बजाजची स्वस्तात मस्त पल्सर लॉन्च; किती आहे किंमत?

...

Updated: Jun 13, 2018, 11:24 AM IST
बजाजची स्वस्तात मस्त पल्सर लॉन्च; किती आहे किंमत?

मुंबई: बजाजच्या चाहत्यांसाठी आणि तमाम बाईक प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. बजाज पल्सर रियर डिस्क व्हेरियंट लॉन्च केल्यावर दोन महिन्यांच्या आतच कंपनीने आणखी एक बाईक बाईकर्सच्या भेटीला आणली आहे. ही बाईक म्हणजे क्लासिक एडिशन असून, पुण्यातील एका शोरूममने दिलेल्या माहितीनुसार या एडिशनची प्राईज ६७,४३७ इतकी आहे. ही रियर ड्रम ब्रेक व्हेरियंटपेक्षा सुमारे ६,६३७ रूपयांनी स्वस्त आहे.

कसे आहेत ग्राफीक्स

क्लासिक एडिशनमध्ये टँक एक्सटेन्शन आणि बॉडी ग्राफिक्स नाही. मोटारसायकलमध्ये ब्लॅक पेंट स्किम आहे. याशिवाय बाईकमध्ये फारसा बदल नाही. पल्सर क्लासिक १५० मध्ये रियर डिस्क व्हेरियंटप्रमाणेच १४९ सीसी पॉवर एअर कूल्ड, सिंगल-सिलिंडर बीएसआईव्ही इंजिन आहे.त्याची मोटार ८०००rpm मध्ये १४PS आणि ६०००rpm मध्ये १३.४ एनएम टॉर्क देते.

कोणत्या बाईकसोबत स्पर्धा?

ब्रेकिंगसाठी २४० एमएम फ्रंट डिस्क आणि १३० एमएम रिअर ड्रम ब्रेक आहेत. या स्वस्त व्हेरियंट्समुळे बजाजला एण्ट्रील लेवल कम्यूटर सेगमेंटमध्ये मजबूत पकड मिळू शकते. या बाईकची स्पर्धा होंडा यूनिकॉर्न १५० आणि हीरो एक्सट्री स्पॉर्ट तसेच, हिरो अचीवर या बाईकसोबत असेल.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close