एअरटेलचा १९८ चा प्लान अनलिमिटेड कॉल आणि २८ जीबी डेटा...

देशातील सर्वात मोठी टेलीकॉम ऑपरेटींग कंपनी एअरटेल जिओला टफ देण्यासाठी दररोज नवनवीन प्लान बाजारात आणत आहेत. आता त्यात भर म्हणून कंपनीने १९८ रुपयांचा  नवा प्लान बाजारात आणला आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Nov 24, 2017, 08:04 PM IST
एअरटेलचा १९८ चा प्लान अनलिमिटेड कॉल आणि २८ जीबी डेटा...  title=

मुंबई : देशातील सर्वात मोठी टेलीकॉम ऑपरेटींग कंपनी एअरटेल जिओला टफ देण्यासाठी दररोज नवनवीन प्लान बाजारात आणत आहेत. आता त्यात भर म्हणून कंपनीने १९८ रुपयांचा  नवा प्लान बाजारात आणला आहे. 

या नव्या प्लानमध्ये युजर्सला दररोज १ जीबी डाटा ३ जी आणि ४ जी स्पीडमध्ये मिळणार आहे. १९८ रुपयांचा हा प्लान २८ दिवसांसाठी आहे. सध्या हा प्लान आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या सर्कलसाठी उपलब्ध आहे. 

telecomtalk च्या रिपोर्टनुसार या टेरिफ प्लानची अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाही. पण माय एअरटेल अॅप्लिकेशनमध्ये ‘best offer for you’ अंतर्गत हा प्लान मिळवू शकतात. पण काही ठरविक कस्टमरला हा प्लान उपलब्ध करून देण्यात आला आहे.