शेतकरी कवी म्हणतोय, "मग गांजा का नं पिकवू?"

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jun 24, 2017, 01:11 PM IST

जयवंत पाटील, झी २४ तास, मुंबई : अफू नावाची कविता ही बीड जिल्ह्यातील परळीच्या अरूण पवार या तरूण शेतकरी कवीची आहे. या कवितेची पहिलीच ओळ तुम्हाला स्तब्ध करते, "पांढरं सोनं पिकवलंय, का माती मोल विकू, आणि विकलं जे पिकवलं, तर म्हणता तुम्ही अफू, .... मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू?".

दुमदुमणारे आणि सर्वांच्या मनामनात घुमणारे शब्द...

ही कविता अरूण पवार यांच्या तोंडी असेच दुमदुमणारे आणि सर्वांच्या मनामनात घुमणारे शब्द घेऊन आलेली नाही. अरूण पवार हा कवी बीड जिल्ह्यातील परळीचा आहे, आणि परळीत २०१२ साली २५ शेतकऱ्यांवर, येथे अंमली पदार्थाचं पिक अफू लावल्याचे आरोप झाले होते, यावरून या शेतकऱ्यांना अनेक महिने तुरूंगात काढावे लागले होते.

कापूस आणि अफूची धग...

हीच व्यथा धग शब्द बनून अरूण पवार यांच्या कवितेत शब्द बनून आली आहे., पांढरं सोनं म्हणजे कापूस, जो मातीमोल भावाने मागतात, आणि जे विकलं जातं, ते पिकवलं तर त्याला तुम्ही अफू म्हणतात, अशी व्यथा युवा शेतकरी कवी अरूण पवार यांनी मांडली आहे.

सोयीस्कर अर्थ लावू शकता...

ग्रामीण भागात शेतकऱ्यांमध्येच नाही, तर त्यांच्या तरूण मुलांच्या मनात काय चाललंय? हे तुम्हाला या कवितेवरून लक्षात येईल. शेतीचे प्रश्न हे कुणाला राजकारण वाटेल, तर कुणाला अन्याय, प्रत्येकजण त्याच्या सोयीप्रमाणे अर्थ लावू शकतो.

'स्मार्ट सिटी'नंतर खेड्यांचं काय?

सध्या स्मार्टसिटीवर मोठा जोर दिसतोय, पण खेड्याकडे चला हे विसरताना, खेड्याचा आत्मा शेती आणि शेतकरी यांची मात्र वाताहत होतांना दिसतेय. बीड जिल्ह्यातील परळी येथील कवी अरूण पवार यांनी ही कविता एका कार्यक्रमात म्हटली आहे, ही कविता यू-ट्यूबवर व्हायरल होत आहे. अरूण पवार यांनी ही कविता मराठी साहित्य संमेलनात म्हटली होती.