सातारा-करमाळा एसटी अपघातात ८ ठार १२ जखमी

सातारा-करमाळा एसटी अपघातात ८ ठार १२ जखमी

सातारा - करमाळा एसटीला भिषण अपघात झाला. या अपघातात ८ ठार तर १२ प्रवासी जखमी झालेत. एसटी अकलुजजवळ झाडावर आदळून हा अपघात झाला. हा अपघात सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या दरम्यान झाला. जखमीना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

महिलांसाठी महिलांचे खास हॉटेल साताऱ्यात महिलांसाठी महिलांचे खास हॉटेल साताऱ्यात

 सध्या महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा गाजतोय. त्याच पार्श्वभूमीवर महत्त्वाची बातमी. महिलांच्या सुरक्षेसाठी फलटणमध्ये एक थ्री स्टार हॉटेल उभारण्यात आलं. या हॉटेलमध्ये सगळं काही लेडीज स्पेशल आहे. याच हॉटेलसंदर्भातला एक रिपोर्ट.

माऊलींसाठी उभं रिंगण, तुकोबांसाठी मेंढ्यांचं रिंगण माऊलींसाठी उभं रिंगण, तुकोबांसाठी मेंढ्यांचं रिंगण

सावळ्या विठूरायाच्या ओढीने पंढरीची वाट चालणाऱ्या वारीतील पहिलं उभे रिंगण चांदोबाचा लिंब इथं पार पडणार आहे.

प्रतिक्षेत असलेला मान्सून राज्यात दाखल, कोकणसह पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात पाऊस प्रतिक्षेत असलेला मान्सून राज्यात दाखल, कोकणसह पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात पाऊस

मान्सून दोन दिवस आणखी लांबणार असे वृत्त हवामान विभागाने वर्तविले होते. मात्र, पावसाने त्याआधीच धडक दिलेय. कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार हजेरी लावली. त्याचवेळी केरळमध्ये मान्सून दाखल झालाय. तो महाराष्ट्राच्या दिशेने पुढे सरकत आहे.

कोयनेतील पाणीपातळी घटली, राज्यावर लोडशेडिंगचे संकट कोयनेतील पाणीपातळी घटली, राज्यावर लोडशेडिंगचे संकट

संपूर्ण राज्यावर मान्सूनआधी लोडशेडिंगच्या काळ्या ढगांची गर्दी झालीय असं म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्रासाठी वरदान ठरलेल्या कोयना धरणातला पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्यानं त्यावर आधारित वीज प्रकल्प बंद करावं लागण्याची शक्यता आहे.

सातारा | कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का सातारा | कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

 साताऱ्यात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे, कोयना धरण परिसरात हा धक्का जाणवला आहे. 

प्रेमविवाह केल्याने मुलाच्या कुटुंबावर सशस्त्र हल्ला प्रेमविवाह केल्याने मुलाच्या कुटुंबावर सशस्त्र हल्ला

भावकीतल्या मुलीशी प्रेम विवाह केल्याच्या रागातून मुलीकडच्या लोकांनी मुलाच्या कुटुंबावर हल्ला केलाय. त्यात मुलाच्या वडिलांसह तिघे जण जखमी झालेत. 

पंकजा मुंडेच्या हाती पोलिसांची काठी पंकजा मुंडेच्या हाती पोलिसांची काठी

लातूरमध्ये जलसंधारणाची पाहणी करताना सेल्फी काढल्यामुळं वादात सापडलेल्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणखी एका नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे. 

साताऱ्यात मनसे जिल्हा उपाध्यक्षाला बेदम मारहाण साताऱ्यात मनसे जिल्हा उपाध्यक्षाला बेदम मारहाण

साताऱ्यात वाळू माफियांच्या मुजोरीचा कळस पाहायला मिळालाय. फलटणचे मनसे जिल्हा उपाध्यक्षाला अमानुष मारहाण करण्यात आलीय.

बापानं केला बलात्कार... अल्पवयीन मुलीला तालीबानी शिक्षा! बापानं केला बलात्कार... अल्पवयीन मुलीला तालीबानी शिक्षा!

महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय... जाती-पंचायतीचं भूत अजूनही लोकांच्या मानगुटीवरून उतरलेलं नाही, हे वारंवार समोर आलंय. आत्ताही पुन्हा तेच घडलंय.

सातारा शहरात अचानक जोरदार पाऊस सातारा शहरात अचानक जोरदार पाऊस

 अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. 

