आता TV, फ्रिज खरेदी करणं पडणार महागात

जर तुम्ही टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचा विचार करत आहात तर याच महिन्यात खरेदी करा. कारण, हे खरेदी करणं टाळल्यास तुम्हाला महागात पडण्याची शक्यता आहे.

Updated: May 15, 2018, 10:39 PM IST
आता TV, फ्रिज खरेदी करणं पडणार महागात
Representative Image

नवी दिल्ली : जर तुम्ही टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचा विचार करत आहात तर याच महिन्यात खरेदी करा. कारण, हे खरेदी करणं टाळल्यास तुम्हाला महागात पडण्याची शक्यता आहे.

इलेक्ट्रॉनिक्स वस्तू महागणार

होय, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करण्यासाठी तुम्हाला आधीपेक्षा अधिक किंमत मोजावी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कन्झ्युमर ड्युरेबल फर्म्सच्या मते, जून महिन्यापासून या वस्तुंच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

'हे' आहे खरं कारण

बाजार तज्ञांच्या मते, रुपयात सलग होणारी घट आणि कच्च्या तेलाच्या किमतीत होणाऱ्या वाढीमुळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमतीत वाढ होऊ शकते. इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांच्या मते, या संपूर्ण प्रकारामुळे कच्चा माल आयात करण्यासाठी मोठा खर्च येत आहे आणि याचा परिणाम उत्पादनावर होत आहे. म्हणून कंपन्यांना इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या किमती वाढवाव्या लागणार आहेत.

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमतीत वाढ नेमकी किती टक्क्यांनी होणार आणि कधी पासून होणार याची माहिती मिळू शकलेली नाहीये. मात्र, जून महिन्यापासून या वस्तुंच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close