Jio ला आव्हान देण्यासाठी 500 रूपयांमध्ये उपलब्ध होणार स्मार्टफोन ?

भारतामध्ये रिलायन्स जिओ आल्यानंतर टेलिकॉम कंपन्यांमधील चुरस अधिक वाढली आहे.

Updated: Feb 9, 2018, 08:00 PM IST
Jio ला आव्हान देण्यासाठी 500 रूपयांमध्ये उपलब्ध होणार स्मार्टफोन ?

  मुंबई : भारतामध्ये रिलायन्स जिओ आल्यानंतर टेलिकॉम कंपन्यांमधील चुरस अधिक वाढली आहे.

सुरूवातीला टेरिफ प्लॅनमधील असणारी ही स्पर्धा आता स्मार्टफोनच्या निर्मितीपर्यंत पोहचली आहे. सामान्यांचया आवाक्यातही 4जीचा स्मार्टफोन यावा करिता प्रयत्न करण्यात आला आहे. आता रिलायंसपेक्षा स्वस्त दरामध्ये स्मार्टफोन उपलब्ध केले जाणार आहेत.  

 जिओला नवं आव्हान 

 मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, नवा 4जी स्मार्टफोन केवळ 500 रूपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. या स्मार्टफोनसोबत कंपनी दरमहा 60-70 रूपयांचा व्हॉईस आणि डाटा ऑफर देणार आहे.
 
 एका रिपोर्टनुसार, जियो युजर्सच्या 49 रूपयांच्या प्लॅनला आव्हान देण्यासाठी इतर कंपन्या नवनवे प्लॅन बाजारात आणत आहेत.जियोचा 49 रूपयांच्या प्लॅनबाबत ग्राहकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे.  

 सबसिडीवर नाही दिला जाणार स्मार्टफोन  

कंपनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिओला आव्हान देण्यासाठी आणलेला नवा प्लॅन जिओप्रमाणे सबसिडीवर उपलब्ध करून दिला जाणार नाही. ग्राहकांना स्वस्तामध्ये चांगला स्मार्टफोन  उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा प्लॅन आहे.