'ट्राफिक जाम'मुळे शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर

'ट्राफिक जाम'मुळे शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर

राष्ट्रीय राजधानी दिल्लीनजिकच्या गुरुग्राममध्ये मुसळधार पावसानं कित्येक किलोमीटर लांब ट्राफीक जाम झालंय. उल्लेखनीय म्हणजे, या ट्राफिक जाममुळे शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आलीय.

संरक्षक भिंत कोसळली, मध्य रेल्वेची जलद मार्गावरील वाहतूक ठप्प संरक्षक भिंत कोसळली, मध्य रेल्वेची जलद मार्गावरील वाहतूक ठप्प

संरक्षक भिंत पडल्याने ठाणे रेल्वे स्थानकावर जलद मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे ३ आणि ४ फ्लॅटफॉर्मवरील दोन्ही दिशेकडील वाहतूक बंदच आहे. त्यामुळे आधीच उशिरा धावणाऱ्या गाड्यांमुळे प्रवाशांचे अधिक हाल झालेत.

एक्स्प्रेस हायवेवर एकाच दिवशी दोन अपघात एक्स्प्रेस हायवेवर एकाच दिवशी दोन अपघात

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर आज अपघातवार ठरला आहे. दुपारी झालेल्या कारच्या टक्करीनंतर आता खंडाळा एक्झीटजवळ एक कंटेनर उलटला आहे.

कोंडलेल्या मुंबईकरांनी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर केला ट्राफिक जॅम! कोंडलेल्या मुंबईकरांनी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर केला ट्राफिक जॅम!

सध्या गुरुवार - शुक्रवार - शनिवार - रविवार अशा सलग चार दिवस सुट्ट्या आल्यानं साहजिकच मोकळा श्वास घेण्यासाठी मुंबईकर मुंबईच्या बाहेर पडण्यासाठी व्याकूळ झालेले दिसतायत. शिवाय, चार-एक दिवस कुठेतरी फिरून आल्याचं समाधान वेगळंच... 

पाहा 'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'चा 'ट्रॅफिक जाम'चा फोटो पाहा 'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'चा 'ट्रॅफिक जाम'चा फोटो

काही तासापूर्वी आकाशातून काढलेला फोटो.

झाड कोसळल्यानं टिटवाळा- कसारापर्यंत मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाड कोसळल्यानं टिटवाळा- कसारापर्यंत मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प

आसनगावला रेल्वे ट्रॅकवर झाड कोसळल्यानं टिटवाळा ते कसारापर्यंत मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. 

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा पुलावर आज पहाटे ४ वाजता एक रसायनाने भरलेला टँकर पलटी झाला. या अपघातात एक जण ठार झाला आहे.

video : मुंबईकरांचे स्पिरीट दाखवणारा हा व्हिडीओ होतोय व्हायरल video : मुंबईकरांचे स्पिरीट दाखवणारा हा व्हिडीओ होतोय व्हायरल

कोणतेही संकट कोसळले, काहीही परिस्थिती असो मुंबई कधीच थांबत नाही. काहीही घडले तरी दुसऱ्या दिवशी मुंबई पुन्हा त्याच स्पिरीटने धावू लागते.

मुंबई - गोवा महामार्गावर गॅस गळती, वाहतूक ठप्प मुंबई - गोवा महामार्गावर गॅस गळती, वाहतूक ठप्प

मुंबई - गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वायू गळती झाल्याने वाहतुकीची कोंडी झालेय. गॅस टॅंकर पलटी झाल्याने वायू गळती झालेय.

पुणे-सोलापूर महामार्गावर होंडा सिटीनं दुचाकीस्वाराला चिरडलं पुणे-सोलापूर महामार्गावर होंडा सिटीनं दुचाकीस्वाराला चिरडलं

पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूर इथं होंडा सिटी कारनं दुचाकीस्वाराला चिरडलं. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय. अपघातानंतर होंडा सिटी चालकानं पोबारा केला. 

