रत्नागिरीत अट्टल घरफोड्या गजाआड

रत्नागिरीत अट्टल घरफोड्या गजाआड

 नवी मुंबई, रत्नागिरी आणि सांगली पोलिसांच्या नाकीनऊ आणणारा परशुराम शेडगे. त्याच्या चो-यांच्या कारनाम्यामुळे पोलीस चांगलेच चक्रावून गेलेत. रत्नागिरी, गुहागर, चिपळूणमध्ये घरफोड्यांचं प्रमाण वाढलं होतं. चोरांना जेरबंद करण्यासाठी रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून कसून शोध सुरू होता. या तपासात परशुराम शेडगेवरही पोलिसांचं लक्ष होतं.

लग्नातून वधूचे दागिने चोरणारा अखेर गजाआड

लग्नातून वधूचे दागिने चोरणारा अखेर गजाआड

नाशकात लग्नातून वधूचे दागिने चोरणारा 'बंटी' गजाआड करण्यात आला आहे. लग्न सोहळा सुरु असताना मंगल कार्यालयातून वधूचे या चोराने लांबवले होते.

रेल्वेच्या 'दबंग लेडी'नं चोरांना शिकवला चांगलाच धडा!

रेल्वेच्या 'दबंग लेडी'नं चोरांना शिकवला चांगलाच धडा!

चोरी करण्यासाठी आलेल्या लुटारूंना एका महिला क्लार्कने तिच्या दबंग स्टाईलने पिटाळून लावलं.

OLXने आला चोर घरी

OLXने आला चोर घरी

तुम्हाला जर स्वतःची गाडी विकायची असेल आणि त्यासाठी तुम्ही OLX वर जाहिरात करणार असाल तर जरा सावधान. कारण अशा जाहिरातीच्या माध्यमातून एखादा चोर तुमच्याशी संपर्क साधू शकतो आणि नंतर टेस्ट राईडचा बनाव करून तुमची गाडी घेऊन पसार होऊ शकतो. 

पाहा, CCTVला घाबरला पाकीटमार, पाकीट केले परत

पाहा, CCTVला घाबरला पाकीटमार, पाकीट केले परत

 सोशल मीडियावर अनेक हास्याने लोटपोट होणारे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातील एक म्हणजे एका पाकीटमाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

बोर्डातला टॉपर बनला अट्टल चोर

बोर्डातला टॉपर बनला अट्टल चोर

इयत्ता दहावीमध्ये तब्बल ९४. ६० टक्के गुण मिळवलेला एक अत्यंत हूशार मुलगा घरफोड्या आणि मोटारसायकली चोरत असल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरात उघडकीस आलाय. 

video - लॉक असलेल्या गाड्य़ा अशा प्रकारे जातात चोरीला

video - लॉक असलेल्या गाड्य़ा अशा प्रकारे जातात चोरीला

चारचाकी गाड्या ही मोठ्या प्रमाणात चोरीला जाण्याचं प्रमाण वाढलं आहे.

मुंबई लोकलमध्ये महिलेवर हल्ला करणारा अट्टल चोरटा

मुंबई लोकलमध्ये महिलेवर हल्ला करणारा अट्टल चोरटा

डोंबिवली येथून आज सकाळी सुटणारी ६ वाजून १७ मिनिटांच्या फास्ट लोकलमध्ये महिला फर्स्ट क्लासमध्ये चढणाऱ्या एका तरुणाला एका महिलेने धाडस करुन पकडले. तो गर्दुला तरुण सोनसाखळी चोर होता अणि मुंब्यातील एका मोठ्या सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीचा तो सदस्य असल्याचे तपासात पुढे आलंय. 

केजरीवालांच्या शपथ समारंभानंतर एक शिक्षक बनला चोर!

केजरीवालांच्या शपथ समारंभानंतर एक शिक्षक बनला चोर!

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या शपथग्रहण समारंभात सहभागी झाल्यानंतर एक शिक्षक चोर बनला आहे. ऐकून जरा धक्का बसला असेल, मात्र याचं कारणही काहीसं तसंच आहे. 

नालासोपाऱ्यात ज्वेलर्स दुकानात चोराचा चाकू धाक दाखवून नंगानाच

नालासोपाऱ्यात ज्वेलर्स दुकानात चोराचा चाकू धाक दाखवून नंगानाच

नालासोपारात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असताना, शहराच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या एका ज्वेलर्सच्या दुकानात चोरांनी कशाप्रकारे चाकूच्या साहय्यानं नंगानाच सुरू केला होता. हे ज्वेलर्सच्या सीसीटीव्हीत कैद झालंय. भयानक दृश्य असलं तरी कायद्याचा कशाप्रकारे बोजवारा उडाला याचं सत्य समोर येतंय.

