नांदेडमध्ये जाळला शिवसैनिकांनी पाकिस्तानचा झेंडा

नांदेडमध्ये जाळला शिवसैनिकांनी पाकिस्तानचा झेंडा

 पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यात नांदेडचा वीर जवान शहीद झाल्यानंतर नांदेडमध्ये पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला... 

भाजप-शिवसेना जोमात, काँग्रेस-राष्ट्रवादी कोमात

भाजप-शिवसेना जोमात, काँग्रेस-राष्ट्रवादी कोमात

 नगरपालिका निवडणुकीत मतदारांनी सत्ताधारी भाजपा शिवसेनेला साथ देताना विरोधी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला झटका दिला आहे. मागील वेळेस क्रमांक एकवर असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष थेट चार क्रमांकावर फेकला गेला आहे, तर क्रमांक दोनवर असलेल्या काँग्रेसची घसरण क्रमांक तीनवर झाली आहे. या निकालानंतर काँग्रेसच्या नेत्यांमध्येच शाब्दिक युद्ध सुरू झालंय तर राष्ट्रवादी कांग्रेसला पश्चिम महाराष्ट्रातील गडातच हादरा बसल्याने पक्षात अस्वस्थता आहे.

नगरपरिषद निवडणुकीतील विजयाचं श्रेय  शिवसैनिकांना : उद्धव ठाकरे

नगरपरिषद निवडणुकीतील विजयाचं श्रेय शिवसैनिकांना : उद्धव ठाकरे

राज्यात नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेला चांगले यश मिळाले आहे. या विजयाचे श्रेय मी माझ्या शिवसैनिकांना देतो, असे सांगत मी निवडणूक प्रचारात उतरलेला नाही. सच्चा शिवसैनिकाची ताकद काय असते, हे दाखवून दिले आहे. तसेच शिवसेनेवर विश्वास दाखविणाऱ्या जनतेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धन्यवाद दिले.

डोंबिवलीत शिवसेना देतेय सुट्टे पैसे

डोंबिवलीत शिवसेना देतेय सुट्टे पैसे

५०० आणि १०००च्या नोट बंदीमुळे सुट्या पैशांची अडचण निर्माण झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी हे अत्यंत गैरसोयीचे आहे. नवीन ५०० अथवा २००० ची नोट दिली तरी सुट्टे पैसे नसल्याच्या कारणावरून नवीन नोट नाकारली जातेय. सर्व सामन्यांना जनतेचा मनस्ताप कमी करण्यासाठी शिवसेनेने सुट्टे पैशांची सोय करून दिली आहे.  

भाजपने शिवसेनेला पुन्हा डिवचले, मुंबईत लागले पोस्टर

भाजपने शिवसेनेला पुन्हा डिवचले, मुंबईत लागले पोस्टर

भाजपने शिवसेनेला पुन्हा डिवचले आहे. शिवसेना भवनासमोर भाजपचे होर्डिंग लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळ्यापैशा विरोधतील लढाईला बाळासाहेबांचे आशीर्वाद या पोस्टरच्या माध्यमातून दिसून येत आहे.

शिवसेनेच्या भेटीनंतर जिल्हा बँकांना निधी मिळाला - संजय राऊत

शिवसेनेच्या भेटीनंतर जिल्हा बँकांना निधी मिळाला - संजय राऊत

शिवसेनेच्या खासदारांनी मोदींची भेट घेतल्यावर जिल्हा बँकांना निधी मिळाल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय.. 

राज्यमंत्री गुलाबराव यांचा भाजपला असाही टोला

राज्यमंत्री गुलाबराव यांचा भाजपला असाही टोला

शिवसेनेमुळेच राज्यात भाजप सत्तेत आहे, असा टोला लगावत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपकडून घेतल्या जाणाऱ्या कामांच्या श्रेयावर निशाणा साधला. 

मोदींना बाळासाहेबांची आठवण आणि शिवसेनेची तलवार म्यान

मोदींना बाळासाहेबांची आठवण आणि शिवसेनेची तलवार म्यान

नोटाबंदीच्या निर्णयावरून मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडणाऱ्या शिवसेनेनं आपल्या तलवारी अखेर म्यान केल्यात. शिवसेना खासदारांनी 

मोंदीनी शिवसेनेला करुन दिली बाळासाहेबांची आठवण

मोंदीनी शिवसेनेला करुन दिली बाळासाहेबांची आठवण

 नोटाबंदीच्या निर्णयावरून मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडणाऱ्या शिवसेनेने तलावर मान्य केली. दरम्यान, शिवसेनेला मोदींनी विचारलं, वर जाऊन बाळासाहेबांनी विचारलं, काय काम केलंत तर तुम्ही काय उत्तर द्याल?

विधान परिषदेत निवडणूक : काँग्रेसची बाजी तर राष्ट्रवादीची पिछेहाट, शिवसेना-भाजपची मुसंडी

विधान परिषदेत निवडणूक : काँग्रेसची बाजी तर राष्ट्रवादीची पिछेहाट, शिवसेना-भाजपची मुसंडी

विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. गेल्यावेळी चार जागा मिळवणाऱ्या राष्ट्रवादीनं 3जागा गमावल्या. मात्र, काँग्रेसने मुसंडी मारत दोन जागा आघाडी न करता पदरात पाडून घेतल्या आणि राष्ट्रवादीला दे धक्का दिला.