'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे' वरची वाहतूक अजूनही खोळंबलेलीच 'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे' वरची वाहतूक अजूनही खोळंबलेलीच

'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे' वरची वाहतूक आजूनही खोळंबलेलीच आहे. खंडाळा बोगद्यासमोर कोसळलेल्या दरडीमुळे मुंबईकडे येणारी वाहतूक सुरू नसल्यानं पर्यायी मार्गावरून वाहतूक वळवण्यात आलीय. 

'एक्स्प्रेस-वे'वरील वाहतूक कोंडीने प्रवासी हैराण 'एक्स्प्रेस-वे'वरील वाहतूक कोंडीने प्रवासी हैराण

'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'वर आजही ट्रॅफिक जामचा प्रवाशांना सामना करावा लागला यामुळे वाहन चालकांना तासंतास ताटकळत रहावं लागलं. मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीला याचा फटका बसला आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक जाम मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक जाम

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक जाम झाली आहे. मुंबई-पुणे 'एक्स्प्रेस-वे'चे दुरूस्तीचे काम सुरू असल्याने वाहतूक जुन्या मार्गावर वळवण्यात आली आहे.

मालाडमध्ये गोडाऊनला आग, वाहतुकीचा खोळंबा मालाडमध्ये गोडाऊनला आग, वाहतुकीचा खोळंबा

काल रात्री साडे अकराच्या सुमारास मालाड परिसरातल्या एका बुटाच्या शोरुमखाली असणाऱ्या गोडाऊनला आग लागली. ही आग आटोक्यात आली असली तरी अद्याप या शोरूममधून धुराचे लोळ उठत आहेत. दरम्यान, आगीमुळे वाहतूक कोंडी झाली.

खंडाळा बोगद्याजवळ एक्स्प्रेस वेवर दरड कोसळली, वाहतूक ठप्प खंडाळा बोगद्याजवळ एक्स्प्रेस वेवर दरड कोसळली, वाहतूक ठप्प

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झालीय. खंडाळा बोगद्याजवळ दरड कोसळल्यानं वाहतुकीवर परिणाम झालाय. त्यामुळं वाहतूक जुन्या मार्गावर वळवण्यात आली आहे.

पुणे-सातारा महामार्गावर वाहतूक खोळंबली पुणे-सातारा महामार्गावर वाहतूक खोळंबली

पुणे-सातारा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे. खंबाटकी घाटात पुण्याहून साताऱ्याकडे जाणारा टँकर उलटल्याने ही वाहतूक खोळंबली आहे. 

सायन : अडकलेला कंटेनर काढण्यात यश, वाहतूक पूर्ववत सायन : अडकलेला कंटेनर काढण्यात यश, वाहतूक पूर्ववत

सायन किंग्जसर्कलच्या उड्डाणपुलाखाली अडकलेल्या ट्रेलर काढण्यात यश आलं आहे, यामुळे लवकरच वाहतूक पुन्हा पूर्ववत होणार आहे. सायन किंग्जसर्कलच्या उड्डाणपुलाखाली आज सकाळी ट्रेलर अडकून पडला, यामुळे वाहतुकीचा चांगलाच बोजवारा उडाला. यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या. 

ही टॅक्सी कुणीच का हटवत नाही? ही टॅक्सी कुणीच का हटवत नाही?

एक अशी जागा आहे, जेथे फक्त एक टॅक्सी थांबू शकते, पण या ठिकाणी टॅक्सी थांबली तर ही टॅक्सी वाहतुकीसाठी मोठा अडथळा ठरते. पाहा कसा होता एक टॅक्सीचा थांबा आणि वाहतुकीचा खोळंबा.

खंडाळा घाटात अपघात, ट्रॅफिक जॅम! खंडाळा घाटात अपघात, ट्रॅफिक जॅम!

खंडाळा घाटात झालेल्या एका विचित्र अपघातामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर मोठा ट्रॅफिक जॅम झालाय. 

वाहतुकीचा खेळखंडोबा

 

 

 ====================================================================================

ट्रॅफिकचा ताण, तरुणाला मारहाण !

ट्राफिक जाम का झालाय या बाबत विचारपूस करणाऱ्या मोटर सायकल चालकाला दोन ट्राफिक पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडलीय. या घटनेबाबत विचारणा केल्यावर दोन्ही पोलिसांनी मात्र पळ काढला.