जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलचा जबरदस्त प्लान

मोबाईल कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा दिसत आहेत. नव वर्षात एअरटेलने धमाका केलाया. जिओला टक्कर देण्यासाठी सर्वात स्वस्त प्लान आणलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 2, 2018, 10:56 PM IST
जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलचा जबरदस्त प्लान

 मुंबई  : मोबाईल कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा दिसत आहेत. नव वर्षात एअरटेलने धमाका केलाया. जिओला टक्कर देण्यासाठी सर्वात स्वस्त प्लान आणलाय.

एअरटेलने आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी हा नवा प्लान आणलाय. रिलायन्स जिओने अधिकाधिक स्वस्त प्लॅन सादर केले आहेत. जिओने नव वर्षासाठी  जिओने १९९ आणि २९९ रुपयांच्या हॅपी न्यू ईयर प्लान लाँच केले आहेत. 

तर नवीन वर्षापूर्वीच जिओने ३३०० रूपयांच्या कॅशबॅक प्लॅन सादर केला. तसेच जिओने डाऊनलोडींग स्पीडमध्ये सातत्याने १० महिने व्होडाफोन आणि एअरटेलला मागे टाकले आहे. 

आता पुन्हा एकदा जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने चांगला प्लॉन सादर केला आहे. जियोच्या ९८ रूपयांच्या रिचार्ज पॅकला उत्तर देण्यासाठी ९३ रूपयांचा प्लॅन सादर केला आहे. 

यात अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंग मिळेल. सोबतच रोमींगमध्ये देखील फ्री कॉलिंगच्या सुविधा मिळणार आहे. तसेच दररोज १०० एसएमएस फ्री आहेत. या पॅकची व्हॅलिडिटी १० दिवसांची आहे. या दरम्यान युजर्संना १जीबी  ३ जी/४ जी डेटा देखील फ्री मिळेल.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close