज घाट पुन्हा बंद झालाय.

सोनियांवर टीका करणाऱ्यांवर राणे संतापले

सांगली महापालिकेच्या निवडणूकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलाय...या प्रचारसभेत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सोनिया गांधींवर टीका करणा-यांचा खरपूस समाचार घेतला...

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंचे पोस्टर जाळले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजितदादा आणि आर. आर. आबा यांच्यावर केलेल्या टीकेचे संतप्त पडसाद सांगलीत उमटले आहेत.

महापौरांचा प्रताप, लग्नात महापौरांचे चोपदार

सांगलीचे महापौर इद्रीस नायकवडी त्यांच्या मुलाच्या शाही विवाहामुळं वादात सापडले असतानाच त्यांच्या मुलाच्या लग्नात मनपा कर्मचा-यांना जुंपल्याची धक्कादायक बाब उघड झालीये.

राज ठाकरे आज सांगलीत संवाद साधणार

महाराष्ट्राच्या दौ-यावर निघालेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सांगलीतल्या पदाधिका-यांशी संवाद साधणार आहेत. राज ठाकरे कालच सांगलीत दाखल झालेत.

ऊस आंदोलन पेटणार, ३००० रूपयेच द्या – जोशी

उसाची पहिली उचल २५०० रुपयाची अमान्य करून तीन हजार रुपये हा एक रक्कमी दर मिळण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर आंदोलन सुरु राहणार असल्याची घोषणा शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी केली. सांगली आयोजित करण्यात आलेल्या ऊस परिषदेत ते बोलत होते.

सांगलीत शेतकऱ्यांवर गोळीबार, दोन ठार

शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनात दोन शेतकऱ्यांना आपला प्राण गमवावा लागला आहे. सांगलीत आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.

प्रेयसीवर सामूहिक बलात्कार करून केला खून

सांगली जिल्ह्यातील विटा येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. वारंवार लग्नासाठी तगादा लावणार्‍या प्रेयसीवर प्रियकराने आपल्या तीन मित्रांसह सामूहीक बलात्कार करून तिचा निर्घृण खून केला आहे.

वेश्या वस्तीत सुरू झाली अंगणवाडी!

सांगलीतल्या वेश्या वस्तीतील मुलांसाठी राज्य सरकारनं पहिली अंगणवाडी सुरू केली. आणि सेक्स वर्कर अमिरबी शेख यांच्या कार्याचं आणखी एक पाऊल पुढे पडलं. चार वर्षांपूर्वी अमिरबी शेख यांनी देशातील पहिली वेश्या वस्तीतील शाळा सुरू केली.

स्मिता पाटीलची राष्ट्रवादीत एंट्री

राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांची मुलगी स्मिता पाटील हिने राजकारणात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीच्या युवती काँग्रेसच्या माध्यमातून स्मितानं राजकारणात पाऊल टाकलं आहे.

सांगलीत आहारासाठी बचगट कर्जबाजारी

कुपोषणाचं प्रमाण कमी व्हावं यासाठी अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार योजना सुरू करण्यात आली. तर बचत गट सक्षम व्हावे या उद्देशानं पोषण आहाराची काम सरकारनं बचत गटांकडे दिली. पण यामुळं बचत गटांचं नुकसानच जास्त होतंय. सांगली जिल्ह्यातल्या हरीपुरमधल्या बचत गटांना कर्ज काढून आणि उसनवारीवर पोषण आहार बनवावा लागतोय.

राज्यात शेतीची नशा

सुरेंद्र गांगण बीड, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यात अफूची शेती फोफावत आहे. बीड जिल्ह्यात प्रथम अफूच्या शेतीची पाळेमुळे दिसून आली. मात्र, ही पाळेमुळे खोलवर रूजलेली होती. कृषी अधिकाऱ्यांना चक्क चुना लावून अन्य शेतीच्या नावाखाली अफूची पेरणी केली गेली. ही पेरणी बक्कळ पैसा मिळविण्यासाठीच झाल्याचे स्पष्ट होत आहे. झटपट श्रीमंत होण्यासाठी या शेतीची नशाच शेतकऱ्याला पडलेली दिसून येत आहे.