बजाजने लॉन्च केली नवी दमदार बाईक, किंमत केवळ...

पेट्रोलच्या दरात वाढ होत असताना दुचाकी निर्माता कंपनी बजाज ऑटोने एक जबरदस्त मायलेज देणारी बाईक लॉन्च केली आहे

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 12, 2017, 03:19 PM IST
बजाजने लॉन्च केली नवी दमदार बाईक, किंमत केवळ...

नवी दिल्ली : पेट्रोलच्या दरात वाढ होत असताना दुचाकी निर्माता कंपनी बजाज ऑटोने एक जबरदस्त मायलेज देणारी बाईक लॉन्च केली आहे. नवी बाईक Platina ComforTec ही १०४ किमी प्रति लिटरचा मायलेज देईल असा दावा कंपनीने केला आहे.

बजाजची ही नवी बाईक प्लॅटिनाचं अपडेटेड व्हर्जन आहे. कंपनीने या बाईकला प्लॅटिनाचा नवा अवतार म्हटलं आहे. या बाईकला १०२ सीसीचं DTS-i इंजिन देण्यात आलं आहे. बजाज कंपनीने दावा केला आहे की, या बाईकचा लूक पूर्वीपेक्षा खूपच चांगला आहे.

Platina ComforTec मध्ये एलईडी डेलाइट रनिंग लाईट्स म्हणजेच DRLs देण्यात आले आहेत. कंपनीचा दावा आहे की हे देशातील पहिली १००सीसी बाईक आहे ज्यामध्ये DRLs लाईट्स देण्यात आल्या आहेत. बाईकचा लूकही खूप बदलण्यात आला आहे.

बाईकच्या इंजिनचा विचार केला तर यामध्ये पूर्वीच्या तुलनेत अनेक बदल करण्यात आले आहेत. या अपडेटमुळे इंजिनचं परफॉर्मेंस चांगला होणार आहे. हे इंजिन ७,५०० RPM वर ८.२ PS ची पॉवर देतं. देशभरात बजाजची प्लॅटिनाचं हे नवं अवतार सणासुदीच्या काळात बाजारात उपलब्ध होणार आहे.

देशभरातील सर्वच डिलर्सकडे ही बाईक उपबल्ध असणार आहे. नवी दिल्लीत या बाईकची एक्स शोरूम किंमत ४६,६५६ रुपये ठेवण्यात आली आहे. नव्या प्लॅटिना गाडीला एलईडी डेटाइम रनिंग लाईट हेडलॅम्पच्यावर देण्यात आली आहे.
बजाजच्या Platina ComforTec मध्ये अॅनलॉग स्पीडोमीटर, ओडोमीटर, फ्यूल गॉज देण्यात आले आहेत. प्लॅटिनाचं हे नवं रुप पाहण्यासाठी खूपच आकर्षक आणि स्टाईलिश आहे.