Reliance Jio च्या ९० टक्के ग्राहकांनी घेतली प्राइम मेंबरशीप, रिपोर्टचा दावा

 रिलायन्स जिओच्या नावावर आणखी एक विक्रम जोडला गेला आहे. बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचने दिलेल्या रिपोटनुसार हा विक्रम जिओच्या नावावर जोडला गेला आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 20, 2017, 03:42 PM IST
Reliance Jio च्या ९० टक्के ग्राहकांनी घेतली प्राइम मेंबरशीप, रिपोर्टचा दावा  title=

मुंबई :  रिलायन्स जिओच्या नावावर आणखी एक विक्रम जोडला गेला आहे. बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचने दिलेल्या रिपोटनुसार हा विक्रम जिओच्या नावावर जोडला गेला आहे. 

एका अध्ययनानुसार जिओचे सुमारे ७६ टक्के ग्राहक त्यांची प्रचारात्मक योजना संपल्यानंतरही सेवा कायम ठेऊ इच्छित आहेत. 

या रिपोर्टनुसार केवळ ७६ टक्के जिओ युजर्स त्यांची सेवा पुढे सुरू ठेऊ इच्छित आहे तर सुमारे ९० टक्के जिओ युजर्सने फ्री प्रमोशनल ऑफर संपल्यानंतर प्राइम मेंबरशीप घेतली. तसेच ८० टक्के ग्राहकांकडे केवळ एक जिओ सिमकार्ड आहे. तर ८४ टक्के ग्राहकांनी मंथली टॉपअप केले आहे. युजर्सने सर्वाधिक ३०३आणि ३०९ रुपयांचे पॅक रिचार्ज केले आहे. 

एकूण ग्राहकांच्या केवळ ५ टक्के रिलायन्ससाठी फोन बनविणारी कंपनी आहे. तर ४० टक्के युजर्स हे सॅमसंगचे ग्राहक आहेत. तर ७ टक्के ग्राहक हे आयफोन युजर्स आहेत. हा रिपोर्ट जूनच्या मध्यात करण्यात आलेल्या सर्वेवर आधारीत आहे. यात सुमारे १००० जणांना सामील करण्यात आले.