विधान परिषद निवडणूक निकाल : सांगलीत राष्ट्रवादीला धक्का

विधान परिषद निवडणूक निकाल : सांगलीत राष्ट्रवादीला धक्का

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी आज मतमोजणी झाली. पुण्यात अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीने विजय संपादन केला तरी सांगलीत जास्त मते असूनही राष्ट्रवादीला पराभवाचा धक्का बसला. 

सहकारी बॅंकांवर निर्बंध : शिवसेना शिष्टमंडळ पंतप्रधान मोदींना भेटणार

सहकारी बॅंकांवर निर्बंध : शिवसेना शिष्टमंडळ पंतप्रधान मोदींना भेटणार

सहकारी बँक आणि पतसंस्थावरील निर्बंध उठवण्यासंदर्भात शिवसेनेचं शिष्टमंडळ पंतप्रधान मोदींना भेटणार आहे. पंतप्रधान मोदींनी दुपारी बारा वाजता संसदेतील कार्यालयात शिवसेनेच्या खासदारांना वेळ दिली आहे.

आयुक्त तुकाराम मुंढेंचा नवी मुंबईत पुन्हा दणका, स्थायी समिती अध्यक्षांचे नगरसेवक पद रद्द

आयुक्त तुकाराम मुंढेंचा नवी मुंबईत पुन्हा दणका, स्थायी समिती अध्यक्षांचे नगरसेवक पद रद्द

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दोन नगरसेवकांची पदे रद्द केलीत. त्यामुळे मुंढे यांच्याविरोधात रान पेटवणाऱ्यांना पुन्हा दणका बसला आहे.

जिल्हा बॅंकेना नोटाबंदी, उद्धव ठाकरे यांची अरुण जेटलींवर टीका

जिल्हा बॅंकेना नोटाबंदी, उद्धव ठाकरे यांची अरुण जेटलींवर टीका

जिल्हा मध्यवर्ती बँकांवर लादण्यात आलेले निर्बंध कायम असतील, अशी भूमिका केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली.

नोटा बदलीसाठी रांगेत असल्यांना शिवसेनेकडून झंडू बामचे वाटप

नोटा बदलीसाठी रांगेत असल्यांना शिवसेनेकडून झंडू बामचे वाटप

नोटबंदीनंतर जुन्या पाचशे, हजारच्या नोटा बदलून घेण्यासाठी, सर्वच बँकांसमोर लांबलचक रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापूर शिवसेनेनं बँकापुढे रांगेत उभ्या असलेल्या खातेदारांना, चक्क झंडू बामचं वाटप केलं. 

नोटाबंदीविरुद्ध दीदींचा मोर्चा... सेनेचे खासदारही सामील

नोटाबंदीविरुद्ध दीदींचा मोर्चा... सेनेचे खासदारही सामील

ममता बॅनर्जींच्या नेतृत्वात आज राष्ट्रपती भवनावर नोटाबंदीच्या विरोधात मोर्चा काढण्यात आलाय. 

उद्यापर्यंत थांबा, मग बघा; शिवसेनेचा इशारा

उद्यापर्यंत थांबा, मग बघा; शिवसेनेचा इशारा

देशात आर्थिक अराजकता निर्माण झाली आहे. उद्यापर्यंत थांबा निर्णय कळेल, पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करणे हा राजकीय विषय नसून, सव्वाशे कोटी जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

विधानपरिषद निवडणूक : राष्ट्रवादीचा सेना-भाजप युतीच्या उमेदवाराला पाठिंबा

विधानपरिषद निवडणूक : राष्ट्रवादीचा सेना-भाजप युतीच्या उमेदवाराला पाठिंबा

स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत आज नाट्यमय घडामोडी होऊन राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. 

महाबळेश्वर नगरपालिकेसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत अटीतटीची लढत

महाबळेश्वर नगरपालिकेसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत अटीतटीची लढत

महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर नगरपालिकेसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत अटीतटीची लढत होणार आहे. महाबळेश्वर, महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जातं. सातारा जिल्ह्यातली महाबळेश्वर ही नगरपालिका सर्वात जुनी गिरिस्थान नगरपालिका असून इंग्रज काळापासून तिला महत्त्व आहे. 

जिंतूरमध्ये जोरदार चूरस, राष्ट्रवादीत बंडखोरीने तिरंगी लढत

जिंतूरमध्ये जोरदार चूरस, राष्ट्रवादीत बंडखोरीने तिरंगी लढत

नगरपालिका निवडणुकांचे पडघम जोरात वाजले असून परभणी जिल्ह्यातील सात नगरपालिकांच्या निवडणुका लागल्यात. परभणी जिल्ह्यातली महत्वाची नगरपालिका म्हणून जिंतूर नगरपालिकेकडे बघितले जाते. इथे आजी माजी आमदारांचा कट्टर संघर्ष बघायला मिळतो. मात्र यावेळेस राष्ट्रवादीतून बंडखोरीकरून दोघात तिसरा आल्याने तिरंगी लढत बघायला मिळणार आहे.

राज्यात युती मात्र रत्नागिरीत शिवसेना-भाजप आमनेसामने

राज्यात युती मात्र रत्नागिरीत शिवसेना-भाजप आमनेसामने

राज्यात शिवसेनेची युती झालीय खरी पण रत्नागिरी नगरपरिषदेसाठी शिवसेना-भाजप आमनेसामने आहेत. शिवसेनेकडून उदय सामंतांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवसेना-भाजपसह राष्ट्रवादीनंही आपल्यालाच जनतेचा कौल मिळेल असा दावा केला असला तरी खरं चित्र 28 नोव्हेंबरलाच स्पष्ट होईल.