सहीसाठी आरोग्य सेविकेला मारहाण ?

सहीसाठी आरोग्य सेविकेला मारहाण ?

कानळदा गावच्या सरपंच आणि त्यांच्या कुटुंबियांनी मारहाण केल्याचा आरोप आरोग्य सेविकेनं केला आहे. 

पुणे स्मार्ट सिटीत राहण्यासाठी स्वाक्षरी अभियान

पुणे स्मार्ट सिटीत राहण्यासाठी स्वाक्षरी अभियान

पुणे शहर हे स्मार्ट सिटीत राहण्यासाठी पुणेकरांनी स्वाक्षरी अभियान सुरू केले आहे. शनिवार वाड्यात हे स्वाक्षरी अभियान राबवण्यात आलं, ज्येष्ठ कलाकार विक्रम गोखले देखील या वेळी उपस्थित होते.

संयुक्त राष्ट्रात बदल आवश्यक : नरेंद्र मोदी

संयुक्त राष्ट्रात बदल आवश्यक : नरेंद्र मोदी

विकास हवा असेल तर जगातील गरीबी संपवली पाहिजे. तसेच विश्वसनियता टिकवण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघात बदल करणे गरजेचे आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. मोदी यांनी यूएनमध्ये भाषण करताना हे मत व्यक्त केले.

महात्मा गांधींच्या पत्रांचा लिलाव

राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या दोन दुर्मिळ पत्रांचा लिलाव करण्यात आला.

सही रे सही !

तुम्ही आर्थिक व्यवहार चेकने करत असाल तर हे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. कारण चेकवर सही करण्यास तुम्ही विसरलात, किंवा सही करतांना चूक झाल्यास तुमच्यावर तुरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते. वाचून धक्का बसला ना. मग घ्या खबरदारी.

चेकवरील सही चुकली तर....नक्की तुरुंगवास

तुमची चेकवरची सही ही बँकेतल्या सहीशी तंतोतंत जुळायलाच हवी. कारण सहीतल्या फरकामुळे चेक बाऊन्स झाला तर खातेदारावर फौजदारी कारवाई खुशाल करा, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने आता दिला आहे. त्यामुळे तुमचे काही खरे नाही.