एअरटेल आणि अमेझॉनमध्ये करार, ग्राहकांना होणार हा फायदा

एअरटेल इंफिनिटी पोस्टपेड योजनेसोबत एक वर्षासाठी अमेझॉन प्राइम सदस्यता मिळणार आहे. 

Updated: Jan 13, 2018, 01:54 PM IST
एअरटेल आणि अमेझॉनमध्ये करार, ग्राहकांना होणार हा फायदा  title=

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी असलेल्या एअरटेलने ई-कॉमर्स कंपनी अमझॉन इंडियासोबत करार केला आहे.

यामुळे ग्राहकांना अमेझॉन प्राइमची सदस्यता मिळणार आहे. एअरटेल इंफिनिटी पोस्टपेड योजनेसोबत एक वर्षासाठी अमेझॉन प्राइम सदस्यता मिळणार आहे. 

हा फायदा 

एअरटेलच्या ज्या ग्राहकांकडे ४९९ रुपये किंवा त्याहून अधिकचा इंफिनिटी प्लान आहे, त्यांना ९९९ रुपये किंमतीची अमेझॉन प्राइम सदस्यता आणि अमेझॉन प्राइम व्हिडिओ पाहू शकतात. 

अमेझॉनपर्यंत पोहोचणार 

यासाठी वेगळा चार्ज भरावा लागणार नाही. एअरटेलच्या पोस्टपेड ग्राहकांना अमेझॉन प्राइम पर्यंत पोहोचण्यास यामुळे मदत होणार असल्याचे अमेझॉन प्राइमचे प्रमुख अक्षय साही यांनी सांगितले.