या ५ स्टेप्सने मोबाईलमधील हाईड गोष्टी पाहू शकाल!

मोबाईल ही सगळ्यांची जिव्हाळ्याची वस्तू आणि त्याचबरोबर त्यातील गुप्तताही तितकीच महत्त्वाची

Updated: Apr 14, 2018, 07:16 PM IST
या ५ स्टेप्सने मोबाईलमधील हाईड गोष्टी पाहू शकाल!

मुंबई : मोबाईल ही सगळ्यांची जिव्हाळ्याची वस्तू आणि त्याचबरोबर त्यातील गुप्तताही तितकीच महत्त्वाची. त्यामुळे तुमचे काही महत्त्वाचे अॅप्स, फोल्डर्स, फोटोज आणि व्हिडिओज तुम्ही हाईड करु शकता. पण हे हाईड केलेले अॅप्स ओपन करुन बघण्याचाही मार्ग आहे. जाणून घेऊया हे काम कसे करायचे ते...

स्टेप १

फोनच्या सेटिंग्समध्ये जा.

स्टेप २

तिथे अनेक ऑप्शन्स दिसतील. त्यापैकी Apps या ऑप्शनवर क्लिक करा.

स्टेप ३

Apps वर टॅप केल्यावर एक पेज ओपन होईल. तिथे तुम्हाला फोनमधील सर्व अॅप्स दिसतील. या अॅप्समध्ये तुम्हाला अपेक्षित अॅप किंवा फोल्डर शोधा. फोनमध्ये AppLock Pro अॅप आहे. या अॅपवर क्लिक करा.

स्टेप ४

इथे तुम्हाला Force Stop चा ऑप्शन आहे. त्यावर क्लिक करा.

स्टेप ५

तुमचा स्मार्टफोन पुन्हा एकदा विचारले की, अॅप Force Stop करायचा आहे की नाही. तेव्हा OK वर क्लिक करा.

त्यानंतर अॅप काम करणे बंद होईल आणि फोनमधील सर्व हाईड अॅप्स दिसू लागतील. त्यानंतर हाईड केलेले सर्व फोटोज, व्हिडिओज आणि फोल्डर्स तुम्ही पाहू शकाल.