जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलचा नवा प्लॅन...

रिलायन्स जिओ च्या ४जी डेटा प्लॅनला टक्कर देण्यासाठी इतर टेलिकॉम कंपन्यांनी अनेक नवनवीन आणि आकर्षक ऑफर्स बाजारात आणल्या.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 6, 2017, 07:51 PM IST
जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलचा नवा प्लॅन...  title=

नवी दिल्ली : रिलायन्स जिओ च्या ४जी डेटा प्लॅनला टक्कर देण्यासाठी इतर टेलिकॉम कंपन्यांनी अनेक नवनवीन आणि आकर्षक ऑफर्स बाजारात आणल्या. वोडाफोन, एअरटेल आणि आयडीया यांच्यातर्फे गेल्या काही दिवसात अनेक ऑफर्स आल्या. त्यानंतर भारती एअरटेलने नवीन प्लॅन लाँच केला. यामध्ये ग्राहकांना दरदोज ४ जीबी डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये एअरटेलच्या आतापर्यंतच्या प्लॅनपेक्षा सर्वाधिक इंटरनेट डेटा मिळत आहे. 

या प्लॅनमध्ये जिओच्या कोणत्याही प्लॅनपेक्षा सर्वाधिक इंटरनेट डेटा दररोज मिळेल. एक्सपर्टनुसार ही ऑफर जिओच्या कोणत्याही ऑफर्स पेक्षा अधिक चांगली ठरेल. एअरटेलच्या नवा प्लॅनमध्ये ९९९ रुपयांमध्ये दररोज 4 GB 4G डेटा मिळेल. याशिवाय एअरटेलने अनेक प्लॅन सादर केले आहेत. यात ग्राहकांना अनेक वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जात आहेत. 

एअरटेलच्या ९९९ रुपयांच्या पॅकेजमध्ये दररोज 4GB 4G डाटा मिळेल. याची व्हॅलिडिटी २८ दिवसांची असेल. त्याचबरोबर युजर्सना अनलिमिटेड लोकल आणि STD कॉल देखील दिले जातील. या प्लॅनचा फायदा 4G आणि 3G या दोन्ही युजर्सना होईल. 

जिओचा ९९९ चा प्लॅन :
जिओच्या ९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 90GB 4G डेटा मिळतो. याची व्हॅलिडिटी ९० दिवसांची आहे. या डेटा युजर्स एका दिवसात देखील वापरू शकता. डेटा संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड 128kbps होईल. जिओच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड लोकल आणि STD कॉल करू शकता.