sena

पुणे महापालिकेत शिवसेना-भाजपमध्ये राडा

पुणे महापालिकेत शिवसेना-भाजपमध्ये राडा

पुणे महापालिकेत सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये आज प्रचंड गदारोळ झाला.

Dec 14, 2017, 07:33 PM IST
सेना - भाजपच्या तोंडाला फेस आणणारी सत्तेची समिकरणं!

सेना - भाजपच्या तोंडाला फेस आणणारी सत्तेची समिकरणं!

मुंबई महानगरपालिकेत 84 जागा मिळवलेल्या शिवसेनेकडून सत्ता स्थापनेसाठी आता आकड्यांच्या जुळवाजुळवीला सुरुवात झाली आहे. स्नेहल मोरे, तुळशीराम शिंदे, चंगेज मुलतानी या अपक्ष म्हणून निवडून आलेल्या नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा द्यायचं जाहीर केलंय. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ आता 84 वरुन 87 वर गेलंय. 

Feb 24, 2017, 08:07 PM IST
भाजपचा जाहिरनामा म्हणजे खोदा पहाड निकला चुहां - शिवसेना

भाजपचा जाहिरनामा म्हणजे खोदा पहाड निकला चुहां - शिवसेना

भाजपनं मुंबई महापालिकेसाठी जाहिरनामा प्रकाशित केलाय. यंदा हा जाहीरनामा स्टॅम्प पेपरच्या रुपात जनतेसमोर आणला. मात्र, या जाहिरनाम्यावर शिवसेनेने जोरदार टीका करताना खिल्ली उडवली आहे.

Feb 7, 2017, 04:28 PM IST
शिवसेनेपुढे मोठे आव्हान, २१ अमराठी तर १५ आयात उमेदवारांना उमेदवारी

शिवसेनेपुढे मोठे आव्हान, २१ अमराठी तर १५ आयात उमेदवारांना उमेदवारी

पालिका निवडणुकीसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसे अशी थेट लढत होणार आहे. तसेच काही ठिकाणी एमआयएमनेही आव्हान निर्माण केले आहे. तर शिवसेना-भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. त्यामुळे या दोन्ही राजकीय पक्षांना आव्हान आहे.

Feb 4, 2017, 05:23 PM IST
मुलुंडमध्ये 'शिंदे' हमी पर, 'तारा' जमीं पर...

मुलुंडमध्ये 'शिंदे' हमी पर, 'तारा' जमीं पर...

 शिवसेनेच्या प्रभाकर शिंदे यांना भाजपात घेतल्यामुळं भाजप आमदार तारासिंह नाराज झाले आहे.  

Feb 2, 2017, 08:26 PM IST
पिंपरी चिंचवडमध्ये युतीची बोलणी फिस्कटल्यात जमा

पिंपरी चिंचवडमध्ये युतीची बोलणी फिस्कटल्यात जमा

पिंपरी चिंचवडमध्ये युतीची बोलणी जवळपास फिस्कटल्यात जमा आहेत. शिवसेना आणि भाजपने दिलेले प्रस्ताव दोन्ही पक्षांना मान्य नाहीत.. एकंदरीतच मुंबई मध्ये युती झाली तरच पिंपरी चिंचवड मध्येही युती होण्याची शक्यता आहे

Jan 23, 2017, 11:09 PM IST
विधान परिषद निवडणुकीतून प्रसाद लाड यांचा अर्ज मागे, तरीही चूरस कायम

विधान परिषद निवडणुकीतून प्रसाद लाड यांचा अर्ज मागे, तरीही चूरस कायम

ठाणे-पालघरच्या स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत चूरस कायम आहे. मनोज कोटक यांच्याबाबत अद्याप संदिग्धता असून प्रसाद लाड यांनी आपला अर्ज मागे घेतला तरी आता १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. कोटक यांनीही माघार घेतल्यास निवडणूक बिनविरोध होऊ शकते. पण कोटक यांचा अर्ज अपक्ष उमेदवार म्हणून कायम आहे.

