धमाका! अल्टो ते ऑडी गाड्यांवर ९ लाखांपर्यंतची सूट

जर तुम्ही गाडी विकत घेण्याचा विचार करत असाल तर एक खास संधी चालून आली आहे. मारूतीने त्यांच्या काही कारवर आणि ऑडीनेही त्यांच्या काही कारवर मोठी सूट दिली आहे. जाणून घेऊया कोणत्या कारवर किती सूट....

Updated: Dec 7, 2017, 07:11 PM IST
धमाका! अल्टो ते ऑडी गाड्यांवर ९ लाखांपर्यंतची सूट

नवी दिल्ली : जर तुम्ही गाडी विकत घेण्याचा विचार करत असाल तर एक खास संधी चालून आली आहे. मारूतीने त्यांच्या काही कारवर आणि ऑडीनेही त्यांच्या काही कारवर मोठी सूट दिली आहे. जाणून घेऊया कोणत्या कारवर किती सूट....

Audi Q3

Audi offers discounts of up to Rs 8.85 lakh

जर्मनीची लक्झरी कार बनवणारी कंपनी ऑडीने आपल्या Q3 मॉडलवर ३.४१ लख रूपयांचा कॅश डिस्काऊंट दिला जात आहे. त्यामुळे ही कार आता २९.९९ लाख रूपयांमध्ये मिळत आहे. 

Audi A3

आपल्या लिमिटेड ऑफरमध्ये कंपनीने Audi A3 या कारवर ५ लाख रूपयांचा डिस्काऊंट दिला आहे. हा डिस्काऊंट दिल्यावर ही कार मार्केटमध्ये २६.९९ लाख रूपयांना उपलब्ध आहे. 

Audi A6

Image result for Audi A6 Zee

ऑडीच्या A6 मॉडलवर तब्बल ८.८५ लाख रूपयांचा डिस्काऊंट दिला जात आहे. या बंपर ऑफरनुसार या कारची मार्केट किंमत आता ४४.९९ लाख रूपये इतकी झाली आहे. 

Maruti Alto

Image result for Maruti alto zee

मारूती या भारतातील सर्वात लोकप्रिय कार कंपनीने त्यांच्या अल्टो कार कंपनीवरही मोठा डिस्काऊंट दिला आहे. या कारवर ३५ हजार रूपयांचा डिस्काऊंट दिला जात आहे. 

Maruti WagonR

Image result for Maruti Wagonr zee

मारूतीने अल्टोसोबतच त्यांच्या वॅग्नॉर या कारवरही सूट दिली आहे. या कारवर कंपनीकडून ३० ते ४० हजार रूपयांची सूट दिली जात आहे.

Maruti Swift

Image result for Maruti Swift zee

मारूती स्विफ्ट कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर यावर जबरदस्त ऑफर आहे. या कारवर कंपनीकडून १५ ते २० हजार रूपयांची सूट दिली जात आहे. 

Hyundai Eon

Image result for Hyundai Eon zee

Hyundai Eon या कारवर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ५५ रूपयांचा डिस्काऊंट दिला गेला होता. हा डिस्काऊंट वाढवून यावर्षी ६५ हजार रुपये करण्यात आला आहे.

Hyundai Grand i10

Image result for Hyundai Grand i10 zee

Hyundai Grand i10 या कारवर तुम्हाला ८० हजार रूपयांपर्यंतचा डिस्काऊंट मिळू शकतो. गेल्या वर्षीय डिसेंबरमध्ये या कारवर ४५ हजार रूपयांचा डिस्काऊंट दिला गेला होता. 

Tata Motors

Image result for Tata Hexa zee

टाटा मोटर्सच्या टिगोर सिडेन कारवर ३२ हजार रूपयांपर्यंतचा डिस्काऊंट दिला जात आहे. तर टाटाच्याच टाटा हेक्सा एसयूव्ही या कारवर ७८ हजार रूपयांची सूट मिळत आहे.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close