खासदार उदयनराजे भोसले संतापलेत, कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट... खासदार उदयनराजे भोसले संतापलेत, कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट...

खासदार उदयनराजे भोसलेंनीही आपल्या खास स्टाइलमध्ये या नव्या सेवेला विरोध केला आहे. 

शहीद जवान सूर्यवंशी यांचे पार्थिव साताऱ्यात शहीद जवान सूर्यवंशी यांचे पार्थिव साताऱ्यात

सियाचीन येथे हिमस्खलन होऊन वीरगती प्राप्त झालेले मस्करवाडी ता. माण येथील जवान सुनील सूर्यवंशी यांचे पार्थिव सोमवारी रात्री उशिरा साताऱ्यात आणण्यात आले. मंगळवारी मस्करवाडी येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

साताऱ्याचे जवान सुनील सूर्यवंशी यांना वीरमरण, पार्थिवाची प्रतिक्षा साताऱ्याचे जवान सुनील सूर्यवंशी यांना वीरमरण, पार्थिवाची प्रतिक्षा

सियाचीन येथे हिमसख्खलन होवून झालेल्या दुर्घटनेत साताऱ्याचे जवान सुनील सूर्यवंशी यांना वीरमरण आलंय. 

सियाचीनमध्ये साताऱ्याचा जवान शहीद सियाचीनमध्ये साताऱ्याचा जवान शहीद

सियाचीनमध्ये हिमकडा कोसळल्यामुळे झालेल्या दुर्घटनेमध्ये दहा भारतीय जवान शहीद झाले. यापैकी एक जवान हा साताऱ्याचा आहे. 

पंतप्रधानांना 'ऑर्डर' देणाऱ्या भिडे गुरुजींनी मुख्यमंत्र्यांचं विमानही थांबवलं! पंतप्रधानांना 'ऑर्डर' देणाऱ्या भिडे गुरुजींनी मुख्यमंत्र्यांचं विमानही थांबवलं!

पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'ऑर्डर' देणाऱ्या भिडे गुरुजींनी आता मुख्यमंत्र्यांचं विमानालाही काही काळ थांबवण्यासाठी भाग पाडलं.

सातऱ्यातील कुख्यात गुंड सल्या चेप्याचा मृत्यू  सातऱ्यातील कुख्यात गुंड सल्या चेप्याचा मृत्यू

पश्चिम महाराष्ट्रातील आणि कराडमधील रहिवासी असलेला कुप्रसिध्द गुंड सलीम शेख उर्फ सल्या चेप्या मृत्यू झाला 

खंडाळा येथे लक्झरी बस समोरासमोर धडकल्या, १ ठार १५ जखमी खंडाळा येथे लक्झरी बस समोरासमोर धडकल्या, १ ठार १५ जखमी

सातारा महामार्गावर खंडाळा येथील एसक़ॉर्नर येथे दोन लक्झरी बसचा समोरसमोर अपघात झाला आहे. 

मलाही संतोषसारखंच आर्मी ऑफिसर व्हायचंय - वीरपत्नी स्वाती महाडिक मलाही संतोषसारखंच आर्मी ऑफिसर व्हायचंय - वीरपत्नी स्वाती महाडिक

'कोणाला मारून दहशतवाद कमी होणार नाही तर तो कमी करण्यासाठी शिक्षणाची गरज आहे हे शहीद कर्नल संतोष महाडिक यांचे विचार होते... त्यांचे विचार आणि सामाजिक काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला लष्करी अधिकारी व्हायचं आहे' अशी इच्छा वीरपत्नी स्वाती महाडिक यांनी व्यक्त केलीय.

शहीद संतोष महाडिक अनंतात विलीन, मुलानं दिला मुखाग्नी शहीद संतोष महाडिक अनंतात विलीन, मुलानं दिला मुखाग्नी

जम्मू-काश्मीरमधल्या कुपवाड्यात दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या कर्नल संतोष महाडिक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोगरवाडी या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले. महाडीक यांच्या पुत्रानं मुखाग्नी दिला. 

सत्तेसाठी आम्ही भिकारी नाही : राजू शेट्टी सत्तेसाठी आम्ही भिकारी नाही : राजू शेट्टी

आम्ही सत्तेसाठी हपापलेलो नाही. सत्तेबाबत सतत चर्चा होत असली तरी आम्ही सत्तेचा विषय सोडून दिलाय. आम्ही सत्तेसाठी भिकारी नाही की कटोरा घेवून फिरणारी माणसे नाहीत. आम्ही  नावाप्रमाणे स्वाभिमानी आहोत, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केले.