Jun 3, 2016, 01:20 PM IST
गुलाम अलींना विरोध करायला गेलेली शिवसेना तोंडावर

गुलाम अलींना विरोध करायला गेलेली शिवसेना तोंडावर

मुंबईमधला पाकिस्तानी गायक गुलाम अली यांचा कार्यक्रम रद्द करायला लावणाऱ्या शिवसेनेनं तिरुअनंतपुरममध्ये झालेला कार्यक्रम उधळण्याचाही प्रयत्न केला. पण, इथं मात्र सेनेला तोंडावर पडायला लागलं. 

Jan 15, 2016, 11:47 PM IST
महापौर पदासाठी सेना - भाजप उमेदवार वेगवेगळे अर्ज भरणार

महापौर पदासाठी सेना - भाजप उमेदवार वेगवेगळे अर्ज भरणार

कल्याण डोंबिवली महापालिकेत सत्तेसाठी शिवसेना भाजपची युती होणार, अशी चर्चा सुरु असताना सेना, भाजप महापौरपदासाठी वेगवेगळे अर्ज भरणार असल्याचं समजतंय. 

Nov 7, 2015, 09:47 AM IST
शिवसेनेची तलवार म्यान, सेना नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली नाराजी

शिवसेनेची तलवार म्यान, सेना नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली नाराजी

शिवसेना-भाजपामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर शिवसेनेकडून एकप्रकारे पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, यावेळी भाजपाच्या काही नेत्यांच्या वागण्याबाबतची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली. 

Oct 15, 2015, 09:36 AM IST
मदर तेरेसा : मोहन भागवत यांच्या भूमिकेचं शिवसेनेकडून समर्थन

मदर तेरेसा : मोहन भागवत यांच्या भूमिकेचं शिवसेनेकडून समर्थन

मदर तेरेसांबाबतच्या मोहन भागवत यांच्या भूमिकेचं शिवसेनेकडून समर्थन, भागवतांचं काय चुकलं, सामनाच्या अग्रेलखातून उघड पाठिंबा.शिवसेनेनं सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भूमिकेचं समर्थन केलंय. मदर तेरेसांबाबत मोहन भागवत यांनी केलेल्या विधानानंतर शिवसेनेनं सामनामधून त्यांना पाठिंबा दिलाय.

Feb 25, 2015, 03:41 PM IST
गंगेत घोडं न्हालं; सेना-भाजपच्या २० नेत्यांनी घेतली शपथ

गंगेत घोडं न्हालं; सेना-भाजपच्या २० नेत्यांनी घेतली शपथ

भाजप-शिवसेना य़ुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आज झाला. भाजप आणि शिवसेनेच्या प्रत्येकी दहा मंत्र्यांनी विधान भवनाच्या प्रांगणात मंत्रीपदाची शपथ घेतली.

Dec 5, 2014, 08:43 AM IST
क्रेडीट वारमध्ये उद्धव ठाकरेंचं प्रसंगावधान

क्रेडीट वारमध्ये उद्धव ठाकरेंचं प्रसंगावधान

 महापालिकेत केलेल्या कामांवरून आणि त्याचं क्रेडीट घेण्यावरून काँग्रेस आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली होती. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रसंगावधान राखलं आणि वाद मिटवला.

Nov 30, 2014, 11:02 PM IST
युतीबाबत उद्धव ठाकरेंशी अमित शहांची फोनवर चर्चा

युतीबाबत उद्धव ठाकरेंशी अमित शहांची फोनवर चर्चा

शिवसेना-भाजप युती तुटत असतांनाच  भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली. शहा यांनी  उद्धव यांना युती टिकवण्याचं आवाहन केले आहे.

Sep 22, 2014, 11:29 AM IST

सिंधुदुर्गात तणावपूर्ण शांतता, राणे-केसरकरांनी काढले उणे-दुणे

कोकणात सिंधुदुर्ग रत्नागिरी या मतदारसंघात मतदान 17 तारखेला होणार आहे. या मतदारसंघात निलेश राणे विरूद्ध विनायक राऊत अशी लढत होणार आहे. मात्र, खरी लढत ही नारायण राणे विरुद्ध शिवसेना अशीच दिसून येत आहे. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांनी बंडाचे हत्यार उपसत राणेंनाच शह दिल्याने रंगत वाढली आहे.

Apr 16, 2014, 09:17 AM IST