धक्कादायक...चोर झाला न्यायाधीश, २७०० जणांना दिला जामीन

धक्कादायक...चोर झाला न्यायाधीश, २७०० जणांना दिला जामीन

दिल्लीत एक नवा फसवणुकीचा गुन्हा समोर आलाय. धनीराम मित्तल या आरोपीनं दस्ताऐवजावर खोटी सही करून न्यायाधीशपदी विराजमान झाला होता. न्यायाधीश बनून या आरोपीनं २७०० लोकांना जामीन दिला होता. मात्र या आरोपीला चोरी करताना अटक करण्यात आली आणि त्याचे हे खोटे सत्य पोलिसांसमोर उघड झाले.

मीरारोडमध्ये चोरांनी मारला टोमॅटोंवर डल्ला!

मीरारोडमध्ये चोरांनी मारला टोमॅटोंवर डल्ला!

 कुणी पैसे चोरतं.. कुणी दागिने चोरतं.. मात्र मुंबईत चोरांनी चक्क टोमॅटोंवर डल्ला मारलाय.. सध्या टोमॅटोचे भाव वधारल्यानं मीरारोडच्या काशिमीरा भाजीमार्केटमध्ये एका भाजी विक्रेत्याचे 40 हजार रुपयांचे टोमॅटो चोरांनी पळवले..

'त्यांची' चोरी सीसीटीव्हीत कैद, घातला 10 लाखांचा गंडा

'त्यांची' चोरी सीसीटीव्हीत कैद, घातला 10 लाखांचा गंडा

मुंबईच्या भोईवाडा परिसरातील एका ज्वेलरी शॉपमधील कर्मचाऱ्यांना चार भामट्यांनी तब्बल १० लाखांचा गंडा घातलाय. हे चार चोर या ज्वेलरी शॉपमध्ये सोन्याचं पेंडंट घेण्याकरता आले होते. यावेळी त्यांनी हातचलखीनं शॉपमधील सोनं लंपास केलं. मात्र चोरांचा हा प्रताप सीसीटीव्हीत कैद झाला आणि त्या आधारे पोलिसांनी दोन चोरांना अटक केली.

‘सीसीटीव्ही’नं फोडलं सोनसाखळी चोरांचं भांडं!

‘सीसीटीव्ही’नं फोडलं सोनसाखळी चोरांचं भांडं!

नालासोपाऱ्यात दिवसा-रात्री बाईकवर भरधाव वेगानं येऊन महिलांच्या गळ्यातून सोनसाखळी हिसकावणाऱ्या दोन चोरांना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. 

गर्लफ्रेंडला फोन करणे चोराला पडलं भारी

उत्तर प्रदेशमधील गाजियाबाद येथे वाहन चोरी करणाऱ्या गँगला पकडण्यात पोलिसांना यश आलंय.

चोराला मिळाली अश्लिल टेप, लैंगिक शोषण करणारा गजाआड

तुम्हांला वाटत असेल की जगातील सर्व गुन्हेगार एकसारखेच वागतात, तर ही बातमी वाचा तुमचे मत बदलेल. दक्षिण स्पेनच्या जेन शहरात एका चोराने लहान मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या एका व्यक्तीला पडून दिले आहे. पण चोर स्वतः समोर आला नाही.

बँकेत घुसून ग्राहकांच्या पैशावर डल्ला; तीन बहिणींना अटक

बॅँकेत पैसे भरण्यासाठी रांगेत उभे असलेल्या ग्राहकांच्या पैशांची चोरी करणा-या तीन बहिणींना मीरारोड पोलिसांनी अटक केलीय.गौरी श्रीकांत, मोना गुडा आणि जोगेश्वरी गुडा अशी या बहिणींची नावं आहेत. मीरा रोडच्या बॅँक ऑफ इंडियाच्या सीसीटीव्हीत त्यांच्या या चोरीचा प्रताप कैद झाला होता.

चोराच्या फिशिंग हूकमुळे गेला महिलेचा बळी

फिशिंग हूकद्वारे चोरण्याचा प्रयत्न केला जात असतानाच बॅग खेचली गेल्यामुळे घोलपकर यांचा तोल गेला आणि खांबावर आपटून त्यांचा मृत्यू झाला.

कुरियरवाले बनून आले, लाखो रुपये लुटून नेले!

कुरियर कंपनीचे कर्मचारी असल्याची बतावणी करत घरात घुसलेल्या ३ भामट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लुटल्याचा खळबळजनक प्रकार नागपुरात घडला आहे.

गर्लफ्रेंडसाठी अल्पवयीन विद्यार्थी बनला चोर

आपल्या गर्लफ्रेंडवर पैसे उडवण्यासाठी शहरात चोऱ्या करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केलं. यातील एक तरुण अल्पवयीन विद्यार्थी आहे. रस्त्याने जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन, पर्स इत्यादी वस्तू चोरून ही मुलं गर्लफ्रेंड्सना गिफ्ट्स देत असत.

चोरट्यांची सोन्याची विल्हेवाटीचा भन्नाट मार्ग

सोन्यावर डल्ला मारणा-या चोरट्यांनी आता चोरीच्या सोन्याची विल्हेवाट लावण्याची भन्नाट आयडिया शोधून काढलीय. एरवी सोनाराकडे सोनं विकताना पोलिसांची भीतीही असायची आणि सोनार पैसैही देत